Maval News Saam tv
महाराष्ट्र

Indrayani River : मित्रांबरोबर पोहायला गेला परतलाच नाही, मित्रांच्या डोळ्यासमोर तो बुडाला पण...

Maval News : मावळच्या तळेगाव दाभाडे जवळील वराळे गावातील सुंदरम सिंग (वय १४) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना इंद्रायणी नदीत घडली आहे. हा मुलगा आपल्या मित्रांसोबत नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता.

दिलीप कांबळे

मावळ : तीन- चार मित्र गावापासून जवळच असलेल्या इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेले होते. सर्व मित्र पाण्यात उतरले. यामुळे पोहता येत नसताना देखील पाण्यात उतरला आणि खोल पाण्यात बुडाला. यात त्याचा मृत्यू झाला. हे सर्व दृश्य सोबतच्या मित्रांनी पाहिले. मात्र ते घरी परतले असताना त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही.  

मावळच्या तळेगाव दाभाडे जवळील वराळे गावातील सुंदरम सिंग (वय १४) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. सदरची घटना इंद्रायणी नदीत घडली आहे. हा मुलगा आपल्या मित्रांसोबत नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. पोहता येत नसतानाही तो पाण्यात उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबतचे सर्व मित्र आपापल्या घरी परतले. पण तो घरी पोहचलाच नाही. मित्रांच्या डोळ्यासमोर तो बुडाल्याची घटना घडली. मात्र त्याला वाचविण्यात मित्रांना यश मिळाले नाही. 

कुठेही वाच्यता नाही 

मित्रांमधील चौघांना पोहता येत होते. यामुळे नदीत उतरल्यानंतर ते सर्व पोहत नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर गेले. तर सुंदरम आणि त्याच्या एका दुसऱ्या मित्राला पोहता येत नव्हते. तरीही ते पाण्यात उतरले. नदीच्या काठावर पोहत असताना सुंदराम बुडाला, तो वरती आलाच नाही. सुंदरम बुडाला असे समजताच त्याचे मित्र घरी निघून गेले. सुंदरम नदीत बुडाल्याची वाच्यता त्यांनी कुठेही केली नाही. यामुळे मुलगा कुठे गेला याची शोधाशोध सुरु झाली होती. 

पोलिसात हरवल्याची तक्रार 

दरम्यान सोबतचे मित्र घरी परतले असताना सुंदरम आला नाही. दरम्यान सुंदरम याच्या पालकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता त्याचे कपडे इंद्रायणी नदीच्या काठावर आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने नदीपात्रात त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या आईने एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

Famous Historic Places : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

SCROLL FOR NEXT