Nashik Firing Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: नाशिकमध्ये मध्यरात्री गोळीबाराचा थरार, बड्या नेत्याच्या मुलाला अटक; नेमकं काय घडलं?

Nashik Firing: नाशिकमध्ये गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आरपीआयच्या नेत्याच्या मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ९ आरोपींपैकी काहींना पोलिसांनी अटक केली. तर इतरांचा शोध सुरू आहे.

Priya More

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिकमध्ये मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी आरपीआयच्या बड्या नेत्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात ९ मुख्य आरोपी आहेत. आरपीआय नेत्याचा मुलगा या घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या. तर इतर सर्व आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. या गोळीबारामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर आयटीआय सिग्नल परिसरात मध्यरात्री गोळीबार झाला होता. या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आलीय. यामध्ये ९ मुख्य आरोपी असून इतर चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेत वरुण तिवारीने मध्यरात्री हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. हॉटेल चालकाने तेथील काही गावगुंडांना कळवले असता ते त्या ठिकाणी आले. या गावगुंडांनी वरुण तिवारीवर गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये वरुण तिवारीच्या डाव्या पायाला गोळी लागली होती. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या वरुणला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात आरपीआयचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे हा मुख्य आरोपी असून तो फरार होता. मात्र पोलिसांनी काही तासातच त्याचा शोध घेत अटक केली. भूषणच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान, पुण्यातल्या मावळ तालुक्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून तरुणाने सख्या भावावर गवत कापायच्या विळ्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाट्याला आलेल्या जमिनीवर भाऊ गवत कापत असल्याचे पाहून त्याला विरोध केल्याने संतापलेले भावाने त्याच्यावर हातातील विळ्याने वार केले. बाळू दत्तू धामकर असे जखमी झालेल्या भावाचे नाव आहे. शिरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी लहान भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार दत्तू धामणकरला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास शिरगाव पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT