Measles Disease Saam Tv
महाराष्ट्र

Measles Disease Outbreak : मुंबईत गोवरचा थैमान, रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबईत गोवरग्रस्त बालकांची एकूण संख्या 386 इतकी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Measles Disease : मुंबईत (Mumbai) दिवसेंदिवस गोवर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गोवरचे रुग्ण वाढू लागल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडत आहे. मुंबईत गोवरग्रस्त बालकांची एकूण संख्या आता 386 इतकी झाली आहे तर संशयित रुग्णांची संख्या 4508 आहे. मुंबईत 111 मुले रुग्णालयात, 25 ऑक्सिजन सपोर्टवर, 5 आयसीयूमध्ये आणि 2 व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे. काल 30 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधित रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.

गोवर म्हणजे काय?

गोवर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो. तो प्रथम कोणत्याही व्यक्तीच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. औषध आणि लसीकरणाने हा आजार टाळता येतो. जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे 'गोवर' हा आजार. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये संपूर्ण जगात सुमारे 1 लाख 10 हजार लोकांचा मृत्यू केवळ गोवरमुळे झाला. त्यापैकी बहुतेक मुले (Child) होती आणि त्यांचे वय 5 वर्षांपेक्षा कमी होते.

हा विषाणू 'Paramyxovirus' कुटुंबातील आहे, जो पहिल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाच्या नलिका आणि संपूर्ण श्वसन प्रणालीला संक्रमित करतो. नंतर ते शरीराच्या इतर भागात पसरते. WHO च्या म्हणण्यानुसार, भारतात गोवरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सन 2022 मध्ये सप्टेंबर महिन्यात देशात गोवरचे 11 हजार 156 रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७९ टक्के वाढ झाली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे 2022 मध्ये गोवरचे रुग्ण अवघ्या दोन महिन्यांत दुप्पट झाले आहेत.

गोवर कशामुळे होतो?

गोवरचा संसर्ग हा नेमका कशामुळे होतो? हे देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जेणेकरून त्यापासून बचाव करता येईल. गोवर हा आर एन ए विषाणूजन्य आजार आहे. हा पॅरामिक्सोव्हायरस प्रकारचा विषाणू मानवी शरीराबाहेर तग धरू शकत नाही. गोवराच्या एका रुग्णाकडून इतर बालकांपर्यंत त्याचा प्रसार होतो.

गोवरची लक्षणे कोणती?

प्रत्यक्ष गोवराची लक्षण दिसून येण्याआधी आणि पुरळ उठण्याच्या सुरवातीच्या काळात हा संसर्गाचा जोर सर्वात जास्त असतो. पुरळ येण्यापूर्वी ४ दिवस व पुरळ उठल्यानंतरचे ४ दिवस संक्रमणाच्या दृष्टींने सर्वात महत्वाचे असतात. या काळात रुग्ण्याचे विलगीकरण आवश्यक ठरते. एकदा गोवर होऊन गेल्यास सहसा परत गोवर होत नाही. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे द्रावकण या विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असतात.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT