SugarCane Saam tv
महाराष्ट्र

आता बैलगाडी थांबवता येणार हैंड ब्रेक लावून..उस वाहतुक करणाऱ्यांना होणार फायदा

दिलीप कांबळे

मावळ : राज्यामध्ये शेकडो साखर कारखाने आहे. या साखर कारखान्यावर अनेक ऊसतोड कामगार काम करत असतात. कारखान्याकडून ऊसतोड कामगारांना ऊस वाहून नेण्यासाठी बैलगाडीही पुरविल्या जाते. मात्र आतापर्यंत या गाडीला हँड ब्रेक नसल्याने गाडी सोबतच बैलांनाही अपघात होत असे. मात्र आता माळव्यातील (Maval) संदीप पानसरे यांनी गाडीला हॅन्ड ब्रेक लावून ऊस वाहतूक करणाऱ्या कामगारांना एक दिलासा दिला आहे. (maval news bullock carts can be stopped by applying hand brakes)

मावळमधील संत तुकाराम साखर कारखानात (Sugar Factory) मराठवाड्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक ऊसतोड कामगार आलेले आहेत. कारखान्याकडे दोनशे उसगाड्या आहे. आतापर्यंत ऊसतोड कामगार आपल्या जिवाची पर्वा न करता उसाच्या चाकाला एक काठी लावून उतारावरून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केले होते. यात बैलासोबत गाडीवरील महिलाही जखमी होत होते. कधी काठी तुटायची तर कधी गाडीच थांबत नसे. हा सर्व खेळ पानसरे यांनी बघितला आणि यासाठी काहीतरी केले पाहिजे असा मनाशी निश्चय करून त्यांनी उसाच्या गाडीला हॅन्ड ब्रेक तयार केला. यामधून उन्हातानात रोडवरून चाललेली ऊस तोड महिला बघून मन हेलावत होत. आता गाडीला ब्रेक लावला की लगेच थांबते. त्यामुळे ऊसतोड कामगारांचा अपघात होण्याचा प्रश्न मिटलेला. दरम्यान ऊस तोड गाडीला टायर मोठ्याप्रमाणात झिजत होते; त्याचेही प्रमाण कमी झाले आहे.

वाटेल तेथे गाडी थांबविता येते

रस्त्यावरून गाडी चालवत असताना चढ-उतार आला की आम्हाला गाडीवरून खाली उतरावे लागत होते. यात चाकाला लाकूड लावल्याने काही वेळा ते लाकूड तुटून आमच्या डोक्याला लागत होते. त्यामुळे मोठ्या जखमा व्हायच्या. मात्र या हॅन्ड ब्रेकने मोठा दिलासा मिळाला आहे. उसाच्या गाडीवर बसूनच आम्ही ब्रेक लावतो आणि वाटेल तिथे गाडी थांबू शकतो; असे ऊस तोड कामगाराने सांगितले.

सुरक्षितता वाढली

राज्यातील सर्वच कारखान्यांमध्ये टायरची ऊस तोडून वाण्याची गाडी ही संकल्पना अजूनही आहे. कारखान्याच्या आसपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत ही ऊस वाहतूक कारखान्याला केली जाते. यामध्ये अनेक रस्ते हे चढ-उताराची असतात आणि ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला आतापर्यंत कधीही हँड ब्रेक नव्हते. मात्र पानसरे आमच्याकडे आले आणि त्यांनी संकल्पना सुचविली आणि प्रात्यक्षिक म्हणून एक गाडी ही त्यांनी आम्हाला हॅन्ड ब्रेकची करून दिली. खरंच या हँड ब्रेकमुळे टायर सोबतच कामगारांची सुरक्षितता अधिक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT