Pune News:शिवनेरी गडावर रोप वे करण्याच्या मागणीला पुरातत्त्व खात्याकडून ब्रेक

शिवनेरीवर रोप वे साठी आजी माजी खासदारांकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती.
Pune News
Pune NewsSaam TV
Published On

Pune News: गेल्या अनेक दिवसांपासून जुन्नर (Junnar) तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर रोप वे सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी केली जात आहे. अशात आता शिवनेरी गडावर रोप वे करण्याच्या मागणीला पुरातत्त्व खात्याकडून ब्रेक मिळाला आहे. शिवनेरीवर रोप वे उभारण्यासाठी भौगोलिक स्थिती योग्य नसल्याचे यात पुरातत्त्व खात्याकडून सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवनेरी किल्ल्यावर पुरेशी जागा नाही, तसेच एकंदर भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला असता रोप वे साठी येथील जागा योग्य नसल्याचे पुरातत्व खात्याने आपल्या अहवालात म्हटले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पाठवण्यात आला आहे. शिवनेरीवर रोप वे साठी आजी माजी खासदारांकडून अनेकदा मागणी करण्यात आली होती.

Pune News
Junnar News : नारायणगाव परिसरात चाेरी करणारे गजाआड; टाेळी प्रमुख छकुल्याला अटक

जुन्नर तालुका पर्यटन स्थळ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे शिवनेरीवर रोप वे असावा यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थान आहे. त्यामुळे शिवजयंती किंवा अन्य दिवसांमध्ये इथे येणाऱ्या पर्यटकांची (Tourists) गैरसोय होऊ नये यासाठी रोप वे महत्वाचा आहे. तसेच यामुळे जुन्नर तालुक्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळेल, असे अमोल कोल्हे यांचे मत आहे.

Pune News
Junnar News: पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी; पती– पत्नी दोघांचाही बुडून मृत्यू

यासाठी गेल्या काही वर्षांपासून ते काम करत आहेत. सुरुवातीला त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रोप वे बाबत प्रस्ताव मांडला. त्यावर राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यास पर्वतमाला योजनेंतर्गत निधी मिळेल, असे गडकरी म्हणाले. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना क्रेंद्राकडे शिवनेरी रोप वे साठी प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली होती. अशात काही दिवसांपूर्वीच राज्यसरकारने रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला. मात्र आता पुरातत्व खात्याने या मागणीला ब्रेक दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com