चवदार तळ्याचे पाणी पिण्या योग्य नाही, या वरून आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणाचे काम MIDC करणार असल्याची माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सावरवाड येथे स्फटिक लिंगाची निर्मिती करण्यात आली आहे. हे स्फटिक लिंग पाहण्यासाठी पर्यटकांची पावले येथे वळताना दिसत आहेत. कोकणची भूमी ही देवभूमी मानली जाते आणि याच भूमीत निसर्गाचा आणि अध्यात्माचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतोय. सावरवाड येथे असलेल्या एका अशा स्फटिक शिवलिंगाची सध्या देशभर चर्चा आहे, जे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील सर्वात मोठ्या स्फटिक शिवलिंगांपैकी एक असल्याच बोललं जात आहे. हे स्फटिक शिवलिंग केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ते एक ऊर्जेचे केंद्र बनले आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे 'वायव्यमुखी' आहे. अशा प्रकारचे वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग अत्यंत दुर्मिळ मानले जाते. हे स्फटिक लिंग पाहण्यासाठी पर्यटक व शिवभक्त गर्दी करू लागले आहेत.
बंदुकीच्या जोरावर क्रांती घडविण्याच्या स्वप्नात अडकलेल्या नक्षल चळवळीतील सहभागींनो आता वेळ आली आहे, तुम्ही हिंसेच्या मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा. सरकार विविध योजना राबवत असून, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. शस्त्र धरून नाश होईल परंतु विकासाच्या वाटेवर चालून जीवन उजळता येईल. शांततापूर्ण जीवन जगण्याची संधी सोडू नका.
नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. काल सायंकाळी अनेक ठिकाणी आवकाळी पाऊस आणि गरपीट झाली. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला बसला.अर्धापूर तालुक्यातील रोडगी , सोनाळा, चाभरा , खैरगाव , निमगाव या शिवारात गारांचा पाऊस झाला. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे या भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले.गहू,आंबा, टरबुज,केळी, काढून ठेवलेली हळद यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यातील सोनाळा आणि बावणबीर मंडळातील अनेक गावांमध्ये गहू, कांदा, केळी आणि मका या पिकांना मोठा फटका बसला आहे.
अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, काढणीस आलेली पिके पूर्णपणे भिजून खराब झाली आहेत. विशेषतः गहू आणि कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे.
या अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बळीराजावर आणखी संकट कोसळले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली होती, मात्र या नुकसानीमुळे त्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.
धाराशिव जिल्ह्याला सलग तीन दिवसापासून अवकाळी पावसाने झोडपले आहे.वादळी वारा आणि गारांचा पाऊस झाल्याने धाराशिव मध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाले आहेत. आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे केळी निर्यात बंद झाली आहे.त्यामध्येच अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने केळीची झाडे अक्षरशा मोडून पडली आहेत.धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे.त्यामुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे,
शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जनगणनेचे कामे, त्यामुळे सुट्टीत कामे केल्याच्या बदल्यात विशेष सुट्टीची मागणी...
१६ मे ते १५ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश
डिजिटल जनगणनेसाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही होणार
सुट्टीत मुख्यालय सोडता येणार नाही, शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश
३० एप्रिलला शैक्षणिक सत्र समाप्त, २ मेपासून सुट्ट्या सुरू, २६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात
उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना कामावर हजर राहावे लागणार, निवडणुकांनंतर पुन्हा शासकीय कामात शिक्षक गुंतणार
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यवतमाळच्या पुसद येथे उभारलेल्या वसंत उधानाच्या कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने 19 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने हा निर्णय घेतला असून या निधीतून उद्यानाचे पुनर्निर्मान सर्वांगीण विकास आणि वसंतराव नाईक यांच्या स्मृती जपण्यासाठी वस्तू संग्रहालयाचे काम केले जाणार आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार
रुपाली ठोंबरे पाटील यांचा खळबळजनक दावा
फेसबुकच्या पोस्ट मध्ये रुपाली पाटील यांनी दावा केला असून रुपाली चाकणकर यांना पुन्हा लक्ष केल आहे
नाशिक मधील कॅप्टन खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर ही मोठी टीका होत आहे
गेल्या दोन दिवसापासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर येत नसल्याने रूपाली ठोंबरे यांची पोस्ट
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेचा शुभारंभ काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्साहात झाला. राज्यभरातून येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्यांनी परिसर दणाणून गेला. निगवे दुमाला येथील हिम्मत बहाद्दूर चव्हाण सरकार यांची मानाची सासनकाठी मिरवणुकीने मंदिरात दाखल झाली. यावेळी “जोतिबाच्या नावानं चांगभलं” च्या जयघोषात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात आली. मुख्य मंदिरात राजेशाही थाटात महापूजा पार पडली, तसेच ज्योतिर्लिंग मंडपात पंचांग वाचन करण्यात आले. दरम्यान, सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, लातूर आदी भागांतून सासनकाठ्या सज्ज झाल्या असून मुख्य यात्रा १ एप्रिल रोजी पार पडणार आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण बाणेर परिसरात एका दुचाकीवरून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बाणेर भागातील महापालिकेच्या जलतरण तलावाजवळ सापळा रचून या दोघांना अडवले आणि त्यांना चौकशी करायला सुरुवात केली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात एक पिशवी मिळून आली ज्यामध्ये हळदीची पाकिटे होती. या पाकिटांची तपासणी केल्यानंतर त्या पाकिटांमध्ये गांजा लपविल्याचे उघड झाले
आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
16 ते 17 विद्यार्थ्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
16 मार्चला या विद्यार्थ्याने मूलभूत सुविधा मिळावे यासाठी लॉ कॉलेजमध्ये आंदोलन केलं होतं
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थ्याकडून प्राचार्याच्या जालना ठिया आंदोलन सुरू करण्यात आलं होतं
परवानगी नसताना सुद्धा आंदोलन करण्यात आलं तसंच बेकायदा जमाव जमवण्यात आला याशिवाय घोषणाबाजी केली असे आरोप ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रशासकीय कामात अडथळा आणला कर्मचाऱ्यांना इमारतीत येण्या जाण्यास अडथळा झाला असं तक्रारीत नमूद करण्यात आला आहे
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये प्रमोद सावंत यांच्यावर शस्त्रक्रिया
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली
सध्या प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर आहे
दिलीतोद्धार चळवळीतील महत्व पूर्ण घटना असणाऱ्या महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर आयोजित कार्यक्रम आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड दौऱ्यावर येत आहेत. याचवेळी त्यांच्या सोबत मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, भरत गोगावले आदिती तटकरे देखील उपस्थित राहणार आहे. चवदार तळे सौदर्यीकरण आणि पाणी शुद्धीकरण या कामासाठी शासनामार्फत 55 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामांच भुमीपुजन या वेळी केल जाणार आहे.
जालना जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास अनेक भागात गारांसह पाऊस पडला या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू पिकासह फळबागांचा अतोनात नुकसान झाल आहे.जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील शेतकरी अशोक सातभाये यांचं गहू पीक अक्षरशः भुई सपाट झाला आहे.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहे. जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारांसह पाऊस झाल्यामुळे गहू पिकांसह कांदा आणि फळबागांचा अतोनात नुकसान झाला आहे.
स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किंमती मध्ये वाढ
साध्या पेट्रोल मध्ये कुठली ही भाववाढ नाही
प्रत्येक लिटर मागे २.०९ रुपयांनी वाढले भाव
१११.६८ रुपये स्पीड आणि पॉवर पेट्रोल चे जुने दर
११३.७७ स्पीड आणि पॉवर पेट्रोल चे नवीन दर
दोन्ही प्रकारच्या पेट्रोलची दरवाढ आजपासून लागू
गडचिरोली जिल्ह्याच्या उपविभाग भामरागड अंतर्गत अतिदुर्गम बंगाडी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
1000 सी–60 कमांडो, 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र
विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल व इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन
सन-2023 पासूनच्या सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठीच्या साखळीमधील 11 व्या नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी...
राहाता, श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस...
अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात...
हाताशी आलेल्या पिकांना वाचविण्याचे संकट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार परभणी जिल्ह्यात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पाऊसाची हजेरी लावली. अचानक जोरदार वारा सुटल्याने पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या गव्हाचे ज्वारी चे नुकसान होण्याची शक्यता आहे .
हिंदू नववर्ष व गुडीपडव्या निमित्ताने नाशिकच्या येवला शहरात रात्री बालाजी गल्लीतील सुंदर राम मंडळा तर्फे श्रीराम,लक्ष्मण,सीता यांची शहरातून रथातून मिरवणूक काढण्यात आली,नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्या हस्ते रथ ओढण्यात येऊन रथ मिरवणुकीला सुरवात झाली,या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या,तर विठ्ठल-रुखमाई चे वेष परिधान केलेले बालक मिरवणुकीत सहभागी झाले होते,रात्री उशिरा पर्यंत ही रथ मिरवणूक शहरातील विविध भागातून फिरून पुन्हा बालाजी गल्लीतील मंदिरात पोहचली.
पालघर जिल्ह्यातील चारोटी परिसरात वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला असून 11 केव्ही वीज वाहिनीचा डीपी थेट घरावर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वीज पोल आणि डीपी कोसळून घराचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.