कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करुन पर्यायी गावठाणांमध्ये त्यांची पुनर्वसन प्रक्रिया तातडीने सुरु करावी, विभागीय आयुक्तांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्तीदलाच्यावतीने डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विस्थापनाला ६० ते ६५ वर्षे पूर्ण होवूनही ४ हजार २८९ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यातील १ हजार ३९४ नागरिकांना अंशतः जमीन वाटप झाले असून २ हजार ८९५ खातेदारांन जमीन वाटपही झाले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत अनेक बैठका होवून एकाही खातेदाराचे पुनर्वसन होवू शकले नाही. १४४ खातेदारांची यादी अंतिम आदेशासाठी सातारा पुनर्वसन कार्यालयाने पाठवली असूनही पुढील प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी रॅली काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
पावसामुळे बागेतच द्राक्ष सडण्याची भीती, द्राक्षला तडे जायला सुरुवात
द्राक्षला तडे गेल्यास बाजार भावात 30 ते 40% नुकसान
मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अगोदरच उत्पादनात घट, त्यानंतर अवकाळी पावसाचे दुहेरी संकट
द्राक्ष उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळख्यात, सरकारनं मदत करावी शेतकऱ्यांनी व्यक्त केली भावना
भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून,रोजी रात्रीच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने विविध प्रभागांत धुमाकूळ घालत पाच नागरिकांना चावा घेऊन जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.साकोली शहरातील विविध प्रभागांमध्ये वावरणाऱ्या एका लावारिस कुत्र्याने समोर येणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ले चढवले. अवघ्या दोन तासांच्या कालावधीत या कुत्र्याने पाच जणांना गंभीर जखमी केले.जखमी झालेल्या पाचही नागरिकांना तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहरात अशाप्रकारे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले आहे..
कोट्यावधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील जिजामाता उद्यानाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामात अधिकारी व ठेकेदाराने कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे असा गंभीर आरोप मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केला आहे.
पंढरपूर शहरात नगरपालिकेच्या वतीने जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे सात कोटी रूपयांचा खर्च केला आहे. उद्यान खुले करण्यापूर्वी मनसेचे धोत्रे यांनी उद्यानाची पाहणी केली असता काम निकृष्ट झाल्याचे समोर आले आहे.
उद्यानात बसवलेले पेविंग ब्लाॅक निखळून पडले आहेत. खेळणी साहित्याची मोडतोड झाली आहे. भिंतींना तडे गेले आहेत अशा अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत असा आरोप करत या कामाची चौकशी करावी अशी मागणी ही धोत्रे यांनी केली आहे.
खराडी पोलीस स्टेशन हद्दीत मॉडीफाईड सायलन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रहिवाशांच्या वारंवार तक्रारीनंतर पोलिसांनी सापळे रचून तब्बल ४५ बुलेट व इतर दुचाकी जप्त केल्या.वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत सर्व गाड्यांचे मॉडीफाईड सायलन्सर काढून कंपनीचे मूळ सायलन्सर बसवले. जप्त करण्यात आलेल्या मॉडीफाईड सायलन्सरवर थेट बुलडोझर फिरवून ते नष्ट करण्यात आले.
पंढरपुरातील प्रस्थापित काॅरिडारचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत काॅरिडाॅरच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात उज्जैन आणि काशीच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
बैठकीला आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वसईच्या वालीव परिसरातील खान कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात वाद
किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेत अब्दुल रहमान खान नावाचा व्यक्तीवर चाकूने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वालीव पोलिसांनी घटनेची नोंद झाली असून आरोपी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खान कुटुंबीयांनी केली आहे.
शरद पवार यांच्या सगळ्या तपासण्या नार्मल
त्यांनी त्यांना द्रव पदार्थ हलका आहार घेण्यास सुरुवात केली आहे
त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे
उद्या शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता
दोन दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जाणार आहे
गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश 23 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .
पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर कार्यरत होते. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदलानुसार आता राजेश अग्रवाल हे गडचिरोली जिल्ह्याचे नवीन पालक सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत घाबरलेल्या तरुणीने इमारतीच्या खिडकीतून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला. तर स्पाचा व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना विमाननगरमधील सिटी स्पेस इमारतीच्या परिसरात घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर पोलिसांनी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सिटी स्पेस इमारतीच्या परिसरातील स्पा सेंटरवर छापा मारला. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावल्यानंतर स्पा सेंटरमधील घाबरलेल्या तरुणीसह व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला. तर, व्यवस्थापकाच्या पायाला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. संकिता मुखर्जी असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या कारवाईत इतर चार तरुणींची सुटका करण्यात आली.
नागपुरातील बारावी पेपर फूट प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणुक
बारावीच्या परीक्षेत नागपुरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून रसायन शास्त्राचे पेपर फुटल्याचे समोर आले..
या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या पाच सदस्याची एसआयटी नेमण्यात आली आहे.
पेपर नेमके कुठून फुटले, यामध्ये मंडळातील अधिकाऱ्याची भूमिका काय,कोणाकोणापर्यंत पोहचले आणि ईतर जिल्ह्यात पाठवले गेले काय... याचा सखोल तपास हे पथक करणार..
या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे..
खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षक निशिकांत मुन आणि विद्यार्थी फैजान यांना पोलिसांनी अगोदर अटक केली होती..
त्यानंतर काल एक्सलेंट अकादमीचा संचालक मुस्तफा खान आणि जुनेद मोहम्मद या दोघांना अटक केली आहे..
राज्यातील महाबळेश्वरनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळमध्ये आता पर्यटकांना साहसी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. तोरणमाळ येथील प्रसिद्ध सीताखाई पॉइंटवर तब्बल दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला झीप लाईन प्रकल्प नुकताच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा वार्षिक योजनेतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथील श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावू देणार नाही असा पवित्रा मढी ग्रामपंचायतचे सरपंच संजय मरकड यांनी घेतला होता. मुस्लिम व्यापारी यात्रा उत्सव दरम्यान पावित्र्य राखत नाहीत या कारणावरून दुकाने लावू देणार नाही असा ठराव मागील वर्षी ग्रामसभेने केला होता. त्याच आधारावर यावर्षी सुद्धा सरपंच संजय मरकड हे दुकाने लावू न देण्यास ठाम आहेत.मात्र आता याबाबत मढी येथील मुस्लिम व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन सरपंच ज्या ठरावाबाबत बोलत आहेत त्या ठरावाला मागील वर्षी औरंगाबाद हायकोर्टाकडून स्थगिती मिळाली असून त्यामुळे मुस्लिम व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी दुकाने लावण्यास काहीही हरकत नाही मात्र सर्व गाव एकत्र गुण्या गोविंदाने नांदत असताना फक्त सरपंच धार्मिक तेढ वाढवत असल्याचा आरोप मुस्लिम व्यापाऱ्यांनी केला आहे.
हिंगोली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे, हिंगोली सह वसमत तालुक्यात वादळी वारा व अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे तर काही गावात नागरिकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेली आहेत वसमत शहरात बाजारपेठेत देखील अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने किरकोळ व्यावसायिक असणाऱ्या व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.