Maharashtra Live News Saam TV marathi news
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे-सोलापूरमध्ये पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, राजकारणातील घडामोडी जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

टँकरन दिलेल्या धडकेत 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

अपघातानंतर टँकर चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Akola : दहशत माजवणाऱ्या टोळीचा 'रोड-शो'

अकोल्यात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची निघाली धिंड

अकोला पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केली आहे.

गेल्या 4 महिन्यात अकोला पोलिसांनी विविध ठिकाणी टोळीनं गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा 'रोड शो' केलाये.

बारामती पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी गरज पडल्यास राहुल गांधींची भेट घेणार - सुनील तटकरे

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गरज पडली तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावात पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी 

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावात पिकअप व्हॅन उलटून ११ जण जखमी झाण्याची घटना घडली आहे.

नांदेडमधील अनिल पंजाबी उर्फ सदा गँगच्या चार आरोपींना अटक

दोन्हीं गँगचे सहा आरोपी अटक केली आहे. अनिल पंजाबी उर्फ सदा गँगचे चार आरोपी अटक याला अटक केली आहे.

पन्हाळ्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने निष्काळजीपणाचा कळस गाठला

काल संध्याकाळी मद्यप्राशन केलेला 'फुल लोडेड' वैद्यकीय अधिकारी रुग्णाच्या उपचारासाठी पोहोचला. डॉक्टरला आरोग्य केंद्रात नीट बोलताही येईना आणि उभारता देखील येईना. डॉक्टर दिगंबर टोनपे यांची अवस्था बघून रुग्णाला कोल्हापूरला हलवले.

जय पवार यांचा बारामतीत जनता दरबार सुरू 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवा नेते जय पवार बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध झालेत.

यवतमाळमध्ये युवकाचं अनोख आंदोलन, रिकामा सिलिंडर दिला फेकून

सद्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका व्यापाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांना बसत आहेत.अशात यवतमाळ येथील प्राध्यापक पंढरी पाठे या युवकाने गळ्यात रिकाम्या डपक्या गळ्यात लटकवून सरेंडर सरेंडर नरेंद्र मोदी सरेंडर अशी घोषणाबाजी केली.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. या हा मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत लांजातील कुक्कुटपालन केंद्राच्या आवारात सापडल्याने हा अपघात दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. हा बिबट्या सहा महिन्यांचा मादी जातीचा आहे. डोक्याला व कमरेला गंभीर दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत बिबट्या धडपडत कुक्कुटपालन परिसरातील बागेमध्ये जाऊन पडला असावा आणि त्यातच बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.या घटनेबाबत वनविभागाने अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई,नवी मुंबई, परिसरातील गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक

अटक आरोपीकडून 45 गॅस सिलेंडर व चोरीच्या 3 मोटरसायकल जप्त

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा चिंतेचा आणि गोंधळाचा वातावरण असतात

आशामध्ये या आरोपींनी पवई पोलीस स्टेशन चा हद्दी मधून एक बर्गमैन दुचाकी गाडी चोरी करून दोन गॅस सिलेंडर चोरी केली होती

मंत्रालयातल्या आणखी एका अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं

खारघर परिसरात लाच घेताना सापळा रचून लाच घेताना एसीबीकडून रंगेहाथ अटक करण्यात आली.

अर्थ व नियोजन विभागात कक्ष अधिकारी म्हणून असणारे विलास लाड यांना एसीबीने केली अटक.

गोरेगावमध्ये महिलांची छेडछाड काढणारा सिरीयल मोलेस्टर पोलिसांच्या जाळ्यात

३० मार्च २०२६ रोजी रात्री ९:३० वाजता तरुणीसोबत अश्लील कृत्य करून आरोपी फरार

पीडितेच्या तक्रारीनंतर बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ४८ तासांत २९ CCTV फुटेज तपासले.

कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर भरधाव कारची चार दुचाकींना धडक

कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर एका भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिली. घटना बीडच्या मादळमोही गावाजवळ घडली आहे. सध्या कल्याण विशाखापट्टणम दुहेरीकरणाचं काम सुरू असून याच मार्गावर असलेल्या एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार दुचाकीना कारने धडक दिली. या अपघातात कार पलटी झाल्यानं दोघेजण गंभीर जखमी तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेले तिघेजण जखमी आहेत. यातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नंदुरबारमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळला, वरिष्ठांकडे तक्रार

काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित हे छुप्या पद्धतीने भाजपाचे काम करत असल्याचे पुरावे पक्ष श्रेष्ठींकडे दिलेत.

नंदुरबारमध्ये १७.६१ लाखांचा अवैध गुटखा जप्त; शहादा पोलिसांची मोठी कारवाई

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी अवैध तंबाखू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल १७ लाख ६१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. गुजरातमधील अहमदाबादहून येणारी आयशर गाडी गोपनीय माहितीच्या आधारे अडवण्यात आली. सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तंबाखू माफियांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

रायगडच्या महाडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर

गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यातील महाडमधून समोर आली आहे. येथील गांधी क्लासेस मधील हि घटना असून या प्रकरणी पिडीत विद्याथ्याने क्लासचे मालक, शिक्षक सुनिल गांधी यांच्या विरोधात तक्रार दखल केली आहे. सन 2024 - 25 मधील हि घटना असून सदर पिडीत मुलगा हा इयत्ता 10 वीमध्ये शिकत होता. या वेळी आरोपी लिंग पिसाट शिक्षकाने पिडीत मुलाच्या गुप्तांगाला हात लावला, विर्य पतन केले. क्लासच्या वरती स्वतःच्या बेडरूममध्ये नेऊन अंगावर झोपून अश्लिल चाळे केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाणी महाड शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

युद्धामुळे बंद झालेल्या केळी निर्यातीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

केळी उत्पादक तालुका म्हणून शहादा तालुक्याची ओळख आहे मात्र आता याच तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

युद्धाचा थेट परिणाम या शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत असून दरवर्षी या तालुक्यातून हजारो टन केळी ही आखाती देशांमध्ये निर्यात केली जात असते मात्र युद्ध सुरू असल्याने ही केळीची निर्यात आता बंद झाल्यामुळे एक्सपोर्ट कॉलिटी ची ही केळी आता देशातच पडून असल्याने कवडीमोल दरात केळी विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आलेली आहे

पुणे- लक्ष्मण हाके लढवणार बारामतीची पोटनिवडूक

मी एक ओ बी सी आंदोलक आहे कुठला ही पक्षाचा सदस्य नाही पण ओ बी सी समाजाच्या बांधवांचे प्रश्न अजेंडा वर येण्यासाठी मी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याची भूमिका लक्ष्मण हाके यांनी आज जाहीर केली.

यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्टवर पावसाचं सावट

  • पावसाच्या शक्यतेमुळे हनी सिंगच्या आजचा होणारा शो पुढे ढकलण्यात आला

  • आज होणारा पुण्यातील हनी सिंग याचा लाईव्ह शो १८ एप्रिल रोजी होणार

  • पुणे शहरात गेल्या चार दिवसांपासून होत आहे जोरदार पाऊस

  • आजही पुणे शहरात पावसाची शक्यता

  • पुणे शहरातील याच खराब हवामानामुळे हनी सिंगचा शो पुढे ढकलण्यात आला आहे

महिलांचा अपमान केला नाही – माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे स्पष्टीकरण

चिखली येथे झालेल्या निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

“मी कुठल्याही प्रकारे महिलांचा अपमान केलेला नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेड शहरात 24 तासात चौथा खून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

शुक्रवारी मध्य रात्री नांदेड शहरात गँगवार मध्ये तीन गुंडाचा खून झाला.या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरु असताना शनिवारी रात्री शहरात पुन्हा एकाचा खून झाला.

नांदेड शहरातील मुरमुरा गल्ली येथे शनीवारी रात्री उशिरा हे हत्याकांड झाले.

रज्जू उर्फ रंजीतसिंघ तबेलेवाले या 32 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला.तलवारीने वार करुन दोघांनी त्याची हत्या केली.

खरात पाठोपाठ रायगडच्या खालापुरमध्ये देखील भोंदूबाबाकडून महिलांचे शोषण

  • खरात प्रकरणा प्रमाणेच रायगडच्या खालापुरमध्ये देखील भोंदू बाबाचे प्रकरण समोर आले आहे.

  • या प्रकरणी सांताक्रूझ मुंबई येथील पिडीत महिलेने खालापुर पोलीस ठाण्यात या भोंदू बाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे.

  • पिडीत महिला पतीच्या प्रेयसी बाबत उपाय करण्यासाठी भोंदूबाबाकडे गेली होती. या वेळी उपाय करण्याच्या बहाण्याने या भोंदू बाबाने महिलेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे असून भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर शहरातील सातवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना येत्या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० शिष्यवृत्ती देणार

उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा केली आहे.

शहरातील सातवी ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना येत्या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रुपयांची ‘लाडकी विद्यार्थिनी शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे

बारामती हा मतदारसंघ नेहमीच शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे -अशोक चव्हाण

नांदेड शहरातील नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

नांदेड शहरातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्यावर शिवकालीन सुवर्ण होण, प्राचीन नाणी अन शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे,छत्रपती शिवरायांचा 'सुवर्ण होन' पाहण्यासाठी किल्ल्यावरती विद्यार्थ्यांची, नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. नंदगिरी किल्ला संवर्धन संस्था आणि नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे शिवराज्याभिषेकाचा जिवंत साक्षीदार असलेला सुवर्ण होन त्याचबरोबर इस.सनपूर्व 600 वर्षा पासूनची दुर्मिळ नाणी आणि मराठेशाहीच्या पराक्रमाची साक्ष देणारे शिवकालीन (प्राचीन)शस्त्रेही प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

साब्रा येथील अनाथ आश्रमाची दयनीय अवस्था; वादळामुळे विद्यार्थ्यांचे हालअपेष्टा...

मेहकर तालुक्यातील साब्रा येथील खाजगी अनाथ आश्रमाची अवस्था अलीकडील वादळामुळे अत्यंत दयनीय झाली आहे. अचानक आलेल्या वादळामुळे आश्रमातील झोपड्या व निवास व्यवस्था उद्ध्वस्त झाली असून लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक विद्यार्थी उघड्यावर राहण्यास मजबूर झाले असून अन्न, पिण्याचे पाणी व दैनंदिन गरजांच्या वस्तूंची कमतरता भासत आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर तसेच शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत पुरवून मुलांसाठी सुरक्षित निवारा, अन्न व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे....

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी आणि तळेगाव ढमढेरेत दोन मादी बिबटे मृतावस्थेत

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी आणि तळेगाव ढमढेरे परिसरात दोन वेगवेगळ्या उसाच्या शेतात दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कोंढापुरी येथे शेताला पाणी देताना, तर तळेगाव ढमढेरे येथे ऊसतोड सुरू असताना ही घटना उघडकीस आली.दोन्ही बिबट्यांना शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.दरम्यान, परिसरात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्यांची भटकंती वाढत असल्याचेही समोर येत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मारहाणीची धक्कादायक घटना

पालघरच्या मनोर हद्दीत मुंबई–अहमदाबाद महामार्गावर मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. जय अंबे हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालक दानिश खान (वय ३०) याला हॉटेल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, जेवण झाल्यानंतर ट्रकची चावी हॉटेलमध्येच विसरल्याने तो पुन्हा चावी घेण्यासाठी गेला असता हॉटेल मॅनेजरसोबत त्याचा वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चालक एकटा असल्याचा फायदा घेत हॉटेलमधील काही जणांनी मिळून त्याला मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्याच्यावर पेट्रोल ओतण्याचाही प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप आहे.या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून त्याला मनोर येथील सह्याद्री खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. मागील चार दिवसांपासून राज्यात सर्वत्रच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडून याचे पंचनामे देखील केले जात आहेत.

संगमनेर तालुक्यातील बोगस डॉक्टरचा भांडाफोड.. दोघांवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात निमगाव भोजापूर येथे बोगस डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करणाऱ्या करणाऱ्यांचा भांडाफोड झालाय.. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींमध्ये शैलेश किसनराव कडलग आणि प्रविण गंगाधर कवडे यांचा समावेश आहे..

Maharashtra Live News Update : एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वे विस्कळीत प्रवाशांची मोठी गर्दी

मुंबईतील परळ–प्रभादेवी दरम्यान असलेल्या जुन्या एल्फिन्स्टन रेल्वे पुलाच्या पाडकामामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या कामामुळे अनेक लोकल तसेच एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अर्धवट मार्गावरच चालवण्यात येत आहेत.

या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते दादर दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत झाली असून कुर्ला, ठाणे आणि दादरपर्यंत धावणाऱ्या गाड्यांवरही परिणाम जाणवत आहे. परिणामी, सकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

उमरगा येथे शिक्षण पेशात 33 वर्षाच्या सेवे नंतर विवेकानंद जाधव यांची सेवानिवृत्ती

धाराशिवच्या उमरगा शहरातील उपक्रमशील शिक्षक विवेकानंद जाधव यांच्या शिक्षकी पेशात 33 वर्षाच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थिती संपन्न झाला. यावेळी मान्यवर मंडळीनी सेवानिवृत्त शिक्षक विवेकानंद जाधव यांच्या सेवाकाळातील भूमिकेवर प्रकाश टाकताना कृतज्ञता भाव व्यक्त करुन गौरव केला.

कणकवली शहरात चोरट्यांची दहशत; तब्बल ८ दुकाने फोडली

कणकवली शहरात चोरट्यांनी दहशत पसरवली आहे. काल रात्री पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी ८ दुकाने फोडली असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या जबरी दुकानफोड्यांमुळे कणकवली शहरात घबराहट पसरली आहे. कणकवली - आचरा रस्त्यावरील बेकरीचे दुकान, मेडिकल, इलेक्ट्रिक दुकान, भुसारी दुकान अशा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून लाखो रूपयांची चोरी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्याच्या शभंर मिटर अंतरावर ही जबरी चोरी झाली असून कणकवली पोलिसांसाठी याचा तपास लावणे आव्हान असणार आहे.

शेगाव मंदिर परिसरात नो-पार्किंगमध्ये रिक्षांचा सुळसुळाट; भाविकांची मोठी गैरसोय..

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात नो-पार्किंग झोनमध्ये आटोरिक्षा उभ्या केल्यामुळे भाविकांना मंदिरात ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे पोलीस विभाग व नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तसेच सलग सुट्ट्यांमुळे शेगावात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

जळगाव जिल्हा बँकेचा ९५ टक्के वसुलीचा ऐतिहासिक टप्पा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शून्य टक्के वसुलीच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी पाठिंबा देत ९५ टक्के कर्जाची परतफेड केली. सोबतच बँकेने चार हजार १५५ कोटींचा ठेवीचा टप्पा पार केला आहे.

यंदा जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये वितरीत केलेल्या पीककजपैिकी तब्बल एक हजार १७ टक्के पीककर्ज रकमेचा भरणा केला कोटी ७६ लाख रूपये अर्थात ९५ असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी माहिती दिली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०८० कोटी ८६ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी विकासोच्या तब्बल १ लाख ६४ हजार ८६५ शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या विविध शाखांच्या माध्यमातून १०८५ कोटी २ लाख रूपये पीककर्जाचे वितरण करण्यात आले होते.

थकबाकीमुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा 5 दिवसापून बंद; पाटबंधारे विभागाची 32 कोटीची थकबाकी.

लातूर महापालिकेकडे पाटबंधारे विभागाची 32 कोट्यावधीची पानीपट्टी थकल्याने , लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणारा खंडित करण्यात आलाय, मागच्या 5 दिवसापासून लातूर शहरात पाणीपुरवठा बंद आहे, यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे , तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शहरवासीयांकडून होते आहे.

सोलापूर - हैद्राबाद विमानसेवा सुरु

सोलापूर गोवा आणि सोलापूर मुंबई विमानप्रवास सुरु झाल्यानंतर आता सोलापूर हैद्राबाद ही विमानसेवा देखील सुरु होतेय. सोलापूर गोवा विमानसेवा देणाऱ्या Fly 91 या कंपनीद्वारेचं सोलापूर हैद्राबाद विमानसेवा देखील सुरु होतेय. 17 एप्रिल रोजी सोलापूर ते हैद्राबाद विमानसेवा सुरु होणार असून त्यासाठी तिकीट बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. साधारण 3800 रुपये सोलापूर हैद्राबाद विमानसेवेसाठी प्रवाशांना मोजावे लागणार आहे. सुरुवातीला आठवड्यातील 5 दिवस ही विमानसेवा सुरु राहिलं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे एकूण 5 दिवस ही विमानसेवा चालेल. दुपारी 3.20 विमान सोलापुराहून हैद्राबादच्या दिशेने निघेल ते 4.25 मिनिटांनी हैद्राबादला पोहोचेल तर 4.50 मिनिटांनी हैद्राबादहून निघणारे विमान 5.50 वाजता सोलापुरात येईल.

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात भीषण अपघात

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात भीषण अपघात

काल मध्यरात्री घडला भीषण अपघात

भरधाव कार डिव्हायडर आणि सुरक्षा भिंतीला धडकली

अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती

सर्व जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू

- राजीव गांधी भवन परिसरात संतापजनक प्रकार, चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर पतीचा हल्ला

- भररस्त्यात बेदम मारहाण करत पत्नीच्या अंगावर थेट फॉर्च्युनर कार घातली

- पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात खळबळ

- पत्नीच्या इंस्टाग्राम चॅटवरून पतीचा संताप अनावर, धडकेत पत्नी गंभीर जखमी, नागरिकांनी केली मदत

- पती विरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल, सराईत गुन्हेगार पती समीर पठाण नाशिक पोलिसांच्या अटकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

- नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषेदेला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

- देश विघातक कारवाया, हिंदू धर्म, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन, साधू महंतांच्या अपेक्षा आणि अन्य मुद्द्यांवर संत परिषदेत सुरू आहे मंथन

- देशभरातील साधू महंतांचे प्रमुख आखाडे आणि संप्रदायाचे ३०० हून अधिक महंत तसच प्रतिनिधी परिषदेत सहभागी

LLB परीक्षेत शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; दोषींवर कारवाई करण्याची आमदार राहुल कुल यांची मागणी

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेण्यात आलेल्या LLB-3 Year CET परीक्षेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.

२ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या LLB-3 Year CET ऑनलाइन परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान विभागात "शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते" असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या थोर राजांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते आणि ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली, अशा थोर महापुरुषाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे आणि एकेरी भाषेत होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. या प्रकारामुळे तमाम शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परीक्षार्थींनी यासंदर्भात आमदार कुल यांच्याकडे निवेदन देऊन दाद मागितली होती.

पुण्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर अनेक नेते अँक्टिव्ह

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात घेतली प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली

बैठकीत तात्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना

शहरातील पाणी साठणाऱ्या संवेदनशील भागांवर लक्ष केंद्रित करत तातडीच्या उपायांसोबतच दीर्घकालीन नियोजनावरही बैठकीत सखोल चर्चा

भविष्यात अतिवृष्टी झाल्यास शहरात पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज व्यवस्थेवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची सूचना

उदगीरच्या मुसा नगर गांधीनगर भागात रात्री दोन गटात दगडफेक.

लातूरच्या उदगीर शहरातील मुसा नगर गांधीनगर भागात रात्री दोन गटात दगडफेक झाली आहे, अचानक दगडफेक झाल्यामुळे परिसरात भीतीचा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं, दरम्यान दगडफेकीचे कारण अद्याप समोर आले नाही, मात्र पोलिसांनी या भागात मोठा फौज फाटा तैनात केला होता, तर काही तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. रस्त्यावर दगडांचा मोठा खच देखील साचला आहे. तर या घटनेमागचं नेमकं कारण आता पोलिस तपास करत आहेत

भोंदू अशोक खरात प्रकरणाला वेगळं वळण

भोंदू अशोक खरातचा मुलगा गायब, मुलाचा फोनही नॉट रीचेबल

SIT कडून भोंदू खरातच्या मुलाची २ दिवस चौकशी

मात्र चौकशीनंतर तपास यंत्रणांची कोणतीही परवानगी न घेता खरातचा मुलगा शहरातून गायब, सूत्रांची माहिती

मुलाने शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं अनिवार्य होतं

मात्र कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातच्या मुलाने पलायन केल्याची सूत्रांची माहिती

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ज्वारीच पिक भुईसपाट

धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.कळंब तालुक्यातील माळकरंजा शिवारात सलग दोन दिवस झालेल्या अवकाळीमुळे ज्वारी पिकाच मोठ नुकसान झाल आहे,शेतकऱ्याच्या ज्वारीची शेती भुईसपाट झाल्याने पिक मातीमोल झाल आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असुन शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

 मध्य प्रदेशमध्ये इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

मध्य प्रदेश: अनूपपुर जिल्ह्यातील कोतमा येथे एक इमारत कोसळली. मलब्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मध्य प्रदेशचे मंत्री दिलीप अहिरवार यांनी सांगितले, "ही अत्यंत दुःखद घटना आहे... मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला आणि आम्हालाही निर्देश दिले आहेत... मी आणि मध्य प्रदेशचे मंत्री दिलीप जायसवाल घटनास्थळी उपस्थित आहोत. संपूर्ण प्रशासन येथे कार्यरत आहे. बचावकार्य सुरू आहे. मलब्यात दबलेल्या सुमारे ५ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे आणि उर्वरित ३ जणांचे उपचार सुरू आहेत... घटनेची पूर्ण चौकशी करण्यात येईल..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulkand Paan Sharbat Recipe : उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंकला करा टाटा, बाय बाय; प्या गारेगार 'गुलकंद पान सरबत', पोटाला मिळेल थंडावा

Crime News : धक्कादायक! विवाहित महिलेकडून १६ वर्षीय मुलावर बलात्कार; हॉटेलवर नेलं अन्...

Navi Mumbai: दारूसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, लाथाबुक्क्या अन् काठीने बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

खासगी आणि सरकारी कार्यालयांना आठवड्यातून २ दिवस सुट्टी; इंधन तुटवड्यादरम्यान नेपाळ सरकारचा मोठा निर्णय

Nakshatra Gochar: मंगळ आणि शुक्राच्या गोचरमुळे बदलणार ४ राशींचे भाग्य; घरात येणार धन-दौलत अन् सूख-समृद्धी

SCROLL FOR NEXT