Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: महाविद्यालयीन तरुणाची टोळक्याकडून हत्या; पाठलाग करत केला हल्‍ला

महाविद्यालयीन तरुणाची टोळक्याकडून हत्या; पाठलाग करत केला हल्‍ला

दिलीप कांबळे

मावळ : मावळातील तळेगावात महाविद्यालयीन तरुणाची हत्या (Crime News) झाली. प्रवीण मांडेकर असे मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. हा वीस वर्षीय तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाचं (Education) शिक्षण घेत होता. (Live Marathi News)

मयताच्या मैत्रिणीला आरोपींनी फोन केला होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या (Maval) वादाचे पडसाद काल उमटले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असे सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता. हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसला होता. तेव्हा वीस जणांचा टोळका त्यांच्या दिशेने आला. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी धावू लागले.

पाठलाग करून केला हल्‍ला

टोळक्याने त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी रात्रीतच आठ जणांना ताब्यात घेतले आहे. यात अल्पवयीन मुलांचा आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : तब्बल १०४ टन सोनं भारतात आलं, भारतातील सोन्याच्या किंमती कमी होणार? वाचा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम

Crime News : अहिल्यानगर हादरलं! किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाने वडिलांवर चाकूने वार करत संपवलं

Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान झाडांवर कोसळले; ५ जणांचा मृत्यू

Riteish- Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' १ नंबर ! रितेशच्या चित्रपटाने 'सैराट'लाही पछाडलं, रेकॉर्ड ब्रेक करत कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT