Maharashtra double voters update Saam tv
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीचा सावळा गोंधळ; जालन्यात सापडले तब्बल ९ हजार दुबार मतदार

duplicate voters list : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीचा सावळा गोंधळ समोर आलाय. जालन्यात तब्बल ९ हजार दुबार मतदार सापडल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

जालन्यात प्रारूप मतदारयादीत तब्बल ९ हजार दुबार नावे 

मतदारयादीतील या गंभीर त्रुटी, मतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

मतदारयादीवर ३०५ हरकती, पडताळणीचे काम सुरू

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना शहर महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. मतदारयादीमध्ये तब्बल नऊ हजार दुबार मतदार आढळून आले आहेत. तर प्रारूप मतदारयादीवर 305 हरकती दाखल झाल्यात. जालना शहर महापालिकेची पहिली निवडणूक होत आहे. यासाठी महापालिकेने प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रारूप मतदारयादीचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. या प्रारूप मतदारयादीत तब्बल नऊ हजार मतदार दुबार असल्याचे समोर आले आहे. या दुबार मतदारांकडे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी जाऊन त्यांच्याकडून अर्ज भरून घेणार आहे.

मतदारांना ज्या प्रभागात मतदान करायच आहे, याची माहिती घेऊन ज्या प्रभागात मतदारांना मतदान करायचं नाही, त्यांच्या नावापुढे दुबारचा शिक्का मारण्यात येणार असल्याची माहिती जालना शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी दिली आहे .

नागपुरात दुबार मतदारांना हमीपत्र द्यावे लागणार

नागपूर शहरातील ४५ हजार दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र द्यावे लागणार आहे. प्रशासनाने दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्याची तयारी सुरु केली आहे. दुबार मतदारांना महानगरपालिका निवडणुकीत एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. दुबार मतदारांनी हमीपत्र द्यावे, असं आवाहन मनपाच्या निवडणूक विभागाने केलं आहे. प्रारुप मतदार यादीत ४५ हजार दुबार मतदारांपुढे डबलस्टार आहेत. नागपूर महानगरपालिका हद्दीत सध्या २४ लाख ८२ हजार ४७५ मतदार आहेत.

दुबार मतदारांवरून निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला महत्त्वाचे आदेश

पुणे महापालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या मतदारयादीत दुबार नावे मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जाणे बाहेरील मतदारांची चुकीचा समावेश आहे, अशा गंभीर चुका मोठ्या प्रमाणासमोर आल्या आहेत. या गोंधळामुळे नागरिकांसह सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक आयोग ओळखले तक्रारीचा पाऊस पडला आहे. यामुळे महापालिका आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन या मतदार याद्या तपासून घ्याव्यात. या संबंधित आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्या संदर्भात पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धाराशिवमध्ये प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; जीवितहानी नाही

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT