Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च निझर्नेश्वरमध्ये मुक्कामी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२६, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, अवकाळी पाऊस, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च निझर्नेश्वरमध्ये मुक्कामी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च...

आंदोलक आज संगमनेर तालुक्यातील निझर्नेश्वर येथे मुक्कामी...

निझर्नेश्वर देवस्थानच्या प्रांगणात आंदोलकांचा मुक्काम...

उद्या सकाळी लाँगमार्च लोणी गावाच्या दिशेने मार्गक्रमण करणार...

लोणी हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे गाव...

विखे पाटलांच्या गावात मांडणार ठिय्या...

प्रलंबित मागण्यांबाबत उद्या सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष..

‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी

‘शाळा दत्तक धोरणा’वरून पालिका सभेत जोरदार खडाजंगी पाहायली

टीईटी न उत्तीर्ण शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, असा आरोप हैदर अली अस्लम शेख यांनी केला

धोरण रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने नामंजूर

मध्य रेल्वे होळीसाठी २० अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार

मध्य रेल्वे द्वारे येत्या होळी सणात प्रवाशांच्या सोयीसाठी २० अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.

अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली गडचिरोली जिल्ह्यातील महिलांची फसवणूक

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या चामोर्शी नगर पंचायतीचे भाजपचे नगरसेवक पिपरे दाम्पत्याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आमरण उपोषण सुरू आहे. चार दिवस चाललेल्या या आंदोलनादरम्यान चार महिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात जुन्या वाहनांना प्रवेश बंदी? राज्य सरकारकडे पाठवला प्रस्ताव

शहरातील वाढते प्रदूषण आणि वाहतूक कोंडी यावर तोडगा काढण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन मोठा निर्णय घेणार आहे.

माझ्यावरील जबाबदारी कठीण पण अशक्य नाही; संपूर्ण राष्ट्रवादीच माझा परिवार – सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त केल्या. “माझ्यावर आलेली जबाबदारी कठीण असली तरी अशक्य नाही. केवळ पार्थ आणि जयच नव्हे, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच माझा परिवार आहे,” असे त्या म्हणाल्या.
पक्षाचे मार्गदर्शक अजित पवार यांनी शाहू–फुले–आंबेडकरांचे विचार जपले असून, त्याच विचारांच्या आधारे पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संघटना मजबूत करणे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दादांसारख्या वादळासोबत ४० वर्ष संसार केला... - सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पती अजित पवार यांच्याबद्दल बोलताना भावूक झाल्या. “दादांसोबत ४० वर्षांचा संसार केला आहे. त्यांच्या सोबत मिळालेल्या अनुभवाच्या बळावर आणि तुमच्या साथीने आता हा कार्यभार सांभाळणार आहे,” असे त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, पक्ष आणि समाजासाठी काम करताना समाजातील कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न, महिला, शेतकरी, युवक आणि वंचित घटकांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संघटना मजबूत करून जनतेचा विश्वास अधिक दृढ करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्ष; संघटना मजबूत करण्याचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. 'पक्षाची घडी मजबूत करणे हेच माझे पहिले ध्येय असेल,' असे त्या म्हणाल्या. यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, 'अजित दादांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. दादांनी पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत सर्वांनी पाहिली आहे.' पक्षातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात तळागाळापर्यंत पोहोचून संघटन विस्तारावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

धाराशिवमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जप्ती; ८७ कोटी मोबदल्यावरून मोठा वाद

धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार यांच्या खुर्चीवर न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली. उमरगा येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीसाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी संपादित केलेल्या ११ एकर जमिनीचा मोबदला अद्याप न दिल्याने ही कारवाई झाली. न्यायालयाने ८७ कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले असतानाही पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारवाई न झाल्याने प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले होते. न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, टेबल व एसी जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतर वकील व कर्मचारी कार्यालयात दाखल झाले. मोबदला मार्चपर्यंत देण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली; मात्र जप्तीवर वकील ठाम राहिल्याने कार्यालयात गोंधळ निर्माण झाला.

पश्चिम बंगालमध्ये आदिवासी समुदायांचा मोर्चा उधळला; पोलिसांकडून वॉटर कॅनन व अश्रुधुराचा वापर

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे आदिवासी समुदायांनी कथित छळ आणि अत्याचाराच्या घटनांविरोधात उत्तर कन्या या राज्य सरकारच्या शाखा सचिवालयाकडे काढलेला निषेध मोर्चा पोलिसांनी उधळून लावला. मोर्चा पुढे जाऊ नये म्हणून पोलिसांनी वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर केला. आंदोलकांनी आपल्यावर सातत्याने छळ आणि अन्याय होत असल्याचा आरोप करत न्यायाची मागणी केली होती. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. कारवाईदरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांना मागे हटवण्यात आले. घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

वाढत्या तापमानाचा धुळ्यातील जलसाठ्यांवर परिणाम; पाणी पातळीत घट

चार महिन्यांच्या कडाक्याच्या थंडीनंतर गेल्या १० ते १२ दिवसांत धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा सुमारे ४ अंशांनी वाढला आहे. वाढत्या उन्हाळ्याचा थेट परिणाम जलप्रकल्पांतील पाण्यावर होत असून, बाष्पीभवनामुळे जलसाठ्यांत घट होत असल्याचे चित्र आहे. मागील दहा दिवसांत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यांत सुमारे २ ते ४ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाल्याने डिसेंबरअखेर जलप्रकल्पांमध्ये चांगला साठा होता. काही प्रकल्प ऑक्टोबरमध्ये १०० टक्के भरले होते. मात्र सातत्याने होणारा विसर्ग आणि पाण्याच्या वापरामुळे साठ्यात घट होत आहे. भविष्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने जलसाठ्यांवरील ताण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

धुळे–सुरत महामार्गावर मोठी दुर्घटना; गॅस टँकरला भीषण आग

धुळे सुरत महामार्गावर साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाजवळ गॅसचा टँकरने अचानक पेट घेतल्याने मोठी दुर्घटना

गॅसचा टँकर पूर्णतः जळून खाक झाला असून परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले

प्रशासनातर्फे आग विझविण्याचा अतोनात प्रयत्न सुरू

टँकर मधील चालक व वाहक या दुर्घटनेत दगावण्याची शक्यता

धुळे सुरत महामार्गावर घटनास्थळा वाहनांच्या लांबच लांब रांगा

अहिल्यानगरच्या नगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ ते ५ जण गंभीर जखमी

अहिल्यानगर शहरातील नगर–मनमाड महामार्गावरील सावेडी नाका परिसरात भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ गाडीने तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक मोटारसायकल, पॅगो रिक्षा आणि क्विड कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर स्कॉर्पिओ गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे काही काळ नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात २.६० कोटींचे संशयास्पद व्यवहार,

माझ्या अकाऊंटमध्ये २ कोटी ६० लाख रुपये कसे आले? याचा सखोल तपास करा,अशी मागणी करत डोंबिवलीतील विद्यार्थिनी निधी तिवारी हिने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र तक्रारीनंतरही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत मनसेने या प्रकरणात उडी घेतली आहे.

महाड MIDC मधील एम्बॉलो कंपनीला पुन्हा आग..

* काही दिवसांपूर्वीच लागली होती आग..

* आज पुन्हा आगीची घटना, परिसरात खळबळ..

* अग्निशमन दल घटनास्थळी दाखल..

•आगीचे कारण अद्याप अस्पष्ट..

रोहित पवार पुण्यातील सीआयडी ऑफिसला पोहचले

काही वेळापूर्वी सीआयडी चे पत्रकार परिषद झाली आहे

रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी केलेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी आले आहे

राजुरहून अहिल्यानगरच्या दिशेने निघालेला लाँगमार्च लोणीकडे रवाना

संगमनेर येथून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावाकडे रवाना...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च पालकमंत्री विखे पाटलांच्या गावात धडकणार...

हजारो आंदोलक पालकमंत्री विखे पाटलांच्या लोणी गावात देणार ठिय्या...

आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी 148 किलोमीटरचा लाँगमार्च...

काल आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा...

मात्र काही मागण्यांबद्दल अद्यापही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यात जोरदार आंदोलन

सन 2014 मध्ये मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानिषेधार्थ मुंब्रा येथे विरोधी पक्ष नेते शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शानू पठाण यांनी, मुस्लिमांना आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दिला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून, त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानिषेधार्थ दुपारचा नमाज अदा केल्यानंतर दारूल फलाह मशिद येथे हे आंदोलन करण्यात आले.

शिक्षकाला मारहाण प्रकरणी १२ जणांवर अखेर गुन्हा दाखल

सविंदने येथील शाळेत आध्यायनाचे कार्य करणा-या नितीन चव्हाण या शिक्षकाला कवठे येथील १२ तरुणांनी घरातुन उचलुन घेऊन जाऊन लाठ्या काठ्या आणि हॉकी स्टिक मारहाण झाली होती या मारहाणीचा ग्रामस्थांसह विद्यार्थींनी निषेध व्यक्त करत गावबंदचे आंदोलन केलं होतं आता या प्रकरणी शिरुर पोलीसांनी शिक्षक नितीन चव्हाण यांच्या तक्रारीवरुन १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही त्यामुळे प्रकरणी शिक्षकाच्या मारहाणीचे कारणही स्पष्ट झालेले नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाबाबत सीआयडीची पत्रकार परिषद सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाबाबत सीआयडी ची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पाषाण बाणेर रस्त्यावर असलेल्या सीआयडी ऑफिसच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आह.आमदार रोहित पवार काही वेळात सीआयडी कडून माहिती घेण्यासाठी येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीआयडी ऑफिसच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Nagpur: फी न भरल्याने विद्यार्थिनीला काढणे अयोग्य, नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्वाळा

नागपूर -

- फी न भरल्याने विद्यार्थिनीला काढणे अयोग्य मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्वाळा

- ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे...

- न्या. अनिल किलोर, न्या. राज वाकोडे यांचा आदेश

शाळेचा निर्णय बेकायदेशीर ठरवला

- २३,९०० रुपयांच्या थकबाकीवरून शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला होता... तो दाखला आत न्यायालयाचा निर्णयाने रद्द करण्यात आला...

Dhule: धुळ्यातील चाळीसगाव रोडवर अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पुरवठा विभागाचा छापा

धुळे -

धुळ्यातील चाळीसगाव रोडवर अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर पुरवठा विभागाचा छापा

7 सिलिंडरसह साहित्य जप्त

एका जीवघेण्या अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा जिल्हा पुरवठा विभागाने पर्दाफाश केला

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत यांच्या पथकाने अमोल डेअरीच्या मागील बाजूस असलेल्या या अड्ड्यावर धडक कारवाई केली

Virar: विरारमध्ये कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी 

विरार-

विरारच्या नवापूर येथील मोथमहल पाडा येथे मंगळवारी सकाळी 4 वाजताच्या सुमारास एका चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या अपघातात कोणीही गंभीर जखमी झालेला नाही.

घरच्या समोर उभ्या असलेल्या गाड्यांना ही गाडी येऊन जोरदार धडक दिली. या घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेबाबत अर्नाला पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

Baramati: FIR दाखल करून घेतली नाही, आम्ही कोर्टात जाणार - युगेंद्र पवार

बारामती -

युगेंद्र पवार -

अजित पवार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांचा नकार

या ठिकाणी एफआयआर दाखल होईल असा मला वाटलं होतं

मात्र आमची निराशा झाली

कुठली उत्तरं पोलिसांनी आम्हाला दिली नाहीत

त्यांच्यावर कुठला दबाव आहे का

आवाज उठवण्यासाठी आम्ही कोर्टात धाव घेऊ

ज्या अपेक्षेने मी पोलीस स्टेशनला आलतो ती अपेक्षा पूर्ण झाली नाही

Dhules: शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

धुळे -

शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

शिंदखेडा शहराजवळील विरदेल रस्त्यावर धावत्या ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक यंत्रणेत अचानक बिघाड झाल्यामुळे ट्रॅक्टरची कापसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावरच उलटली

ट्रॅक्टर मध्ये तब्बल 39 क्विंटल कापूस भरून शेतकरी कापूस विक्रीसाठी जात असताना झाली दुर्घटना

भर रस्त्यामध्ये ट्रॅक्टर उलटल्यामुळे वाहतुकीचा काही काळ झाला होता खोळंबा

ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला असून मोठी दुर्घटना व जीवित हानी टळली

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च पालकमंत्र्यांच्या गावाकडे कूच करणार

अहिल्यानगर -

लाँगमार्च पालकमंत्र्यांच्या गावाकडे कूच करणार

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँगमार्च पालकमंत्री विखे पाटलांच्या गावात धडकणा

थोडाच वेळात आंदोलक संगमनेरहून लोणीच्या दिशेने पायी चालत निघणार

दुपारपर्यंत सरकारच्या निर्णयाची बघितली वाट

मात्र सरकारकडून कुठलाही निरोप न आल्याने लाँगमार्च लोणीच्या दिशेने निघणार

काल आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा

मात्र काही मागण्यांबद्दल अद्यापही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच राहणार

हजारो आंदोलक पालकमंत्री विखे पाटलांच्या गावात देणार ठिय्या

आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी राजूर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा लाँगमार्च

Amravati: अमरावती महानगरपालिकेच्या उद्यानात चार दिवसीय गुलाब उत्सवाचे आयोजन

अमरावती -

अमरावती महानगरपालिकेच्या उद्यानात चार दिवसीय गुलाब उत्सवाचे आयोजन

अमरावतीकरांना गुलाबाच्या वेगवेगळ्या प्रजातीची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने गुलाब उत्सवाचे आयोजन...

गार्डन मध्ये ठेवण्यात आलेली आहेत वेगवेगळ्या प्रजातीचे शेकडो गुलाबांचे झाडे.....

गुलाब उत्सव संपल्यानंतर या झाडांचे याच ठिकाणी प्रत्यारोपण केले जाणार...

महापौर श्रीचंद तेजवानी आणि आयुक्त सोम्या शर्मा यांच्या हस्ते गुलाब प्रदर्शनाचे उदघाटन

Amravati: अमरावतीमध्ये कार दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी 

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव देवगाव रोडवर भीषण अपघात

स्विफ्ट कार व दुचाकीची समोरासमोर जबर धडक..

या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर 5 जण गंभीर जखमी

जखमींना तातडीने धामणगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल..

अपघाताच्या घटनेचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहेत

मलकापूर मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

मलकापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासणाच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार मका, तूर व कापूस खरेदी केली जात नसल्याचा आरोप करत संघटनेने प्रशासनाचा जाहीर निषेध केला

चांदवडमध्ये कांदा उत्पादक आक्रमक,मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रोखला

कांदा, मका व शेतीमालाच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने नाशिकच्या चांदवडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.यावेळी शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली,कांद्याला प्रतिक्विंटल ३ हजार रुपये हमी भाव द्यावा,विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 1500 अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी 4 दिवसांपासून उपोषण सुरू केले.त्यात काही शेतकऱ्यांची प्रकृती खालावली असे असताना शासन लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण होऊन कांदा लिलाव काही काळ बंद ठेवत शेतकरी मुंबई-आग्रा महामार्गावर उतरत अर्धा तास महामार्ग रोखून धरला

संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन फेटाळला

राज्यातील मका उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा; 17 हजार क्विंटल मका खरेदी करण्यास केंद्राची परवानगी

17 हजार क्विंटल मका खरेदी करण्यास केंद्राची परवानगी

राज्यातील मका उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा

राज्यातील हमीभाव केंद्रांना दिलेले उद्दीष्ट पूर्ण झाल्या नंतर मक्याची हमीभाव खरेदी बंद होती

शेतकर्यांच्या मागणी नंतर राज्याला 17 हजार क्विंटल मका खरेदी करण्यास परवानगी

मक्याची हमीभावाने खरेदी होणार असल्याने बाजारात मक्याचे भाव वाढणार

अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी बारामती पोलिसांचा गुन्हा दाखल करून घेण्यास नकार

अजित पवार अपघातप्रकरणी एक तासाच्या चर्चेनंतरही बारामती पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास तयार नाहीत.

गुन्हा दाखल न करण्यावर पोलीस ठाम

रोहित पवार आणि पोलिसांची आत मध्ये शाब्दिक चकमक

चांदवड येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको

मुंबई-आग्रा महामार्गावर सुरू झाला रास्ता रोको आंदोलन

कांद्याला 3000 हजार रुपये हमी भाव मिळावा,कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळावे,

मका पिकाचे अनुदान लवकर मिळावे

अशा विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको सुरू झाला आहे

शिंदे सेनेच्या आमदारांचा मोठा निर्णय; VSR कंपनीचं विमान वापरणार नाही

शिंदे सेनेच्या आमदारांचा मोठा निर्णय

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणानंतर VSR कंपनीचं विमान वापरणार नाही

अजित पवार यांच्या विमान अपघात चौकशी मागणीसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करून दोषींवर एफ आय आर दाखल करून सत्य देशा समोर आणावं या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे शहराच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन

बारामती पोलीस स्टेशनमध्ये युगेंद्र पवार, रोहित पवार दाखल

बारामती पोलीस स्टेशन मध्ये युगेंद्र पवार रोहित पवार गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल

अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी DGCA कंपनीच्या विरोधात रोहित पवार तक्रार दाखल करणार

सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त पंढरपुरात पुतळा पूजन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज पंढरपूरमध्ये सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सावरकर प्रेमी मंडळ यांच्यावतीने मोहन मंगळवेढेकर, अभयसिस गावकर नगरसेवक ओंकार जोशी यांच्या हस्ते पुतळापूजन संपन्न झाले. यावेळी आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जयोस्तुते हे सामुदायिक गीत सादर केले. यावेळी घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.

Ratnagiri: रत्नागिरीत सॅटलाईटच दर्शन...

जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल रात्री आकाशामध्ये चमकणाऱ्या वस्तू दिसल्या. त्यामुळे अनेकांमध्ये कुतूहल जागे झाले. एका माग चमकत जाणाऱ्या वस्तू नेमक्या काय आहेत? अशी चर्चा रात्रीपासून जिल्हाभरामध्ये रंगलीय. दरम्यान मस्क यांच्या स्टार लिंक कंपनीद्वारे सॅटलाईटच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवली जाणार आहे. त्याच उपग्रहाचे हे व्हिडिओ असल्याचं खगोल अभ्यासकांनी सांगितले आहे. पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर हे सॅटॅलाइट रात्रीच्या वेळी दिसतात असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील कोकणासह देशातल्या काही भागांमध्ये पद्धतीने हे उपग्रह दिसून आले होते.

Kolhapur: कोल्हापूरच्या देवाळेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

कोल्हापूरच्या देवाळेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

11 लाख 40 हजारांच्या विदेशी दारूसह 28 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त

देवाळे इथे टाकलेल्या छापा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सांगलीतही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शाहुवाडी पथकाची छापेमारी

सांगलीतील दिग्विजय पाटील, प्रफुल्ल पडिया आणि रविंद्र सावंत या तिघांवर गुन्हा दाखल

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भारत युएई संयुक्त समितीवर निवड

माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भारत संयुक्त अरब अमिराती या संसदीय मैत्री समितीवर निवड झाली आहे. ही निवड लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे.

निवडी नंतर मोहिते पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली.

सोलापूरच्या स्थानिक राजकारणात भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेणारे मोहित पाटील यांना केंद्र सरकारने मोठी संधी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भंडारा जिल्ह्यात वाळू धोरणाचा फज्जा...

सरकारनं सर्वसामान्यांसाठी 'स्वस्त वाळू धोरण' आणल्याचा गाजावाजा केला खरा, पण लाखांदूर तालुक्यातील मोहरणा आणि इटान रेती घाटावर या धोरणाचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. नियमांना केराची टोपली दाखवत इथं वाळूचा काळा बाजार जोरात सुरू असून, आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शासकीय नियमांनुसार रेती घाटावर CCTV कॅमेरे असणे अनिवार्य आहे. मात्र, मोहरणा आणि इटान घाटावर कॅमेऱ्यांचा पत्ताच नाही. धक्कादायक बाब म्हणजे, वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सना GPS यंत्रणा लावणे बंधनकारक असताना, या नियमाला हरताळ फासून शेकडो ट्रॅक्टर विना जीपीएस धावत आहेत. ज्या ठेकेदाराला हा घाट मिळाला आहे, त्यानं चक्क वन विभागाचे झुडपी जंगल आणि गावठाणच्या जागेवर वाळूचे मोठे ढीग साचवले आहेत. शासकीय जागेवर असा अवैध कब्जा करून निसर्गाची हानी केली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. शासनाकडून जेवढे ट्रॅक्टर मंजूर आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ट्रॅक्टर नदीपात्रात उतरवून वाळूची लूट सुरू आहे. या बेकायदेशीर उपशामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. प्रशासनाच्या आशीर्वादानं सुरू असलेल्या या बेसुमार उपशामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट इशारा दिला आहे.

Kolhapur: ‘गोकुळ’ निवडणुकीचा बिगुल; ९ मार्चपासून ठराव प्रक्रिया

कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ठराव संकलन प्रक्रिया ९ मार्चपासून सुरू होणार असून, तालुकानिहाय संस्थांची यादी २ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश विभागीय उपनिबंधक (दुग्ध) राजकुमार पाटील यांनी दिले आहेत. ४ मे २०२६ रोजी विद्यमान संचालकांची मुदत संपत असून, तीच अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे. ४ मे २०२३ पूर्वी सभासद झालेल्या संस्थाच मतदानासाठी पात्र असतील. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकतींसाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर एका महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

Amravati: टॉमेटो-वांग्याचे भाव कोसळले; शेतकरी आर्थिक अडचणीत..

अमरावती भाजी बाजारात टमाटर आणि वांग्याची आवक वाढल्याने दर अक्षरशः कोसळले आहेत. बाजारात टमाटर १० रुपये किलोने विकला जात असला तरी शेतकऱ्यांच्या हातात फक्त ३ ते ४ रुपये किलो दर पडत आहे. एकरी १ ते १.५ लाख खर्च करून सहा महिने घाम गाळलेल्या शेतकऱ्यांना आता खर्चही निघणे कठीण झाले आहे. दिवाळीनंतर ४० रुपये किलोने गेलेला टमाटर आज कवडीमोल दरात विकण्याची वेळ आली आहे.वांग्यालाही शेतातून ४ ते ५ रुपये किलो दर मिळत असून एकरी ६० ते ७० हजार खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तोडणी, हमाली, दलाली, वाहतूक खर्च वजा करता हातात काहीच राहत नाही.अधिक आवक आणि कमी मागणीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून तातडीने शासनाने हस्तक्षेप करून आर्थिक मदत द्यावी, अशी संतप्त मागणी होत आहे.

Pune-Satara: पुणे - सातारा महामार्गावर रात्री अपघात

पुणे - सातारा महामार्गावर सोरोळा गावाच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास, कंटेनर डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याची घटना

कंटेनर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून कंटेनर डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही.. अपघातानंतर कंटेनर पलटी होता होता वाचल्यानं दुर्घटना टळली

मात्र या अपघातानंतर रस्त्यावर कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर सांडल्याने काही काळ याठिकाणची वाहतूक मंदावली होती..

विधान परिषद निवडणूकित पक्ष माझ्यावर विश्वास दाखवेल - प्रवीण पोटे पाटील

ज्या दिवशी विधान परिषद निवडणुका जाहीर होतील, त्या वेळी भारतीय जनता पार्टी पुन्हा माझ्यावर विश्वास दाखवेल आणि मी निवडणुकीला सामोरे जाईन, असा ठाम विश्वास भाजपा नेते माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केला आहे.ते म्हणाले की, २०१२ मध्ये त्यांनी प्रथमच विधान परिषद निवडणूक लढवली आणि त्या वेळी चांगल्या मतांनी विजय मिळवला. त्यानंतर २०१७-१८ मध्येही भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आणि ते पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पुढे मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळून पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या कार्यकाळात पारदर्शक आणि विकासाभिमुख कामकाज केले असल्याचा दावा करत, येत्या विधान परिषद निवडणुकीत पक्ष पुन्हा संधी देईल, याबाबत कोणतीही शंका नसल्याचेही पोटे पाटील यांनी स्पष्ट केले.

Latur: लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक लुटण्याचा प्रयत्न, सायरन वाजल्याने चोरीचा डाव फेल

रेनापुर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मध्यरात्री चोरट्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, चोरी करण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने बँकेतील लोखंडी दरवाजे तोडून तिजोरीपर्यंत पोहोचले, मात्र तिजोरी जवळील सायरन वाजल्याने , चोरटे चोरी करण्यासाठी आणलेल साहित्य जागीच टाकून पसार झाले आहेत. तो बँकेत रात्रीच्या वेळी पहाऱ्यावर असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करून हातपाय बांधून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा प्रयत्न अत्याधुनिक पद्धतीच्या सायऱ्यांमुळे फेल गेला आहे, श्वान पथकाच्या साह्याने अधिकचा तपास पोलीस करत आहेत..

Washim: वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीचे दर घसरले

वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांत तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत अवघ्या वीस दिवसांपूर्वी तुरीला प्रतिक्विंटल सुमारे 9 हजार रुपयांचा दर मिळत होता. सध्या वाशिम बाजार समितीत तुरीला केवळ 7 हजार 800 रुपये पर्यंतचे दर मिळाले. तर रिसोड बाजार समितीमध्ये 7 हजार 900 रुपयांचे दर मिळाले,असून कारंजा बाजार समितीमध्ये तुरीला 8 हजार रुपयांचे दर मिळाल्याने जवळपास एक हजार ते बाराशे रुपयांची घसरण झाली आहे. बाजारात तुरीची आवक वाढत असताना दरात सातत्याने घट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Pune: पुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणार

पुणेकरांनो वाहनांवरील थकीत दंडभरा अन्यथा लायसन्स रद्द होणार

वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा उगारला बडगा

३० दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार

पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसमसदाराकडे दंड जमा करावा; वाहतूक पोलिसांचा पुणेकरांना आवाहन

वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची येणार नोटीस

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर अधिकृत शॉट कोडवरून एसएमएस द्वारे नोटीस पाठवण्यात येणार

26,27,28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या कालावधीत या सगळ्या नोटीसा पाठवण्यात येणार..

Buldhana: जानेफळमध्ये डीपीला भीषण आग; अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचे मोठे नुकसान..

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे महावितरणच्या डीपीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आठवडी बाजाराच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रोड क्रॉस वीजवाहिनीला जड वाहनाचा धक्का लागून शॉर्टसर्किट झाल्याने डीपी पेटली आणि केबल व फ्युज बॉक्स जळून खाक झाले... सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, उपकेंद्रातील अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.

