Manasvi Choudhary
मेंदू हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग आहे. संपूर्ण शरीर चालवण्याचे नियंत्रण मेंदूकडे असते. मात्र, आपल्या काही दैनंदिन सवयींमुळे नकळतपणे मेंदूचे कार्यात अडथळा येतो.
मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी आणि स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी कोणत्या १० सवयी आपण आजच टाळल्या पाहिजेत, ते जाणून घ्या:
आजारपणात शरीराला आणि विश्रांतीची गरज असते. अशा वेळी बळजबरीने काम करत राहिल्यास मेंदूची ऊर्जा वेगाने संपते आणि मेंदूची कार्यक्षमता खालावते.
साखरेचे अतिसेवन केल्यामुळे शरीरातील आवश्यक प्रथिने आणि अन्नघटक योग्य प्रकारे शोषले जात नाहीत. यामुळे स्मरणशक्ती कमजोर होणे, नैराश्य आणि शिकण्याची क्षमता कमी होण्यासारखे मेंदूचे विकार जडू शकतात.
निरोगी मेंदूसाठी योग्य आणि पौष्टिक आहाराची नितांत गरज असते. कामाच्या धावपळीत अनेकजण जेवण टाळतात, ज्यामुळे मेंदूला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासते आणि अशक्तपणा जाणवतो.
पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूला विश्रांती मिळत नाही. झोपेत असताना मेंदू विषारी घटक बाहेर टाकतो. झोपेच्या अभावामुळे 'अमायलॉइड' नावाच्या घातक प्रथिनांचा संचय होतो, ज्यामुळे अल्झायमर सारख्या रोगांचा धोका वाढू शकतो.
अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे शरीरात 'सेरोटोनिन' चे उत्पादन कमी होते. तसेच मेलाटोनिनचे संतुलन बिघडल्याने मनःस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो.
वारंवार राग येणे किंवा जुन्या वाईट आठवणींमध्ये अडकून राहिल्याने मेंदूमध्ये अॅड्रेनालिन आणि इतर हानिकारक न्यूरोकेमिकल्स सक्रिय होतात, जे मेंदूच्या पेशींना हानी पोहोचवतात.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मेंदूचे कार्य मंदावते, एकाग्रता कमी होते आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.
शारीरिक हालचाली किंवा व्यायाम न केल्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे न्यूरॉन्स कमजोर होतात.
सतत अतिविचार करणे आणि ताणतणावाखाली राहिल्याने मेंदूचा 'हिप्पोकॅम्पस' भाग प्रभावित होतो, ज्यामुळे शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.