ratnagiri, ration shop, shivsena, bjp, uddhav thackeray faction saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Faction Vs Bjp : उद्धव ठाकरे गटातील महिलांच्या रुद्रावतारापुढे भाजप नेता नरमला, दिले 'हे' आश्वासन

ज्यांनी आंदाेलन छेडलं त्यांना त्यांच्या कार्यलयात जाऊन स्पष्टीकरण देणार असल्याचे भाजप नेत्याने नमूद केले.

अमोल कलये

Ratnagiri News : रेशन दुकानातून तीन- तीन महिने लोकांना धान्य मिळत नसल्याने उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चक्क रेशन दुकानावरच हल्लाबाेल चढविला. त्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमात व्हायरल हाेऊ लागला आहे. विशेष म्हणजे या दुकानाचा परवाना भाजपच्या तालुकाध्यक्षाकडे असल्याने आता हल्लाेबाेल प्रकरणाला काेणते वळण लागते हे पाहावयास लागणार आहे. (Maharashtra News)

रत्नागिरी (ratnagiri) येथे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांच्या नावे परवाना असलेले रेशनिंगचे दुकान (स्वस्त धान्य दुकान) आहे. या दुकानातून तीन महिन्यांपासून धान्यच मिळत नसल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे गटातील महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चवंडे यांच्या दुकानासमोर घोषणाबाजी केली. तसेच धान्य मिळावे यासाठी माेठा गाेंधळा घातला.

दरम्यान या दुकानामध्ये काम करणा-याचा कर्मचा-याच्या आईचे निधन झाल्याने दुकान बंद हाेते अशी माहिती मुन्ना चवंडे यांनी दिली. तसेच ज्यांनी आंदाेलन केले त्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयात जाऊन खरं काय आहे ते सांगितले जाईल असे चवंडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या हल्लाबाेल आंदाेलनानंतर (aandolan) रेशन दुकानातून नागरिकांना धान्य मिळू लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT