पाठदुखीकडे सामान्य समजून दुर्लक्ष करू नका! असू शकतो गंभीर आजार

Manasvi Choudhary

पाठदुखी

आजकाल व्यस्त जीवनशैलीत पाठीचे दुखणं ही समस्या दिवसेंदिवस अनेकांंना भिडसावत आहे. अनेकजण याकडे साधे स्नायूंचे दुखणे किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात. परंतु, सतत होणारे पाठीचे दुखणे हे गंभीर आजाराचे संकेत असू शकते.

Back Pain Signs And Symptoms

या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका

पाठ दुखत असली की अनेकदा सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र असे करू नका. सतत पाठ दुखत असेल तर त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. चुकीची बसण्याची पद्धत यामुळे देखील पाठ दुखते.

Back Pain Signs And Symptoms

एकाच ठिकाणी बसणे चुकीचे

कामाच्या ठिकाणी जास्त वेळ कॉम्प्युटरसमोर एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखीचा त्रास होतो. अनेकांना सकाळी उठल्यानंतर पाठदुखीचा त्रास संभवतो अशावेळी जर तुम्ही लक्ष देत नसाल तर ते गंभीर होऊ शकते.

Back Pain Signs And Symptoms

सनायूंमध्ये ताण

व्यायाम करताना अनेकदा स्नायू ताणले जातात जर तुमची पाठ दुखत असेल तर लक्ष द्या.

Back Pain Signs And Symptoms

मूत्रपिंडाची समस्या

कंबरदुखी म्हणजे पोटाच्या वरच्या बाजूला पाठीत होणाऱ्या वेदना. या समस्या मूत्रपिडांच्या समस्याचे संकेत दर्शवतात वेळीच लक्ष देणे महत्वाचे आहे.

Back Pain Signs And Symptoms

लिव्हर

लिव्हर किंवा आतड्यांच्या कार्यात बिघाड झाल्याने पाठदुखीचा त्रास संभवतो अशावेळी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Back Pain Signs And Symptoms

ताप

तापामुळे देखील होते पाठदुखी फ्ल्यू सारख्या संसर्गजन्य आजारामुळे ताप येतो आणि मानेपासूनचा सर्व भाग दुखतो, पाठदुखी संभवते.

Back Pain Signs And Symptoms

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT:पाणी वाहणाऱ्या नदीत वाळू कुठून येते? तुम्हाला माहितीये का?

River Sand Formation Process
येथे क्लिक करा..