Milind Deora Saam TV
महाराष्ट्र

Milind Deora: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ का सोडली? काय आहे कारण...

Milind Deora Resign: आपल्या ट्वीटरवर याबाबत माहिती दिल्यानंतर दुपारपर्यंत ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील असं म्हटलं जातंय. अशात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल्याने या मागचं खरं कारण काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित आहे.

Ruchika Jadhav

Congress News:

काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी पक्षातील सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडीये. मिलिंद देवरा यांनी आज आपल्या ट्वीटरवर याबाबत माहिती दिल्यानंतर दुपारपर्यंत ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील असं म्हटलं जातंय. मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याने या मागचं खरं कारण काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.

देवरा कुटुंब गेली ५५ वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांचे वडील दिवंगत मुरली देवरा हेही आयुष्यभर काँग्रेसमध्येच होते. पक्षाने त्यांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रीही केलं होतं. काँग्रेसने पुढे मिलिंद यांना दक्षिण मुंबईतील जागेसाठी तिकीट दिलं. तेथून मिलिंद विजयी झाले आणि केंद्रातील मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री झाले. असे असतानाही त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.

हे कारण असण्याची शक्यता

मिलिंद देवरा लोकसभेच्या जागेवरून नाराज होते, असं म्हटलं जातंय. दक्षिण मुंबईतील लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे. साल २००४ आणि २००९ मध्ये त्यांनी या जागेवर विजय मिळवला. मात्र आता ही जागा शिवसेनेला दिली जात असल्याने मिलिंद नाराज होते त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असावा असं म्हटलं जातंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याआधी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांची भेट घेतली होती. साल २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत दक्षिण मुंबई शिवसेनेला मिळाली. मात्र आता शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट मोदींसोबत नाही. त्यामुळे ही जागा पुन्हा काँग्रेसला मिळावी. अशी चर्चा मिलिंद देवरा आणि जयराम रमेश यांच्याच झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. देवरा आज भारत जोडो न्याय यात्रेतही सहभागी होणार होते. मात्र त्या आधीच त्यांनी हा निर्णय घेतल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT