Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: विश्वविजेत्या आयुष्य म्हात्रेच्या स्वागतासाठी नालासोपाऱ्यात उत्साहाचे वातावरण

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सोलापुरात तरुणीने लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणाने शहरातील एका लॉजमध्ये आत्महत्या

विश्वविजेत्या आयुष्य म्हात्रेच्या स्वागतासाठी नालासोपाऱ्यात उत्साहाचे वातावरण

अंडर १९ विश्वचषक जिंकून देशाचे नाव उज्वल करणारा नालासोपाऱ्याचा सुपुत्र आयुष्य म्हात्रे आज त्याच्या घरी येणार आहे. या ऐतिहासिक यशानंतर आयुष्यच्या आगमनासाठी कुटुंबीयांसह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विमानतळाचे भूमिपूजन म्हणजे नाशिकच्या विकासाची नांदी-देवेंद्र फडणवीस

आष्टीत हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याच्या उरूस यात्रेला उत्साहात प्रारंभ; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

बीडच्या आष्टीत हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याच्या उरूस यात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय. हिंदू–मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या उरूस यात्रेनिमित्त दर्ग्याच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दर्गा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण आहे. उरूस यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याला चादर चढवून दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाप्रसादाचे वाटप करत भाविकांशी संवाद साधला. सर्वधर्मीय ऐक्याचे दर्शन घडवणारी ही उरूस यात्रा शांततेत आणि भक्तिभावात पार पडत आहे.

शिर्डीत 50 वर्षांच्या लक्ष्मीनगरवर पडणार हातोडा

गेली 50 वर्षांहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या शिर्डीच्या लक्ष्मीनगर भागातील इंदिरा गांधी घरकुल योजनेतील तसेच अतिक्रमण म्हणून दाखवण्यात आलेल्या जवळपास 300 कुटुंबांना अवघ्या 15 दिवसांत घरे खाली करण्याचा अल्टिमेटम शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने नोटिसांद्वारे दिल्याने संपूर्ण लक्ष्मीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तरुणीने लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणाची आत्महत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना

नात्यातील तरुणीने लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणाने शहरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हरीश भास्कर बंडी असे मृत तरुणाचे नाव आहे.नात्यातीलच मुलीसोबत मागील 6 वर्षांपासून मुलाचे प्रेमसंबंध होते. लग्नाची मागणी घालण्यासाठी आम्ही मुलीच्या घरी दोन वेळा बोलणीही झाली होती. पण मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिका न जुळल्याचे कारण सांगून लग्नास नकार दिला होता.

शेकटा–इसारवाडी महामार्गावर कंटेनर आणि आयशरची समोरासमोर धडक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा–इसारवाडी महामार्गावर कंटेनर आणि आयशरची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झालाय. शेकटा ते इसारवाडी मार्गावरील शिवपूर गावानजीक हा भीषण अपघात झाला.

भंगारात गोळा का केलेल्या फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट

भंगारात गोळा केलेल्या फ्रिज कॉम्प्रेसरचा स्पोट होऊन माय लेकीसह तिघे जखमी झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडली आहे.. भंगार गोळा करून विक्री करणारी महिला फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधील कॉपर काढत असताना अचानक स्फोट झाला.. अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिला संगीता सोनवणे यांच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून 18 वर्षीय रोशन सोनवणे हिच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापौर शपथ ग्रहण सोहळ्यासाठी फुलं, हार आणि गुलाल आणू नका, भाजप महाराष्ट्र प्रदेश चे आवाहन

उद्या सकाळी पुण्याच्या महापौराची होणार निवड

भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाचा अभिनंदन ठराव केला जाणार

अजित पवारांच्या निधनामुळे शपथग्रहण सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा भाजपचा निर्णय

महापौर शपथ ग्रहण सोहळा शांततेने साजरा करण्याचा भाजपचा निर्णय

नागपुरात ओबीसी प्रश्नांवर महत्त्वपूर्ण मंथन....'सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने बैठक

- काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा नेतृत्वात आंदोलनाची तयारी, यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरातही करणार मार्गदर्शन

- सिव्हिल लाईन्स येथील एमटीडीसी गेस्ट हाऊसमध्ये बैठकी आयोजन आयोजन...विदर्भातील प्रमुख ओबीसी-बहुजन पदाधिकारी उपस्थित राहणार

भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी व पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग

आगीत तीन ते चार गोदाम जळून खाक

शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती

पहिला मजला व दुसरा मजला आगीच्या भक्ष स्थानी

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येवल्यात आगमन..

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे येवल्यात आगमन..

- मुख्यमंत्री फडणवीस हे ' अनुलोम ' या संस्थेच्या संवाद कार्यक्रमात राहणार उपस्थित..

- अनुलोम संस्थेच्या सदस्यांना करणार मार्गदर्शन...

- वडगाव बल्हे येथील कापसे फाऊंडेशन च्या आवारात आहे अनुलोम संवाद कार्यक्रम..

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत 'अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम)' ही सामाजिक संस्था..

- या कार्यक्रमास ' अनुलोम ' सदस्या शिवाय इतरांना प्रवेश नाही..

- कापसे फाऊंडेशनचे बाळासाहेब कापसे यांनी केले हेलिपॅडवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत..

मुंबई आग्रा महामार्गावर टँकरला अचानक लागली आग

आगीमध्ये टँकर संपूर्णतः जळून खाक

धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नगाव परिसरामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर घडली घटना

सिमेंट कालवण्यासाठी या टँकरचा उपयोग होत असतो आणि या टँकरला आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे

पंढरपुरात रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहतूक करणार्या एका टिपरला आग

पंढरपुरात पालखी मार्गाचे काम सुरू आहे. आज दुपारी इसबावी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मुरूम वाहतूक करत असताना अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवून जीव वाचवला. स्थानिक अग्नीशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आग विझवली.

सोलापूरच्या मोहोळमध्ये धाब्यावर evm आढळून आल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने मागितला खुलासा

  • मोहोळ येथील धाब्यावर evm आढळून आल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने मागितला खुलासा

  • संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचा मागितला खुलासा

  • पण evm मशीन राखीव असल्यामुळे त्याचे कोणतेही मतदान नाही, नागरिकांनी अफ़वाला बळी पडू नये

  • सोलापूर जिल्हापरिषद निवडणूक प्रभारी संतोषकुमार देशमुख यांचे आवाहन

  • दरम्यान अकलूज येथे लहान मुलाला मतदान केंद्रात नेल्याप्रकरणी देखील करावाई होणार

  • मतदान करताना मुलाला मतदान केंद्रात नेल्याप्रकरणी मोहिते पाटलांसह निवडणूक कर्मचाऱ्यावर देखील होणार कारवाई

  • सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रभारी तथा उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांची माहिती

मोहोळमध्ये धाब्यावर ईएम मशीन आढळल्याच्या प्रकाराबाबत महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

  • मशीन्स धाब्यावर आढळलेला प्रकार दुर्दैवी आणि गंभीर आहे संबंधितांवर कारवाई होणार

  • आपल्या मुलाला मतदान यंत्राचे बटन दाबायला लावणे चुकीचे असून संबंधित मतदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

  • खासदार धैर्यशील मोहिते पाटीलांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार

  • ईव्हीएम खाली जादूटोणा करणे हा प्रकार धक्कादायक त्याबाबत चौकशी होणार

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक आग

वाशीतील एपीएमसी मार्केट परिसरातील टर्मिनलमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच वाशी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने अनेक वाहनांना दिली धडक; पोलिसांची नेमप्लेट असल्याने खळबळ

नवी मुंबई तील करावे गावाजवळ एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित इनोव्हा कारने रस्त्यावर उभ्या आणि चालू असलेल्या काही वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

अपघात करणाऱ्या इनोव्हा कारवर ‘पोलिस’ अशी नेमप्लेट असल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालक नशेत असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

अपघातानंतर कारची तपासणी केली असता, त्यामध्ये मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडले. या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.

जुना पुणे–मुंबई महामार्गावर पनवेलमध्ये टोल नाक्यावर मोठा गोंधळ

पनवेल येथील शिडून टोल नाक्यावर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, एवढी प्रचंड वाहतूक कोंडी असतानाही टोल वसुली सुरूच ठेवल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. वेळेवर पोहोचण्याची घाई, अडकलेली वाहतूक आणि टोल प्रशासनाची भूमिका यामुळे वातावरण चिघळलं.

संतप्त वाहनचालक आणि नागरिक रस्त्यावर उतरले आणि टोल वसुलीला विरोध केला. काही काळासाठी टोल न भरता वाहने पुढे सोडण्यास टोल प्रशासनाला भाग पाडण्यात आलं. या घटनेमुळे जुना पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक काही वेळ पूर्णपणे विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होती.

४२२ किल्ल्यांच्या नावांतून साकारले शिवछत्रपतींचे ऐतिहासिक आविष्कारक चित्र

कल्याणच्या डॉ. दिनेश गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या ४२२ किल्ल्यांच्या नावांपासून साकारलेले शिवछत्रपती महाराजांचे एक अद्वितीय व आविष्कारक चित्र निर्माण करून इतिहास, कला आणि संशोधन यांचा अप्रतिम संगम घडवून आणला आहे.

या प्रेरणादायी कलाकृतीची प्रेरणा त्यांना मागील वर्षी मिळाली, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा प्रदान केला. त्या क्षणी त्यांनी संकल्प केला की महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एका चित्रामध्ये साकार करून भावी पिढीसाठी जिवंत इतिहास निर्माण करायचा.

महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे- अभिनेते सयाजी शिंदे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त करत दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी अस ते म्हणाले आहेत. बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी आवर्जून सांत्वनपर भेट घेतली

भंडाऱ्यात 'गण गण गणात बोते'चा जयघोष...भक्तीमय वातावरणात निघाली महाराजांची भव्य पालखी...

'गण गण गणात बोते'च्या जयघोषानं आज भंडारा शहर न्हाऊन निघालं. श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त, शहरातील गजानन महाराज मंदिरात आज पहाटेपासूनच भक्तांचा ओघ सुरू झाला होता. पहाटेच्या मंगलमय आरतीला भाविकांनी गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीच्या रंगात रंगला होता. आरतीनंतर, भंडारा शहराच्या प्रमुख मार्गावरून श्री गजानन महाराजांची भव्य पालखी काढण्यात आली. फुलांनी सजवलेली ही पालखी आकर्षणाचे केंद्र ठरली होती. "गजानन महाराज की जय" आणि "गण गण गणात बोते" या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. ज्या मार्गावरून ही पालखी जाणार होती, त्या संपूर्ण भागातील रस्त्यांवर भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. जणू महाराजांच्या स्वागतासाठी भंडाऱ्यातील रस्ते सज्ज झाले होते. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली. प्रकट दिनानिमित्त मंदिरात दिवसभर महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे भंडारा शहरात आज चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

भराडी देवीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा उद्या, ९ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. देवीच्या मंदिराभोवती आकर्षक सभा मंडप उभारण्यात आला असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नऊ रांगाद्वारे दर्शन देण्यात येईल. उद्या देवीच्या दर्शनासाठी राजकीय नेते व मुंबई नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक आंगणेवाडी येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता

  • बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता

  • बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम केला जाहीर

  • मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार

  • एकत्रित प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात येईल

  • त्यानंतर ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जाणार

  • अंतिम मतदारयादी १० मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे

कशेडीत गजाजन महाराज प्रकटदिन सोहळा साजरा

रत्नागिरीत देखील गजानन महाराज प्रकटदिन सोहळा साजरा करण्यात आला. खेड तालुक्यामधील कशेडी येथे श्री गजानन महाराज मंदरात सकाळपासून धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. १४८ व्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच विधीवत अभिषेक आणि होमहवन असे विविध कार्यक्रमांनी मंदिरातील वातावरण भक्तीमय झालय.

शेगावात भक्तीचा महापूर! संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त लाखोंची गर्दी

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगावात आज प्रगट दिनानिमित्त भाविकांचा अक्षरशः महापूर लोटला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून संपूर्ण नगरी भक्तिरसात न्हालेली पाहायला मिळत आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाच्या वतीने मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले होते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे भक्तांना दर्शनासाठी तब्बल 6 तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे.....गेल्या आठ दिवसांपासून शेगावमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची सुरक्षितता आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शेगाव नगरीत सर्वत्र ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे....

नंदूरबारचे पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यावे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पालकमंत्री पद रिक्त असल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असल्याने पालकमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. शिवसेनेचा पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळेल, निधी वेळेत खर्च होईल आणि शिवसेना स्टाईलने विकास साधला जाईल, असा विश्वासही आमदार रघुवंशींनी व्यक्त केला आहे.

CTET परीक्षेत महिलांना मनस्ताप; मंगळसूत्र, दागिने काढण्याची सक्ती | CTET Exam | Sambhajinagar News

पुण्यातील महापौर बंगला नव्या महापौरांसाठी होतोय सज्ज

पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाच काम अंतिम टप्प्यात आले असून तब्बल चार वर्षानंतर पुण्याचे महापौर बंगल्यात वास्तव्यास येणार..त्यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे.रंगकाम …याच बंगल्यात डागडूजी करत फर्निचर बदलण्याच काम सध्या सुरू आहे… पुण्याचा महापौर कोण असेल हे आता जवळपास निश्चित झाला आहे भाजपकडून मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर होतील .. उद्या याच महापौर पदासाठी मतदान होणार असून नव्या होणाऱ्या महापौरांचा बंगला देखील आता तयार झाला आहे..

लाडक्या बहिणींची इकेवायसी दुरुस्त करताना योग्य ती काळजी घ्या

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाडक्या अपात्र बहिणीसाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे ई केवायसी दुरुस्त व अपडेट करण्यासाठी सरकारने या लाडक्या बहिणींना मुदतवाड दिली आहे दरम्यान शासनाच्या आपले सरकार महा-ई-सेवा केंद्र यासह तहसील कार्यालयात लाडक्या बहिणी कागदपत्र घेऊन गर्दी करत आहेत या लाडक्या बहिणींची योग्य ती दुरुस्ती करून देण्याच्या सूचना हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा व सेवा केंद्रांना दिले आहेत दरम्यान लाडक्या बहिणीची आर्थिक फसवणूक केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

फडणवीस नगर दौऱ्यावर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 मध्ये दावोस दौऱ्यात केलेल्या करारानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी येथे तौरल इंडिया या कंपनीचा उद्घाटन काही वेळातच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे, खरंतर दावोस मध्ये झालेल्या करारानुसार सुपा एमआयडीसी येथे सुरू झालेल्या या प्रकल्पात अत्याधुनिक ॲल्युमिनियम सॅन्ड कास्टिंग उत्पादन होणार आहे... खरंतर हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा औद्योगिक टप्पा ठरणार असून आर्थिक विकासाला नवबळ देणार आहे..

NIFT प्रवेश परीक्षेचा गोंधळ; कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये विद्यार्थ्यांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर NIFT प्रवेश परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ

आठ नंबर इमारतीतील Late Shri B.R. Wankhede Education Hub / Sornet ITI / Genus Pvt. Ltd. येथे परीक्षा केंद्र

जवळपास 600 विद्यार्थ्यांची एका दिवसात सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत दोन पेपरची परीक्षा

लासलगावसह नाशिक जिल्ह्यात कांद्याची बंपर आवक

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याची बंपर आवक झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली केवळ जानेवारी महिन्यात तब्बल 35 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाल्याची नोंद लासलगाव सह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये झाली आहे, देशांतर्गत तसेच परदेशी बाजारातील मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक प्रचंड वाढल्याने बाजारात पुरवठ्याचा ताण निर्माण झाला.

सावंतवाडी शहरात भरवस्तीत असलेल्या जुन्या गोदामाला भिषण आग.

सावंतवाडी शहरातील वनविभागाच्या कार्यालयासमोरील एका जुन्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली. भरवस्ती लगत असलेल्या या गोदामात लागलेल्या आगीच्या ज्वाळा आणि आतील वस्तूंच्या स्फोटांच्या आवाजांमुळे नागरिक भयभीत झाले होते. वारंवार फोन करून आणि माहिती देऊनही सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब आला नव्हता. अखेर वेंगुर्ला नगरपरिषदचा अग्निशमन बंब सावंतवाडीत दाखल झाला. या प्रकाराबाबत सावंतवाडीतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. थोड्या वेळाने कुडाळ नगरपंचायत अग्निशमन दाखल झाले. त्यानंतर रात्री ३.०० वाजता आग विझवण्यात यश आले.

Kolhapur: कोल्हापूरमधील मातंग वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या मातंग वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली... या हाणामारी मध्ये काठ्या आणि तलवारीचाही वापर केल्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं.. या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या हाणामारीचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल आहे... याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देखील दाखल करण्याचं काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं..

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेची सूत्रे आता राजापूरच्या सूनेच्या हाती...

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तावडे या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील विल्ये गावच्या सासरवाशीण आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची सूत्रे आता राजापूरच्या सूनेच्या हातात असणार आहेत. त्यामुळे समस्त विल्ये ग्रामस्थ व राजापूरवासीयांसाठी ही अभिमानाची बाब असणार आहे. महापौरपदी त्यांची निवड जाहीर झाल्यानंतर गावातील मंडळींकडूनही आनंद व्यक्त करण्यात आला.

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये बालिकाश्रम रोडवर भीषण अपघात

अहिल्यानगर शहरातल्या बालिकाश्रम रोडवरील ढोरवस्ती जवळ भीषण अपघात..

भरधाव इनोव्हाकारने 4 पॅगो रिक्षा, एक मोटर सायकल आणि एका घराचे केले नुकसान..

मध्यरात्री 2.30 वाजता घडली घटना..

या अपघातात वाहनांचं झालं मोठ्या प्रमाणावर नुकसान तर घराची भिंतही पडली..

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही..

इनोव्हाकार चालक शुभम पेवाल याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूरमध्ये बिबट्याचे दर्शन

नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर मधील सेक्टर ८,९ मध्ये बिबट्याचे दर्शन झाले

रात्री बिबट्या दिसल्याने अनेकांच्या मनात धडकी भरल्या दिसून येत आहे

नवी मुंबईत बिबट्या अनेकवेळा दिसल्याने पूर्ण परिसरात भीतीचे वातावरण

हा व्हिडिओ सोशल मीडियातून वायरल होत आहे

नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये मध्ये सिकल सेल वेलनेस हब बनणार

नागपूरच्या मेडिकल कॉलेजमदज्ये मध्ये सिकल सेल वेलनेस हब बनणार

राज्यातील हे पहिलेच केंद्र आहे निदान, उपचारा सोबत तिथे संशोधन सुद्धा केलं जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यात सिकलसेलचे दीड हजार रुग्ण आहेत

विदर्भ आणि मध्य भारताच्या सीमेवरून सिकलसेल रुग्णांच्या वेदनांना आता विज्ञानाची आणि मायेची फुंकर मिळणार आहे

नागपूर मेडिकल मध्ये सिकलसेल वेलनेस हबच्या रूपाने एक नवे वरदान उभे राहिले आहे

या केंद्रातून सोमवारपासून सिकलसेलग्रस्तांना एका छताखाली निदान आणि उपचारासोबत संशोधनही होणार आहे...

Amravati: अमरावती जिल्ह्यातील ५६ जलप्रकल्पांत सध्या ७९.६६ टक्के पाणीसाठा

अमरावती जिल्ह्यातील ५६ जलप्रकल्पांत सध्या ७९.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध.

गतवर्षी याच कालावधीत पाणीसाठा सुमारे ८४ टक्के होता.

यंदा पाणीसाठ्यात जवळपास १३ टक्क्यांची झाली घट.

ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ७०.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक.

सहा मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून ५६.२४ टक्के साठा उपलब्ध.

४२ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ४८.९९ टक्के पाणी उरले.

पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात टंचाईची शक्यता.

नियोजनबद्ध पाणी वापराचे प्रशासनाकडून आवाहन होण्याची गरज.

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले मतदारांचे आभार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मानले मतदारांचे आभार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे सुनेत्रा पवार यांनी मानले आभार

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मानले आभार

अजित दादांचे विचार व कार्य अधिक सक्षमपणे पुढे जात असल्याचा वर्तवला विश्वास

ZP Election: जिल्हा परिषदा निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश मिळेल-रक्षा खडसे

राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिका मधील यशाप्रमाणेच जिल्हा परिषदा निवडणुकीमध्ये देखील महायुतीला यश मिळेल..

राज्यातल्या निवडणुका सुरू असलेल्या जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता बसेल असा विश्वास भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे

नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा परफॉर्मन्स हा चांगला राहिला आहे...

त्यानुसार आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील महायुतीचे सत्ता येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.

Pune: पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान बारामती तालुक्यात

पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान बारामती तालुक्यात

अजित दादांच्या निधनानंतर बारामतीकरांनी मतदान करणं टाळलं

बारामतीच्या निवडणुकीवर दुःखाची चादर

बारामती मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५४ टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात सरासरी ६९ टक्के मतदान

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत सरासरी ६९ टक्के मतदान झाल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी सर्वाधिक ७९ टक्के मतदान

Navneet Rana: नवनीत राणा यांचा आज तेलंगणा राज्यात निवडणुकीसाठी रोड-शो

भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा आज तेलंगणा राज्यात निवडणुकीसाठी रोड-शो आणि जनसंवाद सभा..

तेलंगणामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज चार ठिकाणी नवनीत राणा यांचा रोड शो..

तेलंगणामध्ये प्रचार सभेला जाऊन नवनीत राणा एमआयएम चे खासदार असरुद्दीन ओवीसींवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष.

तेलंगणा राज्यातील निर्मल आणि नारायण पेठ जिल्ह्यामध्ये नवनीत राणांचे रोड शो.

Lasalgaon: लासलगाव रेल्वे गेट तीन दिवस दहा तास बंद राहणार

विंचूर-प्रकाशा महामार्ग वरील मध्यरेलच्या लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील गेट क्रमांक 105 येथील कामानिमित्त 7, 8 आणि 9 फेब्रुवारी दरम्यान रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत असे तीन दिवस रेल्वे गेट रात्रीच्या दरम्यान 10 तास बंद राहणार असल्याने गुजरात राजस्थान येथून दक्षिण भारतात जाणारी व दक्षिण भारतातून येणाऱ्या अवजड वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना वाहनधारकांना रेल्वे विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक जाहीर करत देण्यात आले आहे

Yavatmal: यवतमाळमध्ये खरबूज पिकांवर मधमाशांचा दुष्काळ

रब्बी हंगामात मोठ्या आशेने लावलेल्या टरबूज आणि खरबूज या वेलवर्गीय पिकांवर यंदा मधमाशांची संख्या घटल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.परागीकरणासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या मधमाशा शेतात दिसत नसल्यामुळे फळांची 'सेटिंग' होत नाहीये, परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही शेतकरी तर हतबल होऊन आपले उभे टरबूज पीक मोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.टरबूज आणि खरबूज या पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळी असतात. मधमाशी जेव्हा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसते, तेव्हाच परागीकरण होऊन फळ धारणा होते. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वेलवर्गीय पिकांची लागवड झाली आहे, परंतु कीटकनाशकांचा अतिवापर किंवा बदलत्या वातावरणामुळे मधमाश्यांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.मधमाशांशिवाय फळाची संख्या वाढणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याने बागा फुलांनी बहरलेल्या असल्या तरी फळे दिसत नाहीत.

Chakan: चाकण बैलगाडा शर्यत आंदोलनातील सर्व ३५०० आंदोलकांची निर्दोष मुक्तता

बैलगाडा शर्यत बंदीविरोधात झालेल्या या आंदोलनात दोन माजी खासदार, एक माजी मंत्री आणि सात आमदारांसह सुमारे ३५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलकांमध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे, आमदार शरद सोनवणे, माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार दिगंबर भेगडे आणि देवराम लांडे यांचा समावेश होता.चाकण येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हे रास्तारोको आंदोलन पार पडले होते. आंदोलनादरम्यान चिथावणीखोर भाषण आणि तब्बल तीन तास रास्ता अडवल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. मात्र, आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर न्यायालयाने सबळ पुरावे आढळले नाहीत, असा निष्कर्ष काढत सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता दिली आहे.

Pune Mayor: पुणे महापौर पदाची निवड सोमवारी

पुणे महापौर निवड सोमवारी, समित्यांचा फैसला १३ तारखेला

पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक उद्या सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य सभगृहात पार पडणार

त्यानंतर पुढील काही दिवसात स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य समित्यांच्‍या अध्यक्षांची निवडणूक होणार

पुणे महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक ही भाजपच्या मंजूषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल सावंत आणि काँग्रेच्या अश्विनी लांडगे यांच्यात होत आहे

तर उपमहापौर पदाची निवडणूक रिपाइचे परशुराम वाडेकर, राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी यांच्यात होणार

उद्या फक्त महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होईल

Kolhapur: कोल्हापूरात ईव्हीएम जमिनीवर आपटले

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी साठी काल सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर दुपारी गोंधळाची घटना घडली... बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना उबाठा गटाच्या ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमिनीवर आपटून निवडणूक आयोगासह शासन आणि निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले...जयवंत वायदंडे यांनी निवडणूक प्रक्रिये संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा होती. त्यामुळे त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. साडेतीनच्या सुमारास मतदान केल्यानंतर जयवंत वायदंडे यांनी ईव्हीएम मशीन जमीनीवर जोरात आपटले. अचानक केलेल्या या कृतीमुळे मतदान केंद्रावर उपस्थित मतदारांमध्ये गोंधळ उडाला...घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली. जयवंत वायदंडे याच्यावर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती...

Nandurbar News: नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणाची सखोल चौकशी करा, माजी खासदार डॉ. हिना गावित यांची मागणी

नंदुरबार शहरात बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे रॅकेट सुरू असल्याचा आरोप भाजपच्या माजी खासदार हीना गावित यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार शोधावा, अशी मागणी माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केली आहे. कोणाच्या आशीर्वादाशिवाय एवढे मोठे रॅकेट सुरू राहू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मागील काळात नगरपालिकेत कार्यरत असलेल्या संबंधित व्यक्तींचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Maharashtra Live News Update: भिमाशंकरला महाशिवरात्री कालावधीतही मंदिर भाविकांसाठी बंद

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात यंदाची महाशिवरात्री शिवभक्तांविना साजरी होणार आहे भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद रहाणार असुन महाशिवरात्रीच्या कालावधीत मंदिर सुरु ठेवण्यात येणार होते मात्र भाविकांच्या सुरक्षेसाठी महाशिवरात्री काळात म्हणजेच १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Semi Final: वानखेडेवर संजू सॅमसनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई, टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर

म्हाडाचे ‘डिजीम्हाडा’ अ‍ॅप लॉन्च; सर्व सेवा आता एका क्लिकवर

Shocking : ३५ वर्षीय IT इंजिनीयरची राहत्या घरी आत्महत्या;धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची नागपूर महानगर पालिका आयुक्तपदी बदली

भारताच्या पोर्टचा इराणवर हल्ल्यासाठी वापर? अमेरिकन नौदलाकडून भारतीय बंदरांचा वापर?

SCROLL FOR NEXT