Aurangabad: आज पाच लाख लिटर दुधाची विक्री; मुंबईला जाणारे दूधही रोखले Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: आज पाच लाख लिटर दुधाची विक्री; मुंबईला जाणारे दूधही रोखले

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाकडे जवळपास ४० ते ४५ हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी राहणार

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जवळपास ५ लाख लिटर दुधाची विक्री होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाकडे जवळपास ४० ते ४५ हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी राहणार आहे. तशी तयारी दूध संघाने केली आहे. शिवाय आज मुंबईकडे जाणारे दूध देखील रोखण्यात आले आहे.

कोरोनामुळे वर्षभरापासून सगळे सण- उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहे. आता हळूहळू निर्बंध हटविण्यात येत असल्याने औरंगाबाद शहरात उत्सवाला सुरुवात होत आहे. आज औरंगाबाद शहरात कोजागरी पोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात जवळपास साडे चार ते पाच लाख लिटर दूध विक्री होणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे देखील पहा-

यामुळेच अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा दूध संघाने नियोजनही करून ठेवले असल्याचे दूध संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार काळे यांनी सांगितले आहे. कोजागरी पौर्णिमेला शहरात लाखो लिटर दुधाची विक्री दरवर्षी होत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोजागरी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवासह नवरात्रोत्सव, विजया दशमी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. यामुळे आजची कोजागरी पौर्णिमाही जोरदार साजरी होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने जिल्हा दूध संघाने नियोजन केले आहे.

जिल्हा दूध संघातर्फे नियमीत ३० ते ३५ हजार लिटर दूध विक्री होते. यात आता कोजागरीमुळे जवळपास ४० ते ४५ हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी राहणार आहे. औरंगाबाद जिल्हा दूध संघातर्फे नियमितपणे मुंबईला १५ ते २० हजार लिटर दूध टॅंकरच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहेत. आज साजरी होणारी कोजागरी पौर्णिमानिमित्ताने जिल्हा दूध संघातर्फे मुंबईला पाठविण्यात येणारे सर्व टॅंकर थांबविण्यात आले आहे. हेच दूध आता शहरात कोजागरी निमित्ताने वाटप केले जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे अन् काय खाऊ नये

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

SCROLL FOR NEXT