Shruti Vilas Kadam
मखाणे कमी कॅलरीचे असतात, तर शेंगदाण्यांमध्ये कॅलरी जास्त असल्याने वजन कमी करताना मखाणे अधिक योग्य ठरतात.
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन जास्त असते, जे स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते.
शेंगदाण्यांमध्ये हेल्दी फॅट्स असले तरी प्रमाण जास्त असल्याने वजन कमी करताना मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
मखाणे हलके आणि फायबरयुक्त असल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि ओव्हरइटिंग टाळता येते.
मखाणे पचायला हलके असतात, तर शेंगदाणे काही लोकांना जड जाऊ शकतात.
वजन कमी करताना मखाणे रोस्ट करून खाणे हा अधिक हेल्दी स्नॅक पर्याय ठरतो.
वजन कमी करण्यासाठी मखाणे अधिक योग्य, पण शेंगदाणेही मर्यादित प्रमाणात घेतल्यास फायदेशीर ठरू शकतात.