Reserved MHADA flats for MLAs and MPs at just ₹9.5 lakh—Are poor families being pushed out of their rights Saam Tv
महाराष्ट्र

गरीबांसाठीचं घर आमदारांच्या घशात! म्हाडाच्या लॉटरीवर प्रश्नचिन्ह

MHADA Lottery Scam Involving Politicians: म्हाडाची घरं आमदार- खासदारांना फक्त 9.5 लाखात मिळणार आहेत. त्यामुळे म्हाडा आजी- माजी आमदार- खासदारांवर इतकी मेहरबान का? गरीबांची घर आमदारांच्या सेवेत कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Suprim Maskar

म्हाडाच्या लॉटरीत आता आमदार- खासदारांची चंगळ पाहायला मिळणार आहे. कारण राज्यातील आमदार, खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत फक्त साडेनऊ लाख रुपये आहे. म्हाडाच्या कोकण मंडळानं 5 हजारांहून अधिक घरांची लॉटरी जाहीर केलीय. त्यात नियमानुसार वेगवगेळ्या राखीव गटांप्रमाणेच आमदार, खासदारांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील 95 घरं राखीव ठेवण्यात आलीयेत. म्हाडाची ही जाहीरात प्रसिद्ध केल्यानंतर आमदारांसठी कोणताही वेगळा नियम नाही, अशी प्रतिक्रिया गृह राज्य मंत्री पंकज भोयर यांनी दिलीय. तर म्हाडा लॉटरीत आमदार उच्च उत्पन्न गटात असल्याचं अतुल भातखळकरांनी सांगितलयं.

आमदार-खासदारासाठी कुठे आहेत राखीव घरे ?

ठिकाण - उत्पन्न गट किंमत (लाखांत) घरांची संख्या

कल्याण -अत्यल्प - 9.55 ते 11.32 - 1

टिटवाळा - अल्प - 17.18 ते 30.56 - 1

नवी मुंबई - अत्यल्प - 8.59 -2

कल्याण - अत्यल्प - 19.60 ते 19.95 - 1

विरार- अत्यल्प - 13.29 - 1

ठाणे - अल्प - 20 ते 21-1

वसई - अल्प - 14 ते 18 -1

कल्याण -अल्प- 21 ते 22 - 49

शिरढोण- अल्प- 35.66 - 11

एकीकडे सर्वसामान्यांना मुंबईसह कोकण पट्ट्यात घर घेणं परवडत नाही. त्यात आमदार- खासदारांना म्हाडाची घरं एवढ्या कमी दरात विकली जात असल्यानं म्हाडाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला जातोय. अत्यल्प उत्पन्न गटातील घर खरेदी करणाऱ्या आमदारांचा पगार नेमका किती असतो?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Latest Update : EPFO चा नवा नियम, आता घरे खरेदी करताना काढता येणार PF चे पैसे, प्रोसेस काय? जाणून घ्या

Senior Citizen Health: घरातील वृद्धांना दात दुखीचा त्रास? मग आहारात 'हे' मऊ आणि पौष्टिक पदार्थ द्या

Nagpur : नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचा संताप, मराठीतील FIR नाकारल्याने आंदोलन | VIDEO

Kalyan : कल्याणकरांची वाहतूक कोंडीची कटकट संपणार, यु टाईप अन् मलंगगडचे रस्ते चकाचक होणार

Navi Mumbai News : सावधान! सडलेल्या केळीचे वेफर्स, नवी मुंबईतील किळसवाणा प्रकार समोर

SCROLL FOR NEXT