नंदुरबार मध्ये राष्ट्रवादीकडून शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार मध्ये राष्ट्रवादीकडून शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमींच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या घटनेचा निषेध करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शतशः नमन करून दुग्धाभिषेक करण्यात आला.

हे देखील पहा :

नंदुरबार शहरातील जुन्या नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पदाधिकार्‍यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर, शहादा तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा जयघोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत दादा मोरे, युवा नेते ऍड राहु भाऊ मोरे, जिल्हा सरचिटणीस व संघटक जितेंद्र कोकणी, शहराध्यक्ष नितीन जगताप, युवक शहराध्यक्ष लल्ला पैलवान मराठे, युवक राष्ट्रवादीचे सुरेश वळवी, कल्लू पैलवान, प्रमोद महाजन, राजा ठाकरे, निलेश चौधरी यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

SCROLL FOR NEXT