Manasvi Choudhary
बटाटा ही अशी भाजी आहे जी घराघरात बनवली जाते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण बटाट्याची भाजी आवडीने खातात.
बटाट्याची भाजी बनवताना आपण त्याची साल फेकून देतो. तुम्हीही बटाट्याची साल फेकून देत असाल तर ही वेबस्टोरी पूर्ण वाचा.
बटाट्याच्या सालीमध्ये अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत. त्वचेसाठी बटाट्याच्या सालीचा वापर केला जाऊ शकतो.
बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लोह आणि नैसर्गिक ब्लिचिंगचे गुणधर्म असतात जे त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवतात.
चेहऱ्यावर काळे डाग, मुरूमांचे व्रण असतील तर बटाट्याची साल स्वच्छ धुवून चेहऱ्यावर चोळा
डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यासाठी फ्रिजमधील थंड बटाट्याची साल डोळ्यावर ठेवा.
जर तुमची त्वचा तेलकट असेल, त्वचेवर धूळ, घाण साचली असेल तर बटाट्याची साल वाटून त्याचा रस बनवा त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.