म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची ११ ऑक्टोबर रोजी सोडत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लॉटरीची सोडत.
निकाल म्हाडाच्या वेबसाईटवर पाहता येणार.
काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ५,३५४ घरांसाठी आणि ७७ भूखंडांची लॉटरी काढण्यात आली होती. याला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, आता ११ ऑक्टोबर रोजी, म्हणजेच उद्या लॉटरी काढली जाणार आहे. ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लॉटरी काढली जाणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे आणि वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे ५,३५४ घरे आणि कुळगाव - बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी जाहीरात काढली होती. जाहीरात काढल्यानंतर सुमारे १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले होते. अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज वैध हे ठरले आहेत. उद्या ११ ऑक्टोबर रोजी लॉटरी काढली जाणार आहे.
कोकण मंडळाने लॉटरी कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात केले असून, विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सायंकाळी ६ नंतर उपलब्ध होईल. तसेच विजेत्यांना अर्जासोबत नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMSद्वारे संदेश देखील पाठवला जाईल. विशेष म्हणजे अर्जदारांना फेसबुक आणि यूट्यूब पेजवर थेट प्रक्षेपण बघता येईल.
म्हाडानं कोकण मंडळाच्या घरांच्या आणि भूखंडाच्या अर्ज विक्रीतून ८ कोटी रूपयांची कमाई केली आहे. तसेच शासनालाही जीएसटीद्वारे १ कोटी ४२ लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. घरांसाठी अर्ज भरताना अर्जदारांकडून ५९० रूपये आकारले होते. ज्यात ५०० रूपये अर्ज शुल्क आणि ९० रूपये जीएसटीचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.