Marathwada Drought News Saam Tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam News: मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट, 11 धरणातील पाणीसाठा पाहून येईल डोळ्यात पाणी...

Marathwada Drought News: मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट, 11 धरणातील पाणीसाठा पाहून येईल डोळ्यात पाणी...

डॉ. माधव सावरगावे

Marathwada Region Districts News :

पावसाअभावी मराठवाड्यात यंदा दुष्काळी स्थिती ओढवेल की, काय अशी भिती व्यक्त होतेय. कारण ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा उगवला, तरी पावसाने नांदेड जिल्हा वगळता संपूर्ण मराठवाड्यात सरासरीही गाठली नाही.

त्यामुळे काही ठिकाणी पिके शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचीही स्थिती दयनीय असल्याचं चित्र आहे. कारण मागच्या वर्षी धरणातील साठा जितका होता, त्या तुलनेत यंदा धरण, प्रकल्पातील पाण्याचा साठा कमी आहे.

मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा मराठवाड्यात पावसाची काय स्थिती कशी आहे?

  • संभाजीनगर - मागच्या वर्षी आतापर्यंत 403 मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र यंदा आतापर्यंत 247 मिलिमीटर पाऊस झाला.

  • जालना जिल्ह्यात मागच्या वर्षी 492.8 तर यंदा आजपर्यंत 253.7 मिलिमीटर पाऊस झाला.

  • बीड जिल्ह्यात मागील वर्षी आजपर्यंत 396 तर यावर्षी आजपर्यंत 241.6 मिलिमीटर

  • लातूरमध्ये मागच्या वर्षी 498 मिमी तर यावर्षी आजपर्यंत 317.6 मिलिमीटर पाऊस झाला. (Latest Marathi News)

  • उस्मानाबाद मागच्या वर्षी आजपर्यंत 419.9-यावर्षी आजपर्यंत 269.9 मिलीमीटर

  • तर नांदेड मागील वर्षी आजपर्यंत 802.9 यावर्षी आजपर्यंत 580.6

  • परभणी गतवर्षी आजपर्यंत 469.4 यावर्षी आजपर्यंत 273.7

  • हिंगोली जिल्ह्यात मागच्या वर्षी आजपर्यंत 637.7-यावर्षी आजपर्यंत 430.8 मिलीमीटर पाऊस झाला.

त्यामुळे मराठवाड्यात पावसाने सरासरीही गाठली नाही. आतापर्यंत सरासरी 336 मिलिमीटर पाऊस झाला. मागच्या वर्षी आजघडीला 528 मिलिमीटर पाऊस झाला होता. पाऊस नसल्यानं पिकं धोक्यात आणि धरण, प्रकल्पातील पाणीसाठाही चिंता वाढवणारा आहे.

मराठवाड्यातील मोठ्या 11 धरणाची काय स्थिती आहे?

  • जायकवाडी - 33 .18टक्के

  • विष्णुपुरी - 79.18टक्के

  • एलदरी - 59.97टक्के

  • सिद्धेश्वर - 43.93 टक्के

  • निम्न दुधना - 27.25टक्के

  • माजलगाव- 16.3टक्के

  • मांजरा -२ 6.85 टक्के

  • निम्न तेरणा - 30.28 टक्के

  • सीना कोळगाव - 0 टक्के

  • पेनगंगा - 63.16 टक्के

  • मनार - 51.5 टक्के

  • ऐकून - 42.20टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT