आज दुपार नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीला होणार रवाना
उद्या दिवसभर असणार बारामतीत
आज दुपारी पुण्यात येणार आणि त्या नंतर बारामतीला होणार रवाना
सुनेत्रा पवार अधिवेशनानंतर घेणार दर आठवड्याला बैठका
शेतात कापूस वेचायला गेलेल्या शेतमजूर महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील आदर्श खेडा गावातील शेतशिवारातील ही घटना असून, सुनीता शामराव भोयर (४५) असे मृतक मजूर महिलेचं नाव आहे. या घटनेने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले; परंतु वनविभागाचे एकही अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यात ही दुसरी घटना आहे.
लोणार तालुक्यातील चिखला गावात पुतळा वादानंतर परिस्थिती हळूहळू निवळत असली तरी त्याचा परिणाम स्थानिक जिल्हा परिषद शाळेवर दिसून येत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती निम्म्यावर आली आहे.
गावात 2 मार्चपर्यंत जमाबंदी लागू करण्यात आली असून, दोन्ही गटांच्या तक्रारींवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. जनजीवन सुरळीत होत असतानाही पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, परीक्षा तोंडावर आल्याने शिक्षकांनी पालकांना विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवण्याचे आवाहन केले आहे.
डीजीसीए कडून प्राथमिक अहवाल आज सादर करण्यात येणार
अजित पवार यांच्या विमान अपघात घातपात असल्याचा आरौप होत असल्याने अहवाल काय यांची प्रतीक्षा
आज अहवाल येणार असल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची माहिती
- नाशिक महापालिकेकडून मुंबई नाका परिसरातील मालती आयव्हिएफ सेंटरची तपासणी
- संबंधित कागदपत्रे ताब्यात घेत लेखी खुलासा करण्यासाठी बजावली नोटीस
- एका महिलेचा अनेकवेळा बीज दान आणि लाखो रुपयांना तो विक्री केल्याचा आहे संशय
- सखोल चौकशीनंतर पुढील कारवाई काय होते याकडं लक्ष
नेर येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वस्तीगृहात एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निकृष्ट व भेसळयुक्त तूप पुरविण्यात आल्याचा प्रकार विद्यार्थ्यांनी आणला उघडकीस
विद्यार्थ्यांनीच पुढे येत ही बाब आणली समोर
तुपाची चव, वास आणि दर्जा संशयास्पद असल्याची तक्रार वारंवार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती विद्यार्थ्याकडून तक्रारी विद्यार्थ्यांनी दिली माहिती
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
अन्ननमुने तपासणीसाठी पाठवावेत विद्यार्थ्यांची मागणी
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथे महावितरणच्या डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आठवडी बाजाराच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रोड क्रॉस वीजवाहिनीला जड वाहनाचा धक्का लागून शॉर्टसर्किट झाल्याने डीपी पेटली आणि केबल व फ्युज बॉक्स जळून खाक झाले... सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, उपकेंद्रातील अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात आज सकाळी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी सोपान चोपडे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांसमोर अचानक बिबट्या आल्याने एकच गोंधळ उडाला. मजुरांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या जवळच दबा धरून बसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतल्या जात आहे, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
पालघर - बंद दगड खाणीतील पाण्यात पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू . पालघरच्या मनोर जवळील टाकवहळ येथील दुर्दैवी घटना . संध्याकाळच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेल्या जिग्नेश विजय पवार वय वर्ष 8 आणि आयुष मुकेश पवार वय वर्ष 15 यांचा दुर्दैवी मृत्यू . पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मृत्यू झाल्याची माहिती . दोन्ही मुलं मध्य प्रदेशातील इंदूर येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती . एकाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश तर दुसरा मृतदेह शोधण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू.
सातारा शहर आणि उपनगर परिसरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये पसरणारी दहशत याचा बिमोड करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडून सातारा शहर पोलीस आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील विविध परिसरात काही टवाळखोर तरुण उघडपणे कोयते आणि इतर घातक शस्त्र यांचा वापर करून दहशत माजविण्याचे प्रयत्न करत आहेत. या गुंडांच्या दहशतीमुळे महिला आणि विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून यामुळे शहरामध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अशा टवाळखोरांवर कठोर कारवाई करून सातारा शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करावा, अशी मागणी भाजपकडून निवेदनाद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
- जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत सुमारे 6 कोटी 25 लाख रुपये एवढी आहे...
- ओडिशा ते मध्य भारत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, म्होरक्यासह चौघांना केली अटक
- आंध्र प्रदेशवरून मध्य प्रदेशाच्या सीमेवर जाणाऱ्या एका बोलेरो वाहनातून 729 किलो गांजा जप्त, हा गांजा आल्यामध्ये लपवून ठेवला होता
- तर भागीमहारी पथकर नाक्यावर ओडीशा मधून आलेल्या एका ट्रक मधून 522 किलो गांजा डीआरआय केला जप्त
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर गावात बुऱ्हानपूर तालुक्यातील हेला पाणी या गावातील जवळपास 100 च्या वर जमावाने येऊन दगडफेक केली व काही घरांची तोडफोड केली यामुळे या गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे तात्काळ जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उमापूर येथील आदिवासी समाजाच्या एका गटातील (कोरकू )तरुणाने बुरानपुर तालुक्यातील हेलापाणी येथील आदिवासी समाजाच्या दुसऱ्या गटातील तरुणीशी (भिलाला )चार दिवसापूर्वी पुणे येथे विवाह केला. यावरून वाद होऊन हेलापाणी येथील मुलीकडच्या गटातील लोकांनी येऊन उमापूर गावात मोठा गोंधळ घातला. यावेळी दगडफेकही झाली व अनेक घरांची तोडफोड ही करण्यात आली . जळगाव जामोद पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी उमापूर गावात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र गावात मोठा तणाव असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आहे विशेष म्हणजे या गावचा आज होळीनिमित्त भोगऱ्या बाजार देखील होता त्यामुळे गावात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमा झाले होते. दगडफेकीत व तोडफोडीत काहीजण जखमी झाल्याची ही प्राथमिक माहिती आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या मसुचीवाडी येथे कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे.भर दिवसा कोल्ह्याने गावातल्या सात जणांवर हल्ला चढत जखमी केल्याच घटना घडली आहे. एका महिलेचा सात जणांवर हल्ला चढवत चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे,एका मागून एक अशा पद्धतीने या कोल्ह्याने ग्रामस्थांना लक्ष केलय जखमींना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे,या घटनेनंतर गावात भीतीच वातावरण पसरला असून ग्रामस्थांकडून कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे,मात्र कोल्ह्याच्या या हल्ल्याच्या घटनेने गावात कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे.
- नाशिकच्या ओझर विमानतळावर हवाई सुंदरीची तब्येत बिघडल्याने बंगळुरू विमानाला ५ तासांचा विलंब
- उड्डाणापूर्वीच हा प्रकार घडल्याने झाला होता गोंधळ
- मेडिकल इमर्जन्सी जाहीर करत प्रवाशांना पुन्हा टर्मिनलमध्ये परत आणण्यात आले
- हवाई सुंदरीवर उपचार करत आराम दिल्यानंतर तब्बल ५ तासांनंतर बंगळुरूकडे विमान झेपावले
- मात्र उड्डाणासंबंधी स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये झाला होता गोंधळ
बदलापुरात एका स्कुल बस चालकानं 12 वर्षीय विद्यार्थिनीचा स्कुल बसमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरटीओच्या पाहणीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
ज्या स्कुल बसमध्ये हा प्रकार घडला, त्या बसचं फिटनेस, इन्शुरन्स आणि परमिट संपल्याचं उघड झालंय. त्यामुळं ही टेम्पो ट्रॅव्हलर बस अनधिकृतपणे स्कुल बस म्हणून चालवली जात असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं आरटीओकडून या अवैध स्कुल बसवर सुमारे 20 हजार रुपयांचा दंड लावण्यात आलाय. तसंच या स्कुल बसचं आरसी रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येणार असून आरोपी बसचालक जयेश मुने याचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील रद्द केलं जाणार असल्याची माहिती कल्याण आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक चैतन्य बकरे यांनी दिली आहे. तसंच अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये आता अवैध स्कुल बस आणि स्कुल व्हॅनवर कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.
नांदेडच्या किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथील एका परिक्षा केंद्राजवळ अज्ञात व्यक्तीने भोंगा लावून प्रश्नांची उत्तर सांगीतल्याची तक्रार केन्द्र प्रमुखाने पोलिस ठाण्यात केली आहे.दहेली तांडा येथे स्वर्गीय संगीतादेवी आश्रम शाळेत बारावी परीक्षा सुरु आहे.25 फेब्रुवारी रोजी परीक्षा केंद्राच्या बाजूला असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर कोणीतरी भोंगा लावला आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तर त्या भोंग्यातून सांगतली अशी तक्रार केन्द्र प्रमुख सुबोध थोरात यांनी केली.त्यावरुन सिंदखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाने अद्यावत एमआरआय सेंटर उभारले आहे.मात्र मागील आठ महिन्यांपासून आरोग्य संचालनालयाची परवानगी न मिळाल्याने हे एमआरआय सेंटर धुळखात पडले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेले एमआरआय सेंटर असताना देखील रुग्णांना खाजगी एमआरआय सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अद्ययावत एमआरआय सेंटर उभारले आहे. मात्र हे एमआरआय सेंटर सुरू करण्यासाठी आरोग्य संचालनाची परवानगी आवश्यक असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून हे एमआरआय सेंटर परवानगी अभावी कुलूप बंद अवस्थेत आहे.
भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात दक्षिण सोलापूर मतदारसंघात पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.सोरेगाव ते मंद्रूप दरम्यानचे पुरावे आणि व्हिडिओ क्लिप पोलिस आयुक्तांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.पाहणी होऊनही कारवाई न झाल्याने संशय व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील डांगे चौक येथे काल रात्री एका मध्य धुंद आटो रिक्षा चालकाने भर रस्त्यात ऑटो रिक्षा आडवी लावून राडा घातला आहे. डांगे चौक येथील महाराजा हॉटेल समोर जवळपास अर्धा तास ह्या ऑटो रिक्षा चालकाने राडा घातल्याने त्या ठिकाणी रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. आता ह्या मध्य धुंद ऑटो रिक्षा चालकावर पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सातत्याने घटत असलेल्या किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली.
परिणामी पहाटेचा गारवा कमी झाला असून, आज दिवसभरात कमाल तापमानातही वाढ झाल्यामुळे दुपारचा उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता.
लोहगाव येथे सर्वाधिक ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
जिल्ह्यातील शिरूर, कुरवंडे यासह एनडीए आणि हवेली परिसरात गेल्या २४ तासांत किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली आल्यामुळे पहाटेचा गारवा वाढला होता.
मागील आठवड्यात शहरासह जिल्ह्यात ऊन, ढगाळ वातावरण आणि गारवा असा हवामानाचा लपंडाव सुरू आहे.
शिखांचे नववे गुरु, "हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली. नवी मुंबईतील सेंटर पार्क इथे हा कार्यक्रम भव्यदिव्य असा होताना दिसणार आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस इतर राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणारे त्यामुळे प्रशासनाचे दृष्टीने जयत तयारी करण्यात आलेले आहे
नवापूर तालुक्यातील गंगापूर परिसरात 55 वर्षीय महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. 24 फेब्रुवारी रोजी घरातून बाहेर पडलेली महिला रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेत विसरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सखोल तपास सुरू करत गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत 25 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली. हा आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.