Manasvi Choudhary
सफरचंद आणि केळी दोन्हीही फळे आरोग्यासाठी हेल्दी मानली जातात. मात्र अनेकांच्या मनात असा देखील प्रश्न पडतो, सफरचंद आणि केळीमध्ये सर्वाधिक हेल्दी काय असते.
यासाठी या दोन्ही फळांचे शरीरासाठी फायदे जाणून घेऊया. दोन्ही फळांपैकी कोणते फळ सर्वाधिक फायदेशीर आहे.
सफरचंदामध्ये कॅलरीज खूप कमी आणि फायबर भरपूर असते.
हे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सफरचंद फायदेशीर
शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर
सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवत नाही, ज्यामुळे मधुमेहांसाठी फायदेशीर मानले जाते.
केळीमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण अधिक असते.
केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे खाल्ल्याबरोबर शरीराला ताकद येते.
केळीमध्ये फायबर असल्याने पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.
केळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण उच्च असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
येथे दिलेल माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.