Aditya Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Video|MHT-CET च्या पेपरमध्ये ५४ चुका; आदित्य ठाकरेंचा सीईटी सेलवर हल्लाबोल

Bharat Jadhav

राज्यात घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. सीईटीच्या पेपरमधील चुका, उत्तरपत्रिका, पर्सेंटाइलवरुन सवाल करत आदित्य ठाकरेंनी सीईटी सेलच्या भोंगळ कारभारावर ताशोरे ओढले. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंनी सीईटी सेलवर गंभीर आरोप केलेत. एमचटी सीईटीच्या परीक्षेत पारदर्शकता का दिसत नाही, असा सवालही त्यांनी केला.

सीईटीच्या परीक्षा पेपरमध्ये तब्बल ५४ चुका असून या चुका विद्यार्थ्यांनी शोधून काढल्या आहेत. या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी सीईटी सेल पैसे घेते. जर कोणता आक्षेप असेल तो आक्षेप सोडवण्यसाठी विद्यार्थ्याला किमान १०२५ रुपये मोजावे लागतात, यातून सीईटी सेलने लाखो रुपये कमावले असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. सीईटीच्या पेपरवर आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना १०२५ रुपये लागतात. विद्यार्थ्यांना पेपरमध्ये किंवा सीईटी सेलने काही चूक केली असं वाटलं आणि त्यात सुधारणा करून घेण्यासाठी एक हजार रुपयांचे शुल्क आकारले जाते.

यंदा झालेल्या सीईटीच्या परीक्षा पेपरमध्ये १४०० आक्षेप नोंदवण्यात आल्या आहेत. १४०० आक्षेपांची तक्रारी निवारण करण्यासाठी प्रत्येकाकडून १०२५ रुपये घेतले जातील, यातून लाखो रुपये घेतले जाणार असून हे रुपये सीईटी सेलने कमावले आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. ज्या लोकांनी सीईटीचा पेपर सेट केला आधी त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. जेणेकरून ते जे पेपर सेट करत आहेत, ते पेपर सेट करण्यासाठी पात्र आहेत का ते तपासावं लागेल.

सीईटी पेपरमध्ये ५४ चुका आहेत,या परीक्षेचे आयुक्त कोण आहेत? त्यांचे अजून निलंबन का झाले नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. परीक्षेच्या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तरांचे पर्याय एक-एकही बरोबर नव्हते,सर्व पर्याय चुकीचे आहेत. अशा चुका दाखवत आदित्य ठाकरेंनी सीईटी सेलच्या भोंगळ कारभारावर ताशोरे ओढले.

एमएचटी-सीईटी’च्या पर्सेंटाइलमध्ये सुद्धा घोळ झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पेपर तपासण्यासाठी तीन दिवस होते परंतु सीईटीच्या वेबसाईटवरुन सीईटीचा पेपर नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा पेपर तपासता आला नाही. तसेच तेथे मार्क दिसत नाहीत, तर तेथे पर्सेंटाइल दाखवलं जातं, परंतु त्यातही घोळ झाल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय.

काही विभागात जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल मिळालेत तर काही ठिकाणी कमी मार्क मिळूनही जास्त पर्सेंटाइल मिळालेत. त्यामुळे सीईटी सेलला आमचा सवाल आहे की, तुम्ही जे पर्सेंटाइल ठरवलं आहे ते कशा आधारे ठरवलं आहे, त्यासाठी काय गणित ठरवलंय, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय.याच पर्सेंटाइलवरुन प्रवेश अवलंबून आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचं मुल्यामापन सांगा, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलीय.

वेगवेगळ्या पर्सेंटाइलवर प्रश्न केल्यानंतर सीईटी सेलने काही पेपर अवघड होती तर काही ठिकाणी सोपी होती.संपूर्ण राज्यात एक परीक्षा घेण्यात आली, एक परीक्षा २४ बॅचमध्ये वेगवेगळी घेण्यात आली. मग कठीण आणि सोपा पेपर हे कोणी ठरवलं. तसेच परीक्षा घेण्यात आलेल्या २४ बॅचमधून कोण टॉपर आहे ते अजून कळत नाहीये.

इतर परीक्षेचं ज्याप्रकारे उत्तरपत्रिका मिळते तशी उत्तरपत्रिका सीईटीसाठी का मिळत नाही, यात काही राष्ट्राला काही धोका आहे का? असा उपरोधिक सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. उत्तरपत्रिका का दाखवण्यात येत नाही, पर्सेंटाइल कशी ठरवली गेली? या २४ बॅचमध्ये कोणाला किती मार्क मिळाली ते दाखवा असा सवाल आदित्य ठाकरेंनी सीईटी सेलला केली आहेत.या परीक्षेत पारदर्शकता का नाही, असा सवालही त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: विधानसभेच्या मोर्चेबांधणीत मनसेची आघाडी! दसऱ्यानंतर राज ठाकरेंचा मेळावा; उमेदवारांची घोषणा करणार

Marathi News Live Updates : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

SCROLL FOR NEXT