Manasvi Choudhary
जगात प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी असतो. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे हे तुम्हाला माहितीच असेल.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का? कोंबडा हा पक्षी देखील एखाद्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असेल.
कोंबडा हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे हे या वेबस्टोरीतून जाणून पाहूया.
भारताच्या दक्षिणेला असलेल्या श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय पक्षी कोंबडा आहे. एका खास प्रजातीच्या कोंबड्याला श्रीलंकन राष्ट्रीय पक्षी मानतात.
श्रीलंकेमध्ये आढळणाऱ्या या विशेष पक्ष्याला 'रानकोंबडा' म्हणून ओळखले जाते. हा कोंबडा आपल्या घराभोवती दिसणाऱ्या सामान्य कोंबड्यांपेक्षा वेगळा असतो.
पूर्वी श्रीलंका हा देश 'सिलोन' या नावाने ओळखला जात होता, म्हणूनच या पक्ष्याचे वैज्ञानिक आणि जुने नाव 'सिलोन जंगल फाउल' असे आहे.
या रानकोंबड्याचे पंख अत्यंत चमकदार, लाल, नारंगी आणि गडद जांभळ्या रंगाचे असतात.