Hingoli Earthquake News साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

Breaking: मराठवाडा पुन्हा भूकंपाने हादरला; किती रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद? नागरिक भयभीत, घराबाहेर धाव

Hingoli 3.5 magnitude earthquake : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप. वसमत, औंढा आणि हिंगोली शहरात नागरिकांना जोरदार धक्के जाणवले. सकाळी ११.२६ वाजता झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Namdeo Kumbhar

Hingoli Earthquake News : मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार हादरा बसला आहे. आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी हिंगोली शहर आणि परिसराला हा धक्का जाणवला. भूमापक केंद्रावर या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. वर्षभरात हिंगोलीमध्ये भूकंपाचे ७ धक्के जाणवल्याची माहिती समोर आली.

Earthquake

या भागात बसले धक्के

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिंगोली शहरासह वसमत आणि औंढा नागनाथ परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. सकाळी अचानक बसलेल्या या धाडक्यामुळे अनेक घरांवरील पत्रे आणि भांडी वाजली.या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. मात्र, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण

हिंगोली आणि वसमत परिसर हा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे संवेदनशील बनला आहे. आज पुन्हा एकदा जोरदार हादरा बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक नागरिक तात्काळ आपापल्या घराबाहेर आणि दुकानाबाहेर पडले.

घरांना पडल्या भेगा; व्हिडिओ समोर

या भूकंपाची तीव्रता अधिक असल्याने परिसरातील काही घरांना आणि भिंतींना भेगा पडल्याची माहिती समोर येत आहे. अनेक भागांतून घरांना तडे गेल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

IPS Officers Resign: १४ महिन्यात ७ IPS अधिकाऱ्यांचा राजीनामा; प्रशासनात खळबळ, पोलीस दलातील नोकरी का सोडताय अधिकारी?

Pune : पुण्यातील मोशी दुर्घटनेला ६४ तास झाले, पण ८ जण अजूनही ढिगाऱ्याखाली, धक्कादायक माहितीही आली समोर

EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT