Marathwada Farmers Death Report Saamtv
महाराष्ट्र

Marathwada Farmers News: धक्कादायक! ८ महिन्यांत मराठवाड्यातील ६८५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या

Marathwada Farmers Death Report: गेल्या आठ महिन्यात मराठवाड्यातील 685 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून सर्वाधिक शेतकरी बीड जिल्ह्यातील आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Marathwada Farmers Death: मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील बळीराजाला अतिवृष्टीचा सामना करावा लागला. अशात यंदाही सप्टेंबर महिना आला तरी समाधानकारक पाऊस न पडल्याने चिंता वाढली आहे. याच विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असून मागील आठ महिन्यात तब्बल 685 शेतकऱ्यांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठवाड्यामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या आकडेवारीने सर्वांचीच चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यंमधील गेल्या दोन महिन्यांत २०२ तर आठ महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

विशेष म्हणजे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दहा वर्षाचा सरासरी शेतकरी आत्महत्येचा आकडा पाहिल्यास दहा हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे वर्षाला किमान 1 हजार शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे.

या वर्षाच्या आठ महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये बीड (Beed) जिल्ह्यात सर्वाधिक १८६ तर धाराशिवमध्ये (Dharashiv) ११३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात ९५ शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवन संपवले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर शासन स्तरावर गंभीरपणे चर्चा केली जाते. पण त्याच गंभीरपणे उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी करण्यात सर्वच अपयशी ठरलेत.

सध्याची बेभरवशाची शेती, बेमोसमी पाऊस, त्यात खालावलेली आर्थिक परिस्थिती, मुला-मुलींचे शिक्षण, सावकारी आणि बँकांच्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या दिवसेंदिवस अधिक खचून जात आहे. त्यामुळेच बळीराजा मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक आणि भीषण वास्तव समोर आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT