यवतमाळ : यवतमाळ तालुक्यात वाई (हातोला) येथे सुरु असलेल्या कोंबड्यांच्या (hens) लढाईवरील जुगार अड्यावर छापा टाकून पोलिसांनी (Police) ३ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई वनविभागाच्या (forest department) नर्सरीजवळ करण्यात आली. पोलिसांना बघून काही जुगाऱ्यांनी धूम ठोकली आहे. त्यात १० जणांची नावे रेकॉर्डवर घेण्यात आली असून एकूण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शाम येटरे (वय- २६, रा. सावर), हरिचंद राठोड (वय-६०), सदानंद बेले (वय- ३०, रा. पिपरी) यांना ताब्यात घेतले आहे. पळून जाणारे सागर कोरे (वय- ३२), गजानन ढेगारे (रा. सावर), गोलू किन्नाके, प्रकाश राठोड, संजय राठोड, अरुण राठोड, विजय राठोड यांना देखील या रेकॉर्डवर घेण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अवैध व्यवसाय पूर्णता: बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, वाई (हातोला) येथील कोंबडया बाजार पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु होता. अखेर ग्रामीण (Rural) पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी कारवाईसाठी (action) सापळा रचून हा छापा टाकला आहे.
पहा व्हिडिओ-
यावेळी पळून जात असताना पोलिसांनी तिघांना पकडले आहे. घटनास्थळावरून ७ दुचाकीसह २ लाख ४५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गणेश बुर्रेवार यांच्या तक्रारीवरून पंधरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कसा असतो कोंबड बाजारातील जुगार?
लढाईचे कोंबडे हे विशिष्ट पद्धतीने तयार केलेले असतात. त्यांना वर्षभर विशेष खाद्य पद्धतीचे दिले जाते आणि लढाईची ट्रेनिंग देखील दिले जाते. कोंबड बाजारात हा जुगार घनदाट जंगलात भरत असतो. या लढाईत कोंबड्याच्या पायाला काती (धारधार चाकू) बांधला जातो. तो चाकू फक्त कातकरी असलेला व्यक्ती बांधून देतो. इतर कोणी देखील सहज त्याच्या पायाला काती बांधू शकत नाही. त्यानंतर सुरु होते २ कोंबड्यांमध्ये झुंज….
दोन्ही पार्टीचे लोक आपआपल्या कोंबड्यावर सट्टा लावत असतात. जो कोंबडा जिंकतो त्या मालकाला पैसे आणि मारला गेलेला कोंबडा दोन्ही गोष्टी मिळत असतात. साधारण एका कोंबड्याच्या लढाईमध्ये मालकाला ५० हजार रुपयेपर्यंत जुगाराची रक्कम मिळते आणि जो जुगार भरवत असतो. त्याला १० टक्के कमिशन मिळते. ह्या जुगाराचे दर्दी यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात बघायला मिळतात.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.