Lonavala Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Lonavala Vidhan Sabha : आमदार सुनील शेळके यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा; प्रचार रॅलीदरम्यान समर्थकांमध्ये बाचाबाची

Maval News : महायुतीचे उमेदवार सुनील शेळके तसेच बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली

दिलीप कांबळे

मावळ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. एकाच मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार रॅली समोरासमोर येत आहेत. लोणावळा मतदारसंघात सुनील शेळके व बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचार रॅली दरम्यान बाचाबाची झाली. यानंतर भेगडे यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरून शेळके यांच्या आचारसंहिता भगांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीत आता रंग चढू लागला आहे. याच दरम्यान लोणावळ्यात काल महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुनील शेळके तसेच बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. भेगडे आणि शेळके यांच्या रॅलीचा मार्ग एकच असल्याने कार्यकर्त्यांमध्ये (Sunil Shelke) बाचाबाची झाली. त्यानंतर काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. एकाच मार्गावरून रॅली जात असताना घोषणाबाजी देखील सुरु होती. यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते समोरासमोर आले. 

भेगडेच्या कार्यकर्त्यांकडून ठिय्या 

अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भेगडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन रद्द करत बापू भेगडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत प्रचार रॅलीला सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT