MNS Workers Clashes Saam Tv
महाराष्ट्र

MNS : खारघरमध्ये माथाडी कार्यकर्त्यांकडून मनसैनिकांना मारहाण; कामोठ्यात MNSकार्यकर्त्यांनी फोडलं महेश जाधवांचं कार्यालय

MNS Workers Clashes : मनसेचे माथाडी कामगार नेते असलेले महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मनसैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.

Bharat Jadhav

Amit Thackeray MNS Worker kamothe :

नवी मुंबईच्या खारघरमधील एका रुग्णालयासमोर माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला. खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मनसैनिकांना मारहाण केली. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कामोठे येथील महेश जाधवांचं कार्यालय फोडलं आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, माथाडी कामगाराचे नेते महेश जाधव यांनी मनसे नेते (MNS leader) अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्ते (MNS workers) आक्रमक होत त्यांनी महेश जाधव दाखल असलेल्या रुग्णालयाकडे मोर्चा वळवला. मनसैनिक रुग्णालयात (hospital) आल्याचं कळल्यानंतर माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगार असल्याने त्यांनी मनसे कार्यकर्त्यांनी पळ काढला. मनसे कार्यकर्ते एक सोसायटीमध्ये लपले होते. त्यावेळी माथाडी कामगारांनी सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा फोडल्या. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे सैनिकांनी कामोठ्यातील महेश जाधव यांच्या कार्यालय फोडलंय. मराठी कामगार सेनेच्या कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

दरम्यान मनसेचे माथाडी कामगार नेते असलेले महेश जाधव यांनी थेट अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. महेश जाधव हे सध्या खारघर मधील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या मनसैनिकांना जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT