Shirdi constituency Meeting Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिर्डी लोकसभेवरुन तिढा वाढण्याची शक्यता, मातोश्रीवरील बैठकीला वाकचौरे उपस्थित; नाराज बबनराव घोलप गैरहजर

Shirdi constituency Meeting: मातोश्रीवरील बैठकीला माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पोहचले तर ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप गैरहजर राहिले.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, प्रतिनिधी

Babanrao Gholap News:

ठाकरे गटाच्या शिर्डी लोकसभा मतदार संघाचा तिडा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मातोश्रीवर आज शिर्डी लोकसभा मतदार संघावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पोहचले तर ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप गैरहजर राहिले. यावर बैठकीचे आमंत्रण नसल्याचे स्पष्टिकरण घोलप यांनी दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchoure) यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाकडून मला शिर्डी लोकसभा मतदार संघांत तयारी करायला सांगण्यात आले आहे असे वाकचौरे म्हणाले होते.

तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अहमदनगर (Ahmednagar) दौऱ्यातही ते वाकचौरेंना प्रमोट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावरुनच नाराजी दर्शवत बबनराव घोलप यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. खासदार संजय राऊतांकडे (Sanjay Raut) आपली नाराजीही त्यांनी बोलून दाखवली होती.

आजच्या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र बबनराव घोलप मातोश्रीवर (Matoshree) गैरहजर राहिल्याने त्यांची नाराजी दुर झाली नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या भेटीत त्यांनी वाकचौरेंना उमेदवारी द्यायची होती तर मला आश्वासन का दिले? माझे संपर्क प्रमुखपद का काढून घेण्यात आले.. असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT