MHT-CET 
महाराष्ट्र

MHT-CETचा निकालही वादाच्या भोव-यात; निकाल फेरतपासणीची विद्यार्थ्यांची मागणी

MHT-CET युजीसी नीट पाठोपाठ आता MH-CET निकालही वादाच्या भोवऱ्यात सापडलाय..अन्सर की आणि निकालातील पर्सेंटाईलमध्ये तफावत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

युजीसी नीट च्या निकालातील गोंधळ अजूनही संपलेला नसताना MHT-CET चा निकालही वादात सापडलाय. विद्यार्थी आणि पालकांनी या निकालावर संशय व्यक्त केलाय. कारण MHT-CETच्या निकालाबाबत 'आन्सर की' म्हणजेच उत्तरपत्रिके आधारे मिळालेले मार्क आणि पर्सेन्टाईल यात तफावत असल्याची तक्रार विद्यार्थी आणि पालकांनी केलीय. हा विद्यार्थ्यांच्या कष्टावर पाणी फेरण्याचा प्रकार असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केलीय.

MH-CETचा निकाल लागण्यापूर्वी CET सेलच्या वेबसाईटवर उत्तरपत्रिका अपलोड करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी या 'अन्सर की'चे स्क्रीन शॉट काढून ठेवले होते. 'आन्सर की'नुसार जे गुण मिळायला हवे होते, त्याच्याशी निकालात दिलेले गुण जुळत नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ठाकरे गटाकडे तक्रारी केल्यामुळे आदित्य ठाकरेही सीईटी आयुक्तांची भेट घेणार आहेत.

तसंच याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांना ठाकरेंच्या युवा सेनेनं पत्रही पाठवलंय. मात्र यातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT