Navneet Rana Ravi Rana Saam TV
महाराष्ट्र

Navneet Rana Ravi Rana: हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला मोठा झटका; कोर्टाने फेटाळला दोषमुक्तीचा अर्ज

Court Rejects Navneet Rana Ravi Rana Petition: सत्र न्यायालाकडून ५ जानेवारीला राणा दाम्पत्यावरील दाखल आरोप निश्चित होणार होता. त्यामुळ याआधी आपल्याला दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

Ruchika Jadhav

Hanuman Chalisa Case:

मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी झालेल्या सुनावणीत राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाकडून मोठा झटका मिळाला आहे. हनुमान चालीसा पठण प्रकरणी दाखल गुन्हातून दोषमुक्त होण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राणा दाम्पत्याने तांत्रिक कारणे देत दोषमुक्त करण्याचा अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी आज एमपीएमएलए (MPMLA)कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या प्रकरणी अर्ज फेटाळण्याचा निर्णय दिला आहे.

राणा दाम्पत्याला दोषमुक्त करण्यास पोलिसांचा देखील विरोध होता. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. सत्र न्यायालयाकडून ५ जानेवारीला राणा दाम्पत्यावरील दाखल आरोप निश्चित होणार होता. त्यामुळे याआधी आपल्याला दोषमुक्तीसाठी राणा दाम्पत्याकडून याचिका दाखल करण्यात आली होती. दोषमुक्तीची ही यचिका कोर्टानं फेटाळलीये.

साल २०२२ मध्ये नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण केलं होतं. त्यावेळी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. तसेच दोघांना अटक केली होती. पुढे जामीनावर दोघांचीही सुटका झाली. त्यावर त्यांनी दाखल गुन्ह्यात दोषमुक्त करण्याची विनंती करत सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

खासदार नवनीत राणा यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

उध्दव ठाकरे हे राज्यात संकट होते. अडीच वर्ष जर कोणी घरात बसून असेल आणि महाराष्ट्राला जर वाऱ्यावर सोडलं असेल, तर ते संकटच होतं. त्यामुळे हनुमान चालीसा आवश्यक होती, अशी टीका काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Mundle Age: मराठमोळ्या अभिनेत्रीचं खरं वय किती, प्रसिद्ध मालिकेत करतेय काम

Baramati Assembly Election Result: बारामतीमध्ये अभिजीत बिचकुलेंना २ फेरीत फक्त ९ मतं, पवार काका-पुतण्यांना दिलं होतं आव्हान

Gulabrao Patil : लाडक्या बहिणींनी भावांना दिलेला आशीर्वाद; गुलाबराव पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरूण‌ सरदेसाई आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT