Maval Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Maval Vidhan Sabha : मावळमध्ये सुनील शेळके विक्रमी मतांनी विजयी; सर्वपक्षीय नेत्यांचा पॅटर्न ठरला अयशस्वी

Maval News : विधानसभेच्या मावळ मतदारसंघात ३ लाख ८६ हजार १६२ मतदार आहेत. त्यापैकी दोन लाख ८० हजार ३१९ म्हणजेच ७२.५९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला

दिलीप कांबळे

मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघात काट्याची लढत पाहण्यास मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र याठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. यात त्यांनी १ लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवत विजय मिळविला आहे.  

विधानसभेच्या (Maval) मावळ मतदारसंघात ३ लाख ८६ हजार १६२ मतदार आहेत. त्यापैकी दोन लाख ८० हजार ३१९ म्हणजेच ७२.५९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता. गेल्या निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात ७१.१६ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाचा टक्का वाढला असल्याने हे वाढीव (Vidhan Sabha Election) मतदान कोणाच्या पथ्यावर पडणारा याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र वाढलेला मतदानाचा टक्का आणि महिलांचे झालेले लक्षणीय मतदान हे सुनील शेळके यांच्या पारड्यात पडले. 

मावळ विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात अजित पवार गटाचेच असलेले बापू भेगडे यांनी बंडखोरी करत सुनील शेळके यांना आव्हान दिले होते. त्यामुळे मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी थेट लढत येथे झाली. या लढतीत भाजपसह स्थानिक सर्व पक्षांनी एकत्र येत येथे शेळकेंविरोधात आघाडी उघडली होती. त्यामुळे मावळ मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता सुनील शेळके यांनी मागील पंचवार्षिकचे स्वतःचे लीड मोडीत काढत तब्बल १ लाख पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन मावळचा गड राखला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! आंबा घाटात प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसला कारची धडक

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा बुडून मृत्यू

Cosmetic injections: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सौंदर्य वाढवणारी इंजेक्शन वापरावर बंदी!

MLc Election : महायुतीत मोठा भूकंप? भाजप-शिंदेसेनेत ४ जागावरून जुंपली! नक्की काय घडतंय? VIDEO

एकदम टेस्टी! आजच घरी बनवा कच्चा केळीची मसालेदार भाजी, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT