ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेखच्या वादग्रस्त विधानानंतर राजकारण सुरुच आहे. एकीकडे सहर शेखने पोलिसांकडे लिखित माफीनामा दिल्यानंतर दुसरीकडे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलंय. त्यांनी मुंब्रा इथं येऊन सहर शेखची पाठराखण केली आहे. इतकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचा इशारा दिल्यान नव्या वादाला तोंड फुटलयं...तर सहर शेखनंही आपल्या विधानाचा पुनरुच्चार केलाय..
दरम्यान भाजपने जलील यांना चांगलंच सुनावलंय... हिरव्या सापांना हिंदू समाज दफन करेल असा इशारा नितेश राणेंनी दिलाय... तर जलील निजमांचे पूर्वज असल्याचा टोला शिंदे सेनेने लगावलाय... एकीकडे धार्मिक धुव्रीकरणामुळे राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे भाजप आणि एमआयएमने अचलपूर नगरपरिषदेत युती केलीय...त्यामुळे रंगावरून चाललेलं हे राजकाऱण स्क्रिप्टेड असल्याचा टोला ठाकरेसेनेनं लगावलाय...
ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा शहरातून एमआयएमचे पाच नगरसेवक निवडून आल्यानं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलाच धक्का बसलाय...अशातच सहर शेखनं केलेल्या विधानावरून भाजप नेतेही आक्रमक झालेत. त्यांनी सहर शेखची पोलिस ठाण्यात तक्रार केली. अशातच जलीलांनी सहर शेखची पाठराखण केल्यानं भगव्या आणि हिरव्या रंगाच्या राजकारणाचा मुद्दा इथेच थांबणार नसल्याचं स्पष्ट झालयं. मात्र प्रत्येक वेळी निवडणुकीत धार्मिक धुव्रीकरणाला कितपत बळी पडायचं याचा विचार सर्वसामान्य मतदारांनी पुन्हा एकदा करायला हवा....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.