Pavana Dam Saam tv
महाराष्ट्र

Pavana Dam : पवना धरणात ५० टक्केच पाणीसाठा; वाशिमच्या लघु प्रकल्पातील पाणीसाठाही अर्ध्यापेक्षा कमी

Maval Washim News : मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि पिंपरी- चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणारे पवना धरण पाणलोट क्षेत्रात ५० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

Rajesh Sonwane

दिलीप कांबळे/ मनोज जयस्वाल
मावळ/ वाशीम
: अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात (Maval) देखील घाट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात पवना धरणातील (Pavana Dam) पाणीसाठा आता ५० टक्केच राहिला आहे. तर दुसरीकडे वाशीम जिल्ह्यातील लघु प्रकल्पातील साठा देखील अर्ध्यापेक्षा कमी झाला आहे.  (Live Marathi News)

मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि (Pimpri Chinchwad) पिंपरी- चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणारे पवना धरण पाणलोट क्षेत्रात ५० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. सध्या धरणात असलेला पाणीसाठा हा जुलै महिन्यापर्यंत पुरेल असा अंदाज पवना पाटबंधारे खात्याने काढला आहे. तरी वेळेत पाऊस पडला नाही, तर नागरिकांना पाणी टंचाईला (Water Scarcity) सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाशिम जिल्ह्यातील टंचाईची शक्यता 
वाशिम : यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे (Washim) वाशिम जिल्ह्यातील अनेक धरणे पूर्ण भरली नव्हती. सद्या मार्चला सुरुवात झाली असून आत्तापासूनच लघु प्रकल्पातील साठा अर्ध्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्याकरीता आत्तापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT