कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावातील विहिरीत दोन बिबटे पडले
गावाशेजारीच असणाऱ्या विहिरीत पडलेल्या बिबट्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
विहिरीत पडलेल्या दोन्ही बिबट्यांच्या मोठमोठ्याने डरकाळ्या
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्या वर्षात अंमली पदार्थ हस्तगत करण्याच्या दोन कारवाई ठाणे पोलिसांनी करीत अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडलेले आहे. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक केलेल्या विक्रेत्यांच्या व्यतिरिक्त ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने २३ जानेवारी, २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दिवा येथून आरोपी तलत वजाहत रसुल सय्यद(४७) याला ६ कोटी ९४ लाख ४० हजाराच्या हिरोईन सह अटक केली.
गेले अनेक दिवस चंद्रपूर महानगर पालिकेमधील काँग्रेसचा गट नोंदणीचा वाद आज अखेर संपुष्टात आला, काँग्रेसच्या विजयी झालेल्या सर्व 27 नगरसेवकांनी नागपूर विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी केली. यावेळी राजेश अडूर यांची काँग्रेसचे गट नेते म्हणून नोंदणी करण्यात आली. आता पक्षात कुठलाही गट नसून सर्व नगरसेवक हे एकाच म्हणजे काँग्रेसच्या गटाचे असून चंद्रपूर महानगर पालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होणार असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे 10 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
गाडी अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा नातेवाईकांचा आरोप
पाठलाग करणारी गाडी पोलिसांनी केली जप्त,ऐन निवडणूक काळात गाडीत काठ्या आणि कुराडी असल्याने एकच खळबळ
अमरावती महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएमच्या नगरसेविका मिराबाई कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन भाजपच्या महापौर उमेदवाराला आणी युवा सन्मान संघटनेच्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केले.
अजित पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी बारामती येथील ‘सहयोग’ या निवासस्थानी राज्यभरातून दादांवर प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते
या वेळी उपस्थित सर्वांच्या भावना आणि सहवेदना पवार कुटुंबीयांनी एकत्रितपणे स्वीकारल्या. यावेळी शरद पवारांसह, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार तसेच पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
गावाशेजारीच असणाऱ्या विहिरीत पडलेल्या बिबट्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
विहिरीत पडलेल्या दोन्ही बिबट्यांच्या मोठमोठ्याने डरकाळ्या
अबुजमाड जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात सुरू असलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना आज गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानास अंतिम सलामी देण्यात आली.
चंद्रपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद शांत होत नाही तोच, आता भाजपमध्येही महापौर पदावरून गटबाजी उफाळून आल्याचं चित्र दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अधिकृत नाव जाहीर करूनही, ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराने अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले. भाजप प्रदेशाध्यक्षांनी महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांचे नाव निश्चित केले होते. पक्षादेशानुसार खांडेकर यांनी आपला नामांकन अर्जही दाखल केला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या समर्थकांनी ठाकरे सेनेचे नेते रघूनाथ घुटूकडे यांना जीवे मारण्याची धमकी...
घुटूकडे यांनी चेतन सिंह केदार यांचे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा प्रकार समोर आणला आहे...
त्यानंतर केदार समर्थकांची घुटूकडे व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी..
सहा महिन्याच्या कालावधीत एकाच गावात तब्बल 15 हजार 569 जन्म प्रमाणपत्रांची नोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. या मागे आंतरराजिय टोळी असल्याचा संशय असून पोलीस तपास सुरु आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सावळेश्वर या गावाची लोकसंख्या सातराशे इतकी आहे. आणि या गावातुन सहा महिन्यात तब्बल 15 हजार 569 जन्म प्रमाणपत्र काढण्यात आली. ह्या बाबत माहिती झाल्यानंतर चौकशी समिती नेमून अहवालानंतर उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या हाणामारीत लाठ्या काठ्या सह तलवारीचा सर्रास वापर झाल्याचे उघड
दोन्ही गटांतील दोन ते तीन जण गंभीर जखमी
जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टाळला
घटनास्थळी पोलीस पोहोचताच परिस्थिती नियंत्रणात
दोन्ही गटाविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत सात संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात...
जिल्हा परिषद आणि मावळ पंचायत समितीसाठी उद्या प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
त्यासाठी आज मावळ तहसीलदार कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटप करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषद च्या 73 जागांसाठी उद्या मतदान
राष्ट्रवादी काँग्रेस कडे जिल्हा परिषदेवर यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे.
2017 मध्ये राष्ट्रवादीच्या 43 जागा होत्या.
या निवडणुकीमध्ये जागा जास्त निवडून अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भाजपला मतदान करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचे एमआयएम मधून निलंबन होणार.
एमआयएमच्या गटनेत्याकडून सुचक विधान..
अमरावतीत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचं भाजप आणि महायुतीला मतदान.
भाजपा महायुतीला मतदान केल्यामुळे एमआयएम ॲक्शन मोडवर. .
महापौर पदाचे उमेदवार मला चांगले वाटलं म्हणून मतदान केलं एमआयएमच्या नगरसेविकेचा खुलासा
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या संत तुकाराम महाराज यांची तपश्चर्या भूमी असलेल्या भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराळा डोंगर, लेनी हे क्षेत्र राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2011 मध्ये घोषित करण्यात आले होते, मात्र काही भूमाफिया कडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन केले जात असल्याने या तपोभूमीच अस्तित्व धोक्यात आल आहे, आणि याच विरोधात राज्यभरातील विविध वारकरी संघटना संतप्त झाल्या आहेत.. या ठिकाणाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी राज्यभरासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर निवेदन देण्यात आल आहे.. अवैध उत्खनन न थांबल्यास 10 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर वारकरी गाथा आंदोलन केलं जाणार आहे.. तर तात्काळ उत्खनन थांबवा अन्यथा मंत्रालय पोखरून काढू असा इशारा वारकरी धर्म परिषदेचे अँड.सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे
भारत अमेरिका करारावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी टीका केलीय,
या करारामुळे भारतातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलाय
त्यामुळे हा करार रद्द करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यामुळेच यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनाही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलंय.
अमरावती महानगरपालिकेत महापौर पदी भाजपा महायुतीचे श्रीचंद तेजवानी यांची निवड झालीये. भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला एमआयएमच्या बडनेरामधील महिला नगरसेवेका मीरा कांबळे यांचा पाठिंबा आहे. अमरावतीमध्ये भाजप ,युवा स्वाभिमान ,शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्र आहेत.
पुण्यातील वाघोली परिसरात असणाऱ्या अवैध दारू भट्टी वर गुन्हे शाखेची कारवाई
गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या 2 आरोपींना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलं 2 लाख 80हजार रुपयांचे 8000 लिटर रसायन
आरोपींकडून तब्बल 8000 लिटर अवैध दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणार रसायन पोलिसांनी केलं जप्त
प्रल्हाद कदम राठोड, अंकिता गणेश गुडदावत अशी करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे
आरोपींनी पुण्यातील वाघोली परिसरात एक जागा भाड्याने घेऊन दारूची मोठी हातभट्टी अवैधरित्या उभा केली होती
पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत उध्वस्त केला कारखाना
मुंबईच्या भायखळा रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सुलभ शौचालयाचे महाविद्यालयीन मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न
मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणीने शौचालयात हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायकबाब गुरुवारी दुपारी घडली
शौचालयात गेलेली मुलगी आतून दारचं उघडत नव्हती तसेच आतून कुठलाही प्रतिसाद मिळत. नसल्याने महिलेने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली
पोलिसांनी अखेर दरवाजा तोडला असता महिले आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. महिलेला तात्काळ उपचारांसाठी सेंट जाॅर्ज रुग्णालयात दाखल केले
मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, मानसिक तणावातून तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले
अधिक तपास रेल्वे पोलिस करत आहेत
मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या दोन्ही लेन वरून पुण्याकडे वाहन सोडली
सकाळ पासू न मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतुक कोंडी
विकेंडमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे एक्सप्रेस वेवर वाहतुक कोंडी
बोर घाट परिसरात पुण्याकडे जाणाऱ्या मार्गीकेवर झालेली वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा परिसरात डायवर्जन घेत दोन्ही मार्गावरून पुण्याकडे वाहन सोडली
वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उद्या मतदाना प्रक्रिया पार पडणार आहे.. यासाठी प्रशासन आता सज्ज झाले आहे. 61 जिल्हा परिषद गट आणि 122 पंचायत समिती गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 18,18,742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.. या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीन तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. उद्या मतदान तर 9 फेब्रुवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली .
कोल्हापूरच्या नूतन महापौर म्हणून रूपाराणी निकम यांची निवड
रूपाराणी निकम या भाजपच्या आणि महायुतीच्या पहिल्या महापौर
काँग्रेसचे उमेदवार सचिन शेंडे यांचा महायुतीच्या रूपाराणी निकम यांनी केला पराभव
कोल्हापूर महानगर पालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात पार पडली मतदान प्रक्रिया
हात उंचावून घेण्यात आली मतदान प्रक्रिया
जळगाव महापालिकेत आजपासून लोकप्रतिनिधी राज सुरू झाले आहे. महापौर व उपमहापौरपदाची बिनविरोध निवड झाली आहे. महापालिका निवडणूकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या जास्त जागा असल्यामुळे महापौरपद या पक्षाला मिळणार आहे. तर उपहापौरपद शिवसेना शिंदे गटाला देण्याचे निश्चीत झाले आहे.
महापालिकेत महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे दीपमाला मनोज काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला एक अर्ज होता तर शिवसेना शिंदे गटातर्फे मनोज सुरेश चौधरी यांनी उमेदवारी एक अर्ज दाखल केलेला होता निवडीनंतर काळे या जिल्हाधिकारी आयुक्त यांच्या हस्ते शहराच्या महापौरपदाचा पदभार सांभाळतील तर उपमहापौर मनोज चौधरी उपमहापौरपदाचा पदभार घेतला जळगावातील प्रशासक राज संपेल आणि लोकप्रतिनीधी राजला प्रारंभ झाला आहे
सोलापूर महापालिकेच्या महापौर पदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली
महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रियदर्शन साठे आणि एमआयएम कडून तौफिक हात्तुरे यांनी भरला होता उमेदवारी अर्ज
मात्र शिवसेना आणि एमआयएमच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौर पदाची निवड झाली बिनविरोध
इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर होण्याचा उदय धातूंडे यांनी पटकावला मान
इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले उपमहापौर अनिल डाळ्या यांची निवड
राज्याचे उंच व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा
भाजपाचे आमदार राहुल प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली महापौर व उपमहापौरची निवड
महानगरपालिकेमध्ये महापौर उपमहापौर उमेदवारी अर्ज केला दाखल
इचलकरंजी महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता
भाजपचे 43, शिवसेना शिंदे गटाचे 3, अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे 1 असे 47 नगरसेवक निवडून आले होते
तर शिवशाहू आघाडीचे 17 असे एकूण 65 नगरसेवक
अजित दादांच्या खाजगी सचिवांकडे सी आय डी ची चौकशी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी सचिवांकडून जाणून घेतली माहिती
सी आय डी अधिकाऱ्यांनी केली अजित दादांच्या खाजगी सचिव यांच्याकडून बारामती दौऱ्याची चौकशी
२८ जानेवारी रोजी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत माहिती घेण्यासाठी सी आय डी अधिकाऱ्यांकडून चौकशी
२७ जानेवारीच्या रात्री दौऱ्याबाबत काही चर्चा झाली होती का याबाबत देखील अधिकाऱ्यांनी केली चौकशी
अजित दादांच्या प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले होते याबाबत सुद्धा विचारपूस
गडचिरोली पोलिसांमध्ये आणि नक्षल यांची चकमक सुरू असून तीन माओवादी ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे मात्र एक जवान शहीद झाल्याची बातमी समोर येत आहे.
नाशिक -
- नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं अखेर ठरलं
- विरोधात लढलेली शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार
- भाजपचा नाशकात महापौर तर शिंदेंच्या शिवसेनेचा उपमहापौर राहणार
- तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही भाजपला दिलाय पाठिंबा
कोल्हापूर -
कोल्हापूर महानगरपालिका महापौर, उपमहापौरपदाची होणार आज निवड
महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेला पोलिसांचा कडे कोट पोलीस बंदोबस्त
महापालिकेला येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त
महापालिका परिसरात येणाऱ्या सर्व वाहनांना पोलिसांनी केली बंदी
महापौर उपमहापौर निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था
पुणे -
यंदा पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा होणार नाही
अजित पवार यांच्या निधनामुळे वर्धापन दिन साजरा न करण्याचा आयुक्तांचा आदेश
वर्धापन दिन साजरा करू नका यासह त्यादिवशी कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार नसल्याचे आयुक्तांचे स्पष्टीकरण
15 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन केला जातो साजरा
दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत पालिका राबवत असते अनेक कार्यक्रम
पण यंदा अजित पवार यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम रद्द
वर्धापन दिना दिवशी यंदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून गाण्याच्या कार्यक्रमाचं करण्यात आलं होतं आयोजन
यावर टीका झाल्यानंतर आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
बारामती -
अजित पवारांच्या दशक्रिया विधीसाठी शरद पवार सहयोग सोसायटीमध्ये दाखल
अजित पवार यांच्या दशक्रिया विधी हे घरगुती असणार आहेत
त्यामुळे फक्त पवार कुटुंबातील सदस्य सहयोग सोसायटी मध्ये उपस्थित आहेत
संध्याकाळी शरद पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी लोकं येणार
आज सांत्वन पर भेटीसाठीचा शेवटचा दिवस
रत्नागिरी -
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावातील बादीवाडी अद्यापही पुल नाही
पुला अभावी ग्रामस्थांना नदीपात्रातूनच करावा लागतोय जीवघेणा प्रवास
पावसाळ्यात या नदीचं पात्राचं चित्र असतं विदारक
याच नदी पात्रातून गावातील ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागलाय
नाबार्डमधून दिड कोटी मंजूर होऊन देखील तो खर्ची केला जात नाही
पूला संदर्भात योग्य निर्णय झाला नाही तर जलसमाधी आंदोलनाचा ग्रामस्थांनी दिला इशारा
नागपूर-
- विदर्भातील ११ जिल्ह्यांतील अवैध होर्डिंग्जवर उच्च न्यायालयाचा वॉच, नागपूरपुरता मुद्दा नसल्याची न्यायालयाची स्पष्ट नोंद
- जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रभावी कारवाईचे निर्देश...स्थानिक स्थितीवर तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश
- ११ जिल्ह्यांसाठी ११ न्यायालयीन मित्रांची नियुक्ती, प्रत्येक जिल्ह्यातील अवैध होर्डिंग्जचा स्वतंत्र अहवाल तयार होणार
- नागपूर मनपाकडून १३५ जणांची यादी न्यायालयात सादर, बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा
- नोटीस न स्वीकारल्यास पोलिसांमार्फत कारवाईचा इशारा, ५ लाखांपर्यंत दंड ठोठावण्याची पूर्वीच नोटीस
- परिवर्तन संस्थेची अवमानना याचिका... हिवाळी अधिवेशनातील होर्डिंग्जप्रकरणी न्यायालयाची कठोर भूमिका
- एका आठवड्यात सुधारित याचिका दाखल करण्याचे निर्देश....प्रकरणाचा आवाका संपूर्ण विदर्भभर वाढवण्याचा निर्णय
कोल्हापूर -
करवीर पोलिसांकडून बालिंगा इथं रूट मार्च
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवर
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदान शांततेत पार पडावं आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी करवीर पोलिसांनी बालिंगा इथं रूट मार्च केला.
पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या रूट मार्चमध्ये दीडशे पोलीस आणि होमगार्ड यांनी आपला सहभाग नोंदवत मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भयपणे पार पडण्यासाठी आवाहन केलं.
पुणे -
खासदार सुप्रिया सुळे यांचे आणखीन एक स्टेट्स
सुप्रिया सुळे यांच्याकडून स्टेट्स ठेवत पुन्हा अजित पवारांच्या आठवणींना उजाळा
अजित पवार यांचा सोबत असणारा हसरा फोटो सुप्रिया सुळे यांनी ठेवला स्टेट्सला
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडून रोज अजित पवार यांच्या शुभेच्छा फोटो टाकून देण्यात येत आहे आठवणींना उजाळा
पुणे -
पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प १३ फेब्रुवारीला सादर होणार
पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ९ तारखेला होणार आहे.त्यानंतर बैठकीत स्थायी समोतीच्या अध्यक्षांचा निर्णय होईल आणि इतर सदस्यांची निवड होईल
महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडणार आहेत
अर्थसंकल्प तयार करण्याच काम अंतिम टप्प्यात आहे
४ वर्षांनी हा सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.
बारामती ब्रे-
यवतमाळ मधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणाची शरद पवार घेणार माहिती
यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यात जानेवारी महिन्यातील 31 दिवसात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव याबाबत शरद पवार घेणार माहिती
वर्धा -
- वर्धा जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींमध्ये पंख आनंददायी स्वप्नांचे प्रकल्प राबवणार
- जिल्हा परिषद सभागृहात प्रकल्पाचे उद्घाटन
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली, आणि सामुदायिक औषधशास्त्र विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंब, शाळा समुदायांचा सक्रिय सहभाग घेऊन, सुरक्षित स्थिर आणि पोषक पालकत्व प्रस्थापित करण्याच्या संकल्पनेतून राबवण्यात येतोय प्रकल्प
सोलापूर -
सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या
आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ वायरल
सुनील सदारंगानी असे आत्महत्या केलेल्या 60 वर्षीय व्यक्तीचे नाव
शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या
उडी मारण्यापूर्वी सदरंगानी हे हात जोडून प्रार्थना करत होते
पुणे -
पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावर कोंडी सोडवण्यासाठी आता एसओपी
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी हे सोडवण्याचा आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग ठरणार आहे
त्याकरता पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेण्यात येणार
कोंडी सोडविण्यासाठी आदर्श मार्गदर्शक तत्वे अर्थात एसओपी तयार करण्यात येणार आहे.
ही एसओपी निश्चित झाल्यानंतर ते लवकरच जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.
दुर्दगती महामार्गावरील आडोशी बोगदाजवळ रासायनिक पदार्थाचा टँकर पलटी झाला होता.त्यामुळे जवळपास 30 तास वाहतूक कोळंबली होती.
त्यामुळे पुणे मुंबई महामार्ग दरम्यान प्रवाशाचे हाल झाले त्या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.
अमरावती -
आज ठरणार अमरावतीचा महापौर
महायुतीत भाजपचा महापौर होणार
दुपारी 12 वाजता दरम्यान महानगरपालिकेतील डॉ बाबासाहेब सभागृहात केली जाणार महापौर पदाची निवड
महानगरपालिकेतील सभागृहात सदस्य हातवर करून करणार निवड
महायुतीत सहभागी पक्षांचा सव्वा सव्वा वर्षाचा फार्मूला ठरला
आज भाजपचा उमेदवार महापौर तर युवा स्वाभिमान पक्षाचा उमेदवार उपमहापौर होणार
गणेश नाईक -
नवी मुंबईतील महापालिकेच्या खर्चबाबत केलेल्या उधळपाटी बाबत आम्ही चौकशी करणार
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कुणी उधळपट्टी केली याची सर्व चौकशी केली जाणार आहे
तसेच पालघर मधील बांधकाम परवानगी याबाबत प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत एसआयटी या प्रकरणात नेमावी आणि न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व पालघर जिल्ह्यातील प्रकरणावर चौकशीची मागणी आम्ही करत आहोत
नवी मुंबई -
संजीव नाईक महापालिकेचे अधिकाऱ्यांवर भडकले
महापौर दालनाची अवस्था बघून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर
तसेच नवी मुंबईच्या प्रशासनाला दुःख झाले दिसून येत आहे कारण आता नवी मुंबईचा महापौर आलेला आहे
तसेच महापौर दालनामध्ये कर्मचारी स्टाफ सुद्धा देण्यात आला नाहीये त्यामुळे सुविधा देण्यात येत नसल्यामुळे अखेर संजीव नाईक यांनी अधिकाऱ्यांना फोन करून धारेवर धरलं
सोलापूर -
सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार
महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल आणि उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि एमआयएम पक्षाने दिले आहेत उमेदवार
सोलापूर महानगरपालिकेत 102 पैकी 87 भाजप नगरसेवकांचे संख्याबळ, एमआयएम पक्ष 08, शिवसेना शिंदे 04, काँग्रेस 02 आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 01 नगरसेवक निवडून आला आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज सोलापूर महापालिकेची विशेष सभा पार पडणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.