Kalyan-Ahilyanagar: कल्याण- आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात

पिकअप मालवाहू गाडी आणि जीपची जोरदार धडक होऊन १० जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी पिकअप गाडीत कलिंगड भरलेले होते. धडकेनंतर कलिंगड महामार्गावर विखुरल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे

Karnatak: कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित

कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित

उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने आडवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित

कर्नाटक सरकारने भीमा नदीवर उमराणी गावाजवळ नव्याने उभारलेल्या बंधाऱ्यामुळे महाराष्ट्रातील 9 गावांना फटका

उमराणी गावाजवळ 1 टीएमसी पाणी अडवल्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोटअधिक शेकडो हेक्टर शेती धोक्यात

आमच्या लोकप्रतिनिधीना आमची विनंती आहे की हा विषय अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे.

कर्नाटक सरकार हुकूमशाही करत आहेत त्यामुळे आपल्या सरकारने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा.

Amravati: अमरावतीत स्वीकृत नगरसेवकांकडून अल्पसंख्यांक काँग्रेस सेलमध्ये नाराजी

अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षामधून दोन स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आले, मात्र अमरावती शहर काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून अंतर्गत नाराजी उफाळली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव आसिफ तक्कल यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत पक्ष एक-दोन लोकांच्या निर्णयाने चालू शकत नाही, असे म्हटले आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारे विचारणा केली गेली नाही, त्यामुळे या निर्णयाबाबत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.. नुकताच अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली

Kokan: कोकणात पोलिसांनी नाचवली पालखी

कोकणात सध्या शिमगा उत्सवाचे वेध लागले असून गावातील पालख्या आता रत्नागिरी शहरात ठीक ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रत्नागिरी शहरा नजीकच्या मिरजोळी येथील श्री कालिका देवाची पालखी आली असता ती पालखी पोलीस स्थानकातील पोलिसांनी खांद्यावर घेऊन नाचवली. यावेळी ही पालखी नाचवताना महिलांचा देखील सहभाग होता.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीवर आज पासून प्रशासकराज

यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपला असून निवडणूक होईपर्यंत या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जाणार आहे शासनाने सरपंचाची प्रशासक म्हणून निवड करावी असे आदेश काढले होते, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी आदेश काढले असून तसे पत्र गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर बीडीओ प्रशासकांची नेमणूक करणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नागपूर विभागाने परीक्षा व्यवस्थेत केला बदल..

नागपुरातील बारावी पेपरफुटी प्रकरणानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नागपूर विभागाने परीक्षा व्यवस्थेत केला बदल..

सर्व परीक्षा केंद्रावर सीलबंद प्रश्नपत्रिकेचे बॉक्स पेपरच्या वेळेत 11 वाजताच उघडली जाणार..

यापूर्वी विद्यार्थ्याना प्रश्नपत्रिका वाचनासाठी 10 मिनिटे आधी पेपर दिला जायचा. आता ही पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे..

तसेच उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी 2 वाजता ऐवजी 2 वाजून 10 मिनिटांनी वेळ निश्चित करण्यात आली.

कस्टोडियनकडून केंद्रप्रमुखापर्यंत प्रश्नपत्रिका पोहचवण्याचा कालावधी आता 10 ते 15 निश्चित करण्यात आला आहे..

भविष्यात पेपर फुटीच्या घटना टाळण्यासाठी शिक्षण मंडळाकडून कडक उपाय सुरू करण्यात आले आहे.

पेपरफूटी प्रकरणानंतर भरारी पथकात वाढ, पूर्वी 6 भरारी पथक तैनात होती. आता वाढवून 8 पथक करण्यात आली आहे...

Maharashtra Live News Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल २५ मिनिटे उशिरा

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल 30 ते 35 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. विक्रोळी स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन विक्रोळी स्थानकात थांबल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT