Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

हडपसर ते दिवेघाट रस्ता राहणार बंद

वाहतूक शाखा पोलिसांनी काढले आदेश

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान, दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी उद्या ब्लास्टिंग करण्यात येणार आहे.

या कामामुळे दुपारी १ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

तरी या कालावधीत नागरिकांनी व वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून करण्यात येत आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांनी केले.

कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

- कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या दाजीपूर फोंडाघाट परिसरात आज सायंकाळी अचानकच तुफान पाऊस सुरू झाला. एका बाजूला उकाड्याने हैराण झालेल्या या दोन्ही जिल्ह्यांना या पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला. कणकवली होऊन फोंडा मार्गे कोल्हापुरात येणाऱ्या काही साम टीव्हीच्या दर्शकांनी दाजीपूर फोंडा घाटात सुरू असणाऱ्या पावसाचा चित्रीकरण केलं.

महापौर रवी लांडगे आणि आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुराडेंनी एकत्रित केली इंद्रायणी नदीची स्वच्छता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे, आळंदी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि सात मावळे संवर्धन संस्थेमार्फत आज इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आल. त्यामध्ये महापौर रवी लांडगे यांनी स्वतः इंद्रायणी नदीमध्ये उतरून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि इंद्रायणी नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या काही गोष्टी प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीत होणाऱ्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व दोषी कंपन्या आणि इतर काही संस्था यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनातर्फे काढण्यात येतील अस आश्वासन रवी लांडगे यांनी यावेळी दिला आहे.

६ मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार - CM देवेंद्र फडणवीस

देखभाल दुरुस्तीसाठी उद्या पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा असणार बंद

पिंपरी चिंचवड शहरात उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग उद्या निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचे काम करणार असल्याने उद्या पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच 24 तारखेला सकाळी कमी दाबाने व अनियमित पणे पाणीपुरवठा केल जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

Ashok chavan : अशोक चव्हाण यांचा पाशा पटेल यांना लगावला टोला 

नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शेतकरी नेते पाशा पटेल यांचा टोमणा लगावला काढला. पाशा पटेल यांच्याकडे बांबू लागवड मिशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विशेष जवाबदारी दिली आहे.पण अधूनमधून ते राजकीय बांबू लावत असतात, असं वक्तव्य चव्हाण यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित नागरिकांनसह मान्यवरामध्ये एकच हशा पिकला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वाद प्रकरण : सरपंच गणेश काकड यांची प्रतिक्रया समोर

चिखला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वाद प्रकरणातील आरोपी सरपंच गणेश काकड यांची प्रतिक्रया समोर

व्हिडिओ बनवून सोशल मोडियावर केला व्हायरल

घटनेची सत्यता पडताळून आमचेवर कारवाई करा

त्या महिलेचे कपडे फाडले नसल्याचे स्पष्टीकरण ..

काही नेते आमच्या गावाचे आणि समाजाचे नाव बदनाम करत असल्याचा केला आरोप

संजीवनी वाघ यांचे भाऊ आणि त्याच्या घरातील महिलांनी माझ्या पत्नीला मारहाण करून विनयभंग केला

पुण्यात उद्या हडपसर ते दिवेघाट रस्ता बंद राहणार

पुण्यात उद्या दुपारी १ ते हडपसर ते दिवेघाट रस्ता बंद राहणार...

वाहतूक शाखा पोलिसांनी काढले आदेश

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान, दिवेघाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी उद्या ब्लास्टिंग करण्यात येणार आहे.

या कामामुळे दुपारी १ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

देहूरोडच्या गुरुद्वारामध्ये 73 वा वर्धापन दिन महोत्सव निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई

देहूरोड येथील गुरुद्वारा सिंह सभेला यंदा ७३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुद्वारामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाला असून भाविकांसाठी विशेष सजावट करण्यात आली आहे.

Nanded : नांदेडमध्ये रेती उपसा करणारे तराफे आणि बोट जाळून नष्ट

नांदेडमधील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे साहित्य पोलिसांनी जाळून नष्ट केले. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. विष्णूपुरी प्रकल्पाजवळ नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. ग्रामीण ठाण्यातील पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले. पोलीसांना पाहून वाळू उपसा करणारे दोघे फरार झाले.पोलिसांनी वाळू उपसा करणारी बोट आणि काही तराफे जाळून नष्ट केले.दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिवेशनापूर्वी सरकारकडून चहापान 

उद्यापासून अधिवेशन; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

परभणीत शक्तीपीठ महामार्गावरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा 

शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला परभणीतील शेतकऱ्याचा विरोध कायम आहे. त्यामुळे राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्या पुन्हा एकदा होणाऱ्या होणाऱ्या मोजणीला शेतकऱ्याचा विरोध ,आंबे टाकळी गावात होणार रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता आहे.

आमदार मिटकरी यांनी गायला अमर शेख यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेला पोवाडा 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची ओळख फर्डे वक्ते अशी. त्यांनी आपल्या भाषणांनी अनेक सभांची मैदानं गाजवलेली आपण पाहिलीय. मात्र, आज त्यांच्यातील एका नव्या कलागुणाची ओळख करून दिलीय. हा गुण आहेय त्यांच्यात दडलेल्या शिवशाहिराची. अकोला जिल्ह्यातील पारस फाटा येथे आज आयोजित शिवजयंती कार्यक्रमात त्यांना पोवाडा गाण्याची विनंती उपस्थितांनी केलीय.

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात दिली भेट

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी या महाराष्ट्रात कोणतीच परवानगी नसली पाहिजे असा जीआर सरकारने काढला पाहिजे...

मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं

मुंढवा भैरवनाथ मंदिरामागे शॉर्टसर्किटमुळे घराला आग; तीन सिलेंडर बाहेर काढून अग्निशमन दलाने टाळला मोठा अनर्थ

मुंढवा गाव भैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस सकाळी 10:30 च्या सुमारास घरामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती आगीमुळे घरात मोठ्या प्रमाणात धूर दाटल्यामुळे दलाच्या जवानांनी बी ए सेट चा वापर करून होजरील होजच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली सदर घरातील किचन मधील साहित्य जळाले जवानांनी तीन भरलेले सिलेंडर बाहेर काढत मोठा धोका दूर केला व आजूबाजूला आग पसरणार नाही याची खबरदारी घेतली व सदरची आग पूर्णपणे विझवली. बि.टी. कवडे अग्निशमन केंद्राचे तांडेल मंगेश टकले वाहन चालक दत्ता अडागळे फायरमन महेश पांडे व बापू राऊत या जवानांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली

शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला परभणीतील शेतकऱ्याचा विरोध काय

परभणीत दोन दिवसांपूर्वी शक्ती पीठ महामार्गासाठी प्रशासनाने सहजपुर जवळा येथे जमीन मोजणी केली ही मोजणी पोलीस प्रशासनाच्या दंडेलशाहीने केली अनेकांना ताब्यात घेण्यात आले या सर्व दंडेलशाहीचा निषेध करण्यासाठी उद्या पुन्हा एकदा मोजणी होणाऱ्या आंबे टाकळी गावात रस्ता रोको करून उद्याची मोजणी हाणून पाडायची असा निर्णय परभणीत आज विविध पक्ष संघटना आणि शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.परभणीच्या सावली विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत स्वाभिमानी,किसान सभा,आदी संघटना आणि शक्तिपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रशासनाने चालवलेली ही हुकुमशाही कदापी सहन करणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पालघरच्या पास्थळ मधील बाणगंगा नदीचा परिसर आज संत निरंकारी मंडळच्या सेवकांच्या पुढाकाराने स्वच्छ करण्यात आला.

.संपूर्ण नदी परिसरात पसरलेला कचरा एकत्रित करत नदीकाठाची तसेच पात्राची साफसफाई करण्यात आली. स्वच्छ जल – स्वच्छ मन या अभियानांतर्गत सकाळपासूनच मोठ्या संख्येने स्वयंसेवक कामात सहभागी झाले होते. कंबरेपर्यंत चिखलात उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि साचलेला कचरा बाहेर काढण्यात आला. कोणतीही शासकीय मदत न घेता, निस्वार्थ भावनेतून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. नागरिकांनीही नदीत कचरा न टाकण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले .

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

भंडारा जिल्हा प्रशासन चेन्नईच्या प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात.

चेन्नई येथील समुद्रकिनाऱ्यावर उसळलेल्या प्रचंड लाटेत फिरायला गेलेल्या आयटी कंपनीतील तरुण बुडालेत. यात भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी येथील मयुरी हरिश्चंद्र चौधरी या तरुणीचा समावेश आहे. भंडारा जिल्हा प्रशासन सातत्यानं चेन्नई येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्कात आहे. यासोबतच राज्य सरकारही चेन्नई प्रशासनाच्या संपर्कात आहेत. मृत मयुरीच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला असून तिचा मृतदेह सध्या चेन्नईच्या जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन करून तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येईल आणि त्यानंतर मयुरीचा मृतदेह स्व:गावी आणण्यासाठी आवश्यक ती मदत राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिली आहे.

संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून, धुळे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागात उभारण्यात येणाऱ्या त्यांच्या बहुप्रतिक्षित स्मारकाचे भूमिपूजन आज धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते अत्यंत दिमाखात पार पडले,

महासभेत ठराव मंजूर होऊनही गेल्या 16 वर्षांपासून या स्मारकाचे काम प्रलंबित होते; मात्र परीट (धोबी) समाज आणि संपूर्ण धुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येला आमदार अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे अखेर यश आले आहे, हातात झाडू घेऊन गावोगावी स्वच्छतेचा व शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या महान संताच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला या ऐतिहासिक सुवर्णक्षणाने सुरुवात झाली असून, या दिमाखदार सोहळ्याला महापौर मायादेवी परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गाडगेबाबांच्या विचारांवर प्रेम करणारे सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळ्यात महादेव मंदिरात चोरट्याचा दानपेटी सह सोन्याच्या दागिन्यावर डल्ला, सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याचा सर्व हालचाली कैद

शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथे वर्णेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम व सोन्याची वस्तू चोरी करणाऱ्या संशयित चोराला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, चोरीची संपूर्ण घटना मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे,

गावकऱ्यांनी साहुर शिवारातील ऊसाच्या शेतात शेतमजूरीसाठी आलेल्या आरोपी मुक्या कांतीलाल पवार याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याकडे दानपेटीतून चोरी करण्यात आलेले पैसे आढळून आले, यानंतर गावकऱ्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण 23 हजार रुपये रोख रक्कम व अंदाजे 1 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा हस्तगत केला आहे.

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया

- संबंधित जागा ही राष्ट्रीय महामार्गाची असून ती जागा कशासाठी आरक्षित आहे याची देखील माहिती मागवली.

- मोहोळ शहरात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

- मोहोळ मध्ये शांतता प्रस्थापित आहे, कोणताही गोंधळ नाही.

- हा पुतळा कोणी बसवला याबाबत आम्ही तपास करीत आहोत.

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ तारखेला येणार

विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून थर्मल काही प्रमाणात झळल्याची माहिती

ब्लॅक बॉक्स ज्या परदेशी कंपनीचा आहे त्या कंपनीच्या असिस्टंटला तपासासाठी बोलावले आहेत , अशी सूत्रांची माहिती आहे

भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात

भारत मुक्ती मोर्चाची इंदोरा चौकातून सुरुवात...

संघमुख्यालयकडे जाण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता हा मोर्चा संविधान चौकाकडे जाणार आहे.

बामसेफ चे अध्यक्ष वामन मेश्राम यांचे नेतृत्वात मोर्चाला इंदोरा चौकातून सुरुवात झाली आहे.

या मोर्चामध्ये राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महामोर्चासाठी कार्यकर्ते सहभागी झाले आहे.

यात पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी ही शेकडोच्या संख्येने ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी लावत बंदोबस्त लावलेला आहे..

पुण्यात काँग्रेस भवनला पोलीस छावणीचं स्वरूप

पुण्यात काँग्रेस भवनला पोलीस छावणीचं स्वरूप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोड्याच वेळात येणार आहेत काँग्रेसभवन येथे..

दुपारी साडे तीन वाजता हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद आहे

त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज तगडा बंदोबस्त तैनात केलाय

अहिल्यानगरमध्ये शाळेच्या भिंतीवर बिबट्या

राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे शाळेच्या भिंतीवर बिबट्या

बिबट्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल

शाळेच्या बाजूलाच सुरू होता शिवजयंतीचा कार्यक्रम, बिबट्याच्या दर्शनाने घबराटीचे वातावरण

सुदैवाने कोणतीही हानी नाही

कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

कल्याण पिसवलीमध्ये महिलांचा तुफान राडा

क्षुल्लक कारणावरून महिलांमध्ये राडा ,एका

महिलेला मारहाण VIDEO VIRAL

पोलीस तपास सुरू

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी आल्यानंतर शेतात रमले

राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत. या दरम्यान नागरिकांच्या भेटीबरोबरच ते शेतातही रमलेले पाहायला मिळत आहेत अनेक वृक्षांची लागवड यावेळी त्यांनी केलेले आहे. या भागात झाडांच्या रूपाने नंदनवन केलं असल्याचा पाहायला मिळत आहे.

राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात समुद्रात स्फोटा सारखे आवाज

राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात रात्री समुद्रात स्फोटा सारखे आवाज

खोल समुद्रात २० नाँटीकल माईल मधून स्फोटासारखे आवाज आल्यानं परिसरात भीतीच वातावरण

समुद्रातील स्फोटाच्या आवाजाचे गुढ उकलण्यात तटरक्षक आणि पोलीस दलाला यश

खोल समुद्रातून जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टल मधून फायर केल्याने आले होते आवाज

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती

रात्रीपासून पोलिस यंत्रणेकडून गूढ आवाजा संदर्भात होता सुरु

यंदा कलिंगड खातेय चांगलाच भाव. प्रति किलो बावीस रुपये दर

नांदेड जिल्हयात गत वर्षी हंगामातील याच महिन्यात कलिंगडाला प्रति किलो आठ ते नऊ रुपये दर होता.पण यंदा रमजान महिन्याचा उपवास,यावर्षी कमी लागवड आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी यामुळं कलिंगड चांगलाच भाव खातेय.खरीप हंगामातील ओल्या दुष्काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे मात्र चांगला दिलासा मिळाला.यंदा प्रति किलो बावीस रुपये दर जाग्यावरच मिळत आहे. त्यामूळे शेतकरी समाधानी आहेत.व्यापारी थेट शेतात येऊन जागेवरच चांगला भाव देत असल्याने खर्च वजा करुन शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

- सोलापुरातील मोहोळ मध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला

- काल मध्यरात्री शंभू प्रेमींकडून मोहोळ एसटी स्टॅन्डसमोर पुतळा उभारण्यात आलाय

- परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू

- मात्र पुतळा हटवण्याला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध

- या ठिकाणाहून पुतळा हटवल्यास मोहोळ बंद ठेवण्याचा शंभू प्रेमीचा ईशारा

- पुतळा काढण्यावरुन पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता

लहरी हवामानाचा देवगड हापूसला फटका- राजू शेट्टींनी केली पाहणी

सिंधुदुर्गातल्या देवगड हापूसला लहरी हवामानाचा फटका बसला आहे. सुरूवातीला चांगला आलेला मोहोर खार पडल्यामुळे करपून गेला आहे तर काही ठीकाणी तुडतुड्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आंब्याचा फुलोरा गळून पडला आहे. कोकणातील आंबा उत्पादक बागायतदार यामुळे संकटात सापडला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी नुकतीच देवगड येथे भेट देऊन आंबाबागांची पाहणी केली यावेळी त्यांनी बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के सुद्धा शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार नाही त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन बागायतदारांना ठोस मदत करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

सांगली..बिबट्याने दोन दुचाकींवर झडप घालत हल्ला केला.. या हल्ल्यात दोघे जखमी..

सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि वाळवा तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने लहान बालकाला ठार केल्याची घटना ताजी असतानाच बिबट्याने दोन दुचाकींवर झडप घालत हल्ला करुन दोघांसह व एका बारा वर्षाच्या मुलाला जखमी केले. सदरची घटना पेठ-नायकलवाडी रस्त्यावर घडली. महिनाभरापूर्वी बिबट्याने चार ते पाच दुचाकींवर हल्ला करून लोकांना जखमी केले होते. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.

कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात; शेतकऱ्यांच्या काजूला 160 रूपयांचा दर.

कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यावर्षी काजूच्या उत्पन्नात वाढझाल्यामुळे काजू च्या दरात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या काजूला बाजारात 160 रूपयांचा दर मिळत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 रुपयांची दरात घट झाली आहे. गेल्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच 170 रूपयांचा दर मिळाला होता यंदा मात्र किलो ला 160 रूपयांचा दर मिळत आहे त्यामुळे काजू उत्पादक शेतकरी काहीशे नाराज असल्याचे दिसून येत आहे. यंदा मात्र काजूचे उत्पन्न वाढल्यामुळे काजूला कमी दर मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत किलोमागे 10 रूपयांची घट शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. एकीकडे उत्पन्न वाढल्याचा आनंद तर दुसरीकडे दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे.

पिसाळलेल्या कोल्ह्याचा थरार! शेतशिवारात ७ शेतकऱ्यांवर हल्ला, ३ गंभीर

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालोरा आणि केसलवाडा परिसरात एका पिसाळलेल्या कोल्ह्यानं अक्षरशः हैदोस घातला असून, शेतशिवारात कामासाठी गेलेल्या सात शेतकऱ्यांवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात सातही जण जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. नेहमीप्रमाणे शेतकरी आपल्या कामासाठी शेतात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या एका पिसाळलेल्या कोल्ह्यानं अचानक शेतकऱ्यांवर झडप घातली. सात जणांना कोल्ह्यानं जखमी केलं. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यातील सर्व जखमींना तातडीने करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर चार जणांना घरी सोडण्यात आलं आहे. मात्र, तिघांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनेमुळे शेतकरी आता शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागानं या पिसाळलेल्या प्राण्याचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : कांद्याच्या पिकात अफूची शेती, 27 लाखांची 180 झाडे जप्त

वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील शेतकरी आणि व्यवसायाने कांद्याचा व्यापारी असलेल्या एका महाभागाने कांद्याच्या पिकात चक्क अफूची शेती पिकवली. परंतु, बियांसाठी लावलेल्या कांद्याला बोंडे येण्याआधीच अफूची बोंडे आली आणि बिंग फुटले. स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांच्या पथकाने शनिवारी भल्या पहाटे करंजगावातील शेतावर पाहणी करून तब्बल 27 लाख रुपयांची 180 किलोंची अफूची झाडे जप्त केली.

छत्रपती संभाजीनगर: होर्डिंग लावणाऱ्यांसह मनपा अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

अनधिकृत बॅनर काढत असताना महानगरपालिकेचे कर्मचारी अमोल जाधव यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. अमोल मृत्यू प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यापैकी पहिला गुन्हा अमोल यांचे मेहुणे महेंद्र श्रीखंडे यांच्या तक्रारीवरुन बीएनएस १०५ सदोष मनुष्यवध आणि ३-५ समान उद्देश साध्य करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली कृती कलमान्वये महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, सुपरवायझर शिवश्याम काळे आणि बॅनर लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मनपाचे सहायक आयुक्त प्रसाद देशपांडे यांच्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. देशपांडे यांच्या तक्रारीनुसार दीपक खोतकर, प्रल्हाद गायकवाड, प्रशांत ठोंबरे, श्रीमंत गायकवाड, रघुनाथ पितळ यांची नावे असलेले अनधिकृत बॅनर लावले होते. हे बॅनर स्वप्नील ऊर्फ सोनू आणि अन्य पाच जणांनी लावले होते. सर्व जण सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याने महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ कलम २, सहकलम मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ कलम २४४, २४५ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले, उपनिरीक्षक सचिन वायाळ तपास करीत आहेत.

कांद्याचे दर आठ ते दहा रुपये किलो,कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

नेहमी दर वाढल्यामुळे गृहिणीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातच पाणी आणल आहे.कांद्याचे दर बाजारात आठ ते दहा रुपये किलो घसरल्याने लागवडीसह उत्पादन खर्च व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.धाराशिव जिल्ह्यात पावसाळी कांदा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते मात्र कांदा विक्री करण्याच्या कालावधीतच अनपेक्षित रित्या दर घसरल्याने वाहतूक खर्च व काढणीचा खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आता हा उत्पादित केलेला कांद्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

मढी यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना या वर्षीही बंदी

भक्तांची पंढरी समजल्या जाणाऱ्या आणि राज्यात प्रसिध्द असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. मात्र या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा निर्णय मढी ग्रामपंचायतने घेतला आहे.यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याने व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.

आमदार निधीतून अभ्यासिका उभारणी, सोनेगावात स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे आ.कैलास पाटलांच्या हस्ते उद्घाटन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने धाराशिव तालुक्यातील सोनेगाव येथे आमदार निधीतून स्वामी विवेकानंद अभ्यासिका उभारण्यात आली आहे.ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी दिलेल्या निधीतुन ही सुविधा साकार झाली असुन या अभ्यासिकेचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते पार पडले.

