Maval News Saam tv
महाराष्ट्र

Burning Car : घाट रस्ता चढताच कारने घेतला अचानक पेट; जुन्या पुणे मुंबई महामार्गावरीळ घटना, तिघे बचावले

Maval News : मुंबईकडून तिघेजण करणे पिंपरी जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान खंडाळा जवळील घाट चढून पार केल्यानंतर गाडीच्या इंजिनमधून क्लचप्लेट जळल्यासारखा वास येऊ लागला

दिलीप कांबळे

मावळ : खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर राजमाची पॉईंट येथील खंडाळा महामार्ग पोलीस चौकी समोर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एका डस्टर कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने या गाडीत बसलेल्या दोन महिला आणि एक व्यक्ती गाडीने पुर्ण पेट घेण्यापूर्वीच बाहेर पडले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मुंबईकडून तिघेजण करणे पिंपरी जाण्यासाठी निघाले होते. या दरम्यान (Khandala) खंडाळा जवळील घाट चढून पार केल्यानंतर गाडीच्या इंजिनमधून क्लचप्लेट जळल्यासारखा वास येऊ लागला. यामुळे कर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेत थांबविली. यानंतर तिघेजण गाडीच्या खाली उतरताच अचानक गाडीने पेट घेतला. पाहताक्षणी कारचा मोठा भडका (Burning car) उडाला. गाडीतून तिघेजण खाली उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली आहे. 

कारला आग लागल्याची घटना समजताच आयआरबीच्या अग्निशमन दल (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीची आग विझवली. या घटनेनंतर महामार्ग पोलिसांनी वाहन चालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या आगीचे व्हिडिओ पोलीस यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

WhatsApp मध्ये मोठा बदल, आई-वडिलांकडे राहणार तुमच्या प्रत्येक चॅटची माहिती; कसं ते वाचा

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असेल 'ही' अनमोल गोष्ट, त्याला पृथ्वीवरच स्वर्ग मिळेल

Goregaon Mulund Link Road: मुंबई-ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरु; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT