नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा. Saam Tv
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा.

मागील काही तासांपासून नंदुरबार जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडत असून अजून पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

मागील काही तासांपासून नंदुरबार जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडत असून अजून पुढील काही तासात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.Meteorological Department warns of heavy rains in Nandurbar district

सर्व राज्यात काही दिवसांपासून पावसाने हाहाकार(Heavy Rain) माजवला आहे यामुळे अनेक ठिकाणी महापूर आला आहे तर अनेक ठिकाणी दरड कोसळून नागरिकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मात्र नंदुरबार(Nandurbaar District) जिल्ह्यामध्ये एक जून ते आत्तापर्यंत पावसाची सरासरी अत्यंत कमी होती. जवळपास जिल्ह्यात 32 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती नाजूक आहे.

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून शहरी भागासह ग्रामीण भागामंध्ये काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पुढील काही तासात जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.Meteorological Department

अखेर आज सुरू झालेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांना फायदा होणार असल्याचं मत नंदुरबार मधील शेतकऱ्यांच आहे.

दरम्यान गेल्या 50 दिवसात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील नदी नाल्यांना प्रवाह सुरू झालेला नाही त्यामुळे मुसळधार पावसाची गरज असून नदी-नाले देखील पहिल्या पुराच्या प्रतीक्षेत आहे. पुढील काही तासात हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT