Maharashtra Marriage Crisis Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Marriage Crisis : लग्नाच्या नावाखाली दलालांनी लुटलं, तरुणांनी केली आत्महत्या, राज्यातील भीषण वास्तव

Marriage problems in rural : महाराष्ट्रात लग्न न जमणे, बेरोजगारी आणि दलालांकडून होणारी फसवणूक यामुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढत असून आत्महत्यांच्या घटना समोर येत आहेत. हा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे.

Bharat Mohalkar

Maharashtra rural marriage crisis youth suicide cases : लग्न जमेना म्हणून दोन तरुणांनी आत्महत्या केलीय... याच तरुणाला लग्न जमवून देण्याच्या नावाखाली दलालांनीही गंडा घातलाय.. ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर आपल्या समाजासमोरील गंभीर वास्तवाची कहाणी आहे. पाहूयात राज्यातील नव्या सामाजिक समस्येवरचा हा स्पेशल रिपोर्ट...

मुलाच्या मृत्यूनं कासावीस झालेली माऊली आणि खचलेला बाप. ज्यांनी मुलाच्या लग्नाची स्वप्न रंगवली त्यांनाच मुलाच्या चितेला अग्नी द्यावा लागलाय. कारण स्वप्नं मोडली. आशा संपल्या. आणि या सगळ्या नैराश्यातून 25 वर्षीय सत्यपाल भिसे या तरुणानं थेट गळफास घेऊन जीवन संपवलं.

सत्यपालसाठी दोन तीन वर्षांपासून मुली पाहिल्या... मात्र नोकरी नसल्यानं मुलगीच मिळेना...हेच हेरुन एका दलालानं सत्यपालला गाठलं.. लग्न जमवून देतो म्हणाला...त्यासाठी मुलीच्या आईला पैसे द्यावे लागतील, असं सांगितलं.. आणि पैसे घेऊन पोबारा केला..लग्न जमवून देण्याच्या नावाखाली दलालानं गंडा घातल्याचं सत्यपालचे वडील सांगतायत...

हा प्रकार फक्त एका कुटुंबापुरता मर्यादित नाही.. तर पाच दिवसात बुलढाणा जिल्ह्यात लग्न न जमल्यानं निराश झालेल्या 28 वर्षीय हरिश वानखेडे नावाच्या तरुणानंही आत्महत्या केलीय. ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर होत चाललाय.. मात्र या मुलांची लग्न न जमण्याची कारणं काय आहेत? पाहूयात...

महाराष्ट्रात लग्नाच्या वयातील मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण 12-15 टक्के इतकं कमी आहे... ज्या मुलांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, मात्र नोकरी नाही, अशा 70 टक्के मुलांचं लग्न जमवण्यात अडचणी येत असल्याचा एका संस्थेचा अहवाल आहे... नोकरीपेक्षा शेती दुय्यम मानली जात असल्यानं 70 टक्के मुलींना शेतकरी नवरा नको आहे... एवढंच नाही तर मुलीच्या पालकांच्या मुलांकडून असलेल्या मोठ्या अपेक्षांमुळेही ग्रामीण भागातील मुलांची लग्न जमत नसल्याचं चित्र आहे

मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण असो वा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूरसारखे सधन जिल्हे... सगळीकडेच तरूणाच्या लग्नाचा प्रश्न हा भीषण सामाजिक वास्तव बनून समोर येतोय.. त्यावर सामाजिक घुसळण होण्याची आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उपाययोजना कऱण्याची गरज आहे...अन्यथा या एका प्रश्नातून अनेक गंभीर सामाजिक समस्या निर्माण होतील...

संजय जाधव, साम टीव्ही न्यूज... बुलढाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asthma Attack : अस्थमा रुग्णांसाठी फक्त धूळच नाही, तर पावसाचे थेंबही ठरू शकतात घातक

Agriculture Scam: १५ कृषी अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, कृषिमंत्र्यांची मोठी कारवाई

Breaking News : खंडणीप्रकरणी भाजपच्या २२ नेत्यांचे निलंबन, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बुलढाणा- धावत्या एसटीची डिझेल टाकी रस्त्यावर; मेहकर आगाराचा भोंगळ कारभार उघड!

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठा बदल, आज वाढ झाली की घसरण; तुमच्या शहरातील १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

SCROLL FOR NEXT