मुख्यमंत्री आणि भिडेंची भेट खेदजनक- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष Saam Tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि भिडेंची भेट खेदजनक- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

सांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांच्या भेेटीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली : पूरपरिस्थिती पहाण्यासाठी सांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांना भेट दिल्याचे वृत्त आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. Meeting between the Chief Minister and sambhaji bhide

कोरोनाशी वैज्ञानिक दृष्टीने हात करण्यात पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयी चुकीची, विधाने करणाऱ्या संभाजी भिडेंना भेट घेणे अत्यंत खेदजनक आहे. इतर अनेक विधानांनी संभाजी भिडे यांनी अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडला आहे. तसेच त्यांनी नेहमीच संविधानाला वारंवार आव्हान दिलं असल्याचही माकपने म्हंटल आहे.

हे देखील पाहा-

2018 मध्ये भीमा-कोरेगाव प्रकरणी भिडे यांच्यावरती गुन्हा सुध्दा दाखल आहे. महाराष्ट्रातील तुरूंगात निरपराध वयोवृद्ध विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते मृत्यूमुखी पडत असताना त्यांच्या छळाला कारण ठरलेल्या भिडेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आश्वासन दिले, हे जनतेला समजले पाहिजे. खरे तर याबद्दल भिडे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करायला हवा असही मतं माकपने व्यक्त केलं आहे.

सांगली दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदीं सुध्दा भिडेंचे पाय धरले होते. या भेटीत नेमके काय झाल ते जनतेला हे समजायला हवे. तसेच भाजपच्या देवेंद्र फडणविसांचा अजेंडा उद्धव ठाकरे राबवणार नाहीत, आणि महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या कौलाशी प्रतारणा करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे असं मतही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मांडल आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT