Nagpur Fire News  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Fire : नागपुरात मिलला भीषण आग; कंपनीचं अंदाजे ४० ते ५० कोटींचं नुकसान

Nagpur Fire News : नागपुरात मिलला आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे कंपनीचं अंदाजे ४० ते ५० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

Nagpur : नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी येथील आमडी फाट्याजवळील गिरीराज स्पीनींग मिलमध्ये आज रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे अंदाजे 40 ते 50 कोटीचे नुकसान झालं आहे. या आगीवर पाण्याचा मारा सुरू आहे. कापूस असल्यानं आग धुसमत आहे.

कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कापसापासून तयार केलेल्या गठाणीसह सरकी, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस आदी साहित्य होते.यावेळी जिनिंग प्रेसिंगमधील मशीनमधून शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कापसाला आग लागली.

या आगीत जवळपास 35 हजार क्विंटल कापूस तर तीन ते चार हजार कापसाच्या गटाने हजार क्विंटल ढेप, सरकी रुई आणि मशिनरी आगीच्या कचाट्यात आल्या आहेत. यावेळी आगीमुळे परिसरातील लोखंडी खांबाही तापमानामुळे वितळले. या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

पुण्यात हॉटेलला आग, एकाचा मृत्यू

पुण्यातील धनकवडी, के के मार्केट येथी चहाच्या साईबा हॉटेलमध्ये सिलिंडरमुळे आगीची घटना घडली आहे. या आगीत हॉटेलमधील साहित्य जळाले आहेत. शेजारील दोन कपड्याच्या दुकानांना झळ तर या आगीत हॉटेलमधील एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाकडून वायूगळती असलेले तीन सिलिंडर ताब्यात घेण्यात आले. संतोष हेगडे असं मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. संतोष चहाच्या दुकानात पहिल्याच दिवशी कामावर आला होता. आगीत मृत्यू झालेल्या कामगाराचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात घेऊन गेल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT