38 out of 41 candidates set to lose deposits in Marathwada MLC polls saam tv
महाराष्ट्र

MLC Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत धक्कादायक निकाल; ठाकरे गटाच्या उमेदवारासह 41 पैकी 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

Marathwada MLC Polls: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत एक महत्त्वाची घडामोड समोर आलीय. 41 पैकी 38 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांना 8,475 मते मिळाली आहेत.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

  • मराठवाडा पदवीधर निवडणुकीत 41 पैकी 38 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

  • मराठवाडा पदवीधर निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का

  • दिलीप घुगे यांना एकूण 8 हजार 475 मते मिळाल्याची माहिती

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीतील एकूण 41 उमेदवारांपैकी तब्बल 38 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांचाही समावेश असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे उमेदवार दिलीप घुगे यांना 8 हजार 475 मते मिळाली आहेत. निवडणूक नियमांनुसार डिपॉझिट वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा टप्पा ते गाठू शकले नाहीत. नियमानुसार एकूण कोट्याच्या 1.6 टक्के मते किंवा 14 हजार 169 पेक्षा जास्त मते मिळवणे आवश्यक असते. 1,4169 पेक्षा कमी मते मिळाल्यामुळे दिलीप घुगे यांच्यासह तब्बल 38 उमेदवारांची अमानत रक्कम जप्त होण्याचा मार्ग मोकळा झालाय.

39 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

या निवडणुकीत तब्बल 41 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निश्चित कोट्याच्या 1/6 (एकशष्टांश) पेक्षा कमी मते घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते. त्यानुसार म्हणजे 14169 पेक्षा कमी मते घेणाऱ्यांचे डिपॉझिट झाले आहे. 3 उमेदवारांना 1/6 (एकशष्टांश) टक्केपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठाचे दिलीप घुगेंसह 39 उमेदवारांचे डिपाॅजीट जप्त झाले आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील, सतीश चव्हाण आणि अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांचेच डिपॉझिट वाचले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरूय. या प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत 24 उमेदवारांना बाद ठरवण्यात आले आहे. उमेदवारांना बाद करत असताना त्यांच्या दुसऱ्या पसंतीची मते आघाडीवर असलेल्या उमेदवारांच्या खात्यात वर्ग केली जात आहेत.

आघाडीवरील मुख्य उमेदवारांची सद्यस्थिती

प्रतापसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष)

आतापर्यंतची एकूण मते: 74,087

दुसऱ्या पसंतीची मोजणी: दुसऱ्या पसंतीच्या मतांमधून त्यांच्या खात्यात 156 मतांची भर पडली आहे.

सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)

आतापर्यंतची एकूण मते: 60,898

दुसऱ्या पसंतीची मोजणी: दुसऱ्या पसंतीच्या मतांमधून त्यांच्या खात्यात 130 मते वाढली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानपरिषदेत रीलस्टार्सनं पाजलं दिग्गजांना पाणी, विद्यमान आमदारांच्या विजयाचं गणित बिघडवलं

MLC Election Results: विधानपरिषदेत शरद पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी, शिंदेंच्या सरदाराची पवारांना साथ

मराठवाडा पदवीधरमध्ये दादांच्या NCPला फटका, शिंदेंची ताकद वाढली, दादांच्या राष्ट्रवादीचं काय?

Treadmill Walking Vs Outdoor Walking: ट्रेडमिलवर चालणे की बाहेर चालणे, आरोग्यासाठी काय बेस्ट?

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नका, संजय गायकवाडांचा महामुर्खपणाचा सल्ला

SCROLL FOR NEXT