Manasvi Choudhary
आजकाल अनेक तरूण मुली कोरियन ब्युटी ट्रेंड फॉलो करतात. पातळ, गुळगुळीत त्वचेसाठी मुली अनेक नवनवीन उपाय करतात.
तुम्ही देखील 'ग्लास स्किन ग्लो' या स्किनकेअर विषयी ऐकलेच असेल . ग्लास स्किन ग्लो म्हणजे अशी त्वचा जी अत्यंत हायड्रेटेड असते.
महागड्या पार्लर ट्रिटमेंट्स किंवा केमिकल उत्पादनांऐवजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने ग्लास स्किन ग्लो मिळवू शकता. यासाठी नेमके काय करावे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ग्लास स्किन ग्लोसाठी नारळाचे तेल तुम्ही वापरू शकता. चेहऱ्याला नारळाच्या तेलाने मालिश केल्याने त्वचेवर नैसर्गिकरित्या ग्लो येतो. त्वचा उजळण्यास मदत होते.
चेहऱ्यावर मेकअप किंवा कोणतेही केमिकलयुक्त प्रोडक्ट्स लावले असेल तर तुम्ही नारळाच्या तेलाने मालिश करा म्हणजे त्वचेवरील धूळ आणि मेकअप निघून जाईल. यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.
त्वचेवर तुम्ही गुलाबपाणी टोनर म्हणून वापरा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्याला गुलाब पाणी लावा. चेहरा टवटवीत दिसेल.
चेहरा धुतल्यानंतर त्वचेवर कोरफड जेल लावा यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहील. अलोवेरा जेलमध्ये तुम्ही बदाम तेल किंवा व्हिटॅमिन ई ऑईल मिक्स करून देखील चेहऱ्यावर लावू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.