वाल्मीक कराड व मुलांपासून माझ्या कुटुंबास व माझ्या जीवितास धोका ज्ञानेश्वरी मुंडे यांच पोलीस अधीक्षकांना पत्र

बीडच्या परळीतील बहुचर्चित प्रकरण व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्षे होऊन गेले आहेत या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून संशयित आरोपींच्या नारको टेस्ट ब्रेक मॅपिंग झाली असून यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांनी वाल्मीक कराडच्या मुलाचे नाव घेतल्यामुळे त्यांना धमकवले जात असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे अह वाल्मीक कराड, सुशील कराड, श्री गणेश कराड यांच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सर्व विभागांना त्यांनी पत्र दिल आहे.

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणात नागपूर विभागीय शिक्षण मंडळ ॲक्शन मोडवर

- केंद्रप्रमुखांसह 21 जणांची दुसऱ्या परीक्षा केंद्रावर बदली

- सिव्हिल्स येथील सेंट उर्सुला हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर बारावीचे केमिस्ट्री आणि फिजिक्सचे पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली....

- त्यानंतर दक्षतेचा भाग म्हणून या परीक्षा केंद्राचे प्रमुख विवेक आतकुरकर यांच्यासह 21 वर्गखोली पर्यवेक्षकांना दुसऱ्या परीक्षा केंद्रावर हलविण्यात आले आहे.

- सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचे विभागीय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे

अवैध विदेशी दारुची वाहतूक; ७ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाशिमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारंजा ते शेलुबााजार रस्त्यावरील शेवती शिवारात व बेलमंडळ येथील एका घरातून अवैध विदेशी दारू जप्त करुन कारवाई केली. शेवती शिवारात वाहतूक करणारी चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी सचिन काशिनाथ एकनार रा. बेलमंडळ ता. कारंजा व कैलास अवधूत ढोक रा. इंझोरी यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनासह अंदाजे ७ लाख ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चंद्रपूर मनपाच्या कंत्राटी अभियंत्याला लाच घेताना अटक

चंद्रपूर महानगरपालिकेतील रमाई शहरी आवास योजनेतील कंत्राटी अभियंत्याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. शुभम वरघाट असे अटक करण्यात आलेल्या कंत्राटी इंजिनिअरचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराचे काम मंजूर करून देण्यासाठी आणि फाईल पुढे सरकवण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने सापडा रचून अभियंत्याला अटक केली. पुढील तपास चंद्रपूर लाचलुचपत विभाग करीत आहे.

परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत त्यांचे आरोपी अद्याप पर्यंत सापडले नाहीत मात्र त्यांचाच मुलगा ट्युशन वरून घराकडे येत असताना सोमेश्वर नगर भागामध्ये एका व्यक्तीने त्याला अडवून तू कोणाचा आहे असे विचारले आणि त्याने मी महादेव मुंडे यांचा आहे असे सांगितल्यानंतर दोन कानाखाली झपडा हाणून मारहाण केली आहे मारहाण करणारा बालाजी आघाव असून तो वाल्मीकरांचा समर्थक असल्याचं साम टीव्ही शी बोलताना नातेवाईकांनी सांगितले आहे मारहाण का झाली कशामुळे झाली याची चौकशी आता परळी पोलीस करत असून अज्ञात विरुद्ध परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

शिर्डीत तरुणावर चाकू हल्ला

राहाता येथील दानिश चौधरी या तरुणावर शिर्डीत जीवघेणा हल्ला...

हल्ल्यात तरुण गंभीर जखमी...

मस्जिदमध्ये नमाज पढवण्यासाठी आलेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी केले वार...

तरुणावर साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू...

पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू...

शिर्डी पोलिस ठाण्यासमोर जमला मोठा जमाव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

युद्धाने कंबरडं मोडलं, कर्मचार्‍यांच्या पगारात ३० टक्के कपात; परदेश दौऱ्यावरही बंदी, शेजारी राष्ट्र भिकेला लागलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी' ची कोर्टात कुस्ती; स्पर्धेचं काय होणार 16 मार्चला लागणार निकाल, काय आहे प्रकरण जाणून घ्या

मोठी बातमी! ट्रम्पनं खर्ग बेटाचा केला नरक; इराणच्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावर हल्ला

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

SCROLL FOR NEXT