Sachin Tendulkar , Kolhapur saam tv
महाराष्ट्र

Sachin Tendulkar News : अस्सल कोल्हापुरीनं सचिन तेंडुलकरचा पाहुणचार; तेज घाटगे लिहितात, आमच्यासाठी...

सोशल मीडियावर तेज घाटगे यांनी छायाचित्रांसह सचिनच्या दौऱ्याची माहिती टाकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.

Siddharth Latkar

Sachin Tendulkar : तब्बल २९ वर्षांनी कोल्हापुरात गेलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांचा पाहूणचार करण्याची संधी काेल्हापूरातील तेज घाटगे व त्यांच्या कुटुंबियांना नुकतीच मिळाली. अर्थातच ही संधी मिळाल्याने घाटगे कुटुंबियांना हा सुखद धक्का तर हाेताच पण अत्यंत कमी वेळेत त्यांनी सचिनला अस्सल काेल्हापूरी डिशेस खाऊ घातल्याचे समाधान समाज माध्यमातून व्यक्त केले. (Sachin Tendulkar Kolhapur Visit Latest Marathi News)

सचिन याचा मुलगा अर्जुन सध्या गाेवा राज्याकडून क्रिकेट खेळताे. होता. सचिन हा नुकताच गोव्याला गेला. त्यापुर्वी त्याने काेल्हापूरात वास्तव्य केले. तसेच सोमवारी पहाटे नृसिंहवाडी येथे अर्जुन समवेत दत्तदर्शन घेतले. (Maharashtra News)

काेल्हापूरातील आपल्या मुक्कामात सचिनने अर्जुनसमवेत घाटगे यांच्या फॉर्महाऊसमध्ये राहणं पसंत केले. उद्योजक तेज घाटगे (tej ghatge) यांना सचिन यांची पाहूणचार करण्याची संधी मिळाली. घाटगे यांनी सचिनला अस्सल काेल्हापुरी डिशेशचा आनंद दिला. या पाहूणचारानंतर घाटगे यांनी त्यांच्या भावना समाज माध्यमातून व्यक्त केल्या.

ते लिहितात आजची संध्याकाळ एक जबरदस्त सरप्राईज देणारी ठरली. माझे बंधू गौरव यांनी मला फोन करून सांगितलं की त्यांचे जवळचे आणि खूप मोठे मित्र त्यांच्या प्रवासात कोल्हापुरात थांबणार आहेत. तर त्यांचा पाहुणचार करावा. त्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतावर या पाहुण्यांची वाट पाहात थांबलो.

जेंव्हा पाहुणे आमच्याकडे पोचले, तेंव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ज्यांना आपण अनेक वर्षे क्रिकेटच्या मैदानात बघितलं, ज्यांनी आपल्या खेळाने जागतिक विक्रम केले आणि आपल्या वागण्यातून करोडो चाहत्यांना जिंकलं असे मास्टर ब्लास्टर विक्रमवीर सचिन तेंडुलकर आमच्या फार्म हाऊसवर आले होते.

क्षणभर आम्हापैकी कोणाला विश्वास वाटला नाही, पण हे खरं होतं. साक्षात सचिन तेंडुलकर यांचा पाहुणचार करायला आम्हाला मिळाला हीच खूप मोठी गोष्ट होती. अगदी थोडक्या वेळेत त्यांनी घाटगे कुटुंबियांचा पाहुणचार स्वीकारला, अस्सल कोल्हापुरी (kolhapur) डिशेसचा आस्वाद घेतला आणि ते पुढील प्रवासासाठी निघाले. त्यांची ही धावती भेट आमच्या सदैव स्मरणात राहील असे नमूद केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT