Manasvi Choudhary
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असताना सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे या स्थितीला सायलेंट किलर मानले जाते. मात्र, जसे-जसे धमन्यांमध्ये प्लाक साचत जातो, तसे शरीर काही संकेत देतो ती जाणून घ्या.
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होऊ शकतो ज्यामुळे कालांतराने हृदयविकार, स्ट्रोक आणि रक्ताभिसरणाच्या समस्यांचा धोका वाढतो.
तुमच्या कुटुंबात कोणाला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे एथेरोस्क्लेरोसिसहोऊ शकतो, ज्यामध्ये धमन्या अरुंद होतात. जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर परिणाम होतो, तेव्हा छातीत वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
चालताना किंवा व्यायाम करताना पायांमध्ये वेदना होणे, पेटके येणे किंवा पाय जड पडणे हे 'पेरिफेरल आर्टरी डिसीज' चे लक्षण असू शकते. पायांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हा त्रास वाढतो.
पायांमध्ये किंवा तळव्यांमध्ये थंडपणा, बधिरता किंवा अशक्तपणा जाणवणे ही कमी रक्ताभिसरण होण्याची लक्षणे असू शकतात. उच्च कोलेस्ट्रॉलमळे प्लाम जमा होण्याचा धोका वाढतो त्यामुळे रक्ताभिसरण होण्यात अडथळा येतो.
जखमा, व्रण, अल्सर बरे होण्यास बराच वेळ लागत असल्यास रक्तप्रवाह खराब असल्याचे लक्षण असू शकते.
त्वचेखाली चरबीयुक्त पिवळ्या गाठी येणे. उच्च कोलेस्ट्रॉलमळे हा त्रास उद्भवू शकतो. सांधे, स्नायू, हात, पाय, कोपर, गुडघे या भांगाभोवती ही लक्षणे दिसू शकता.
शरीराला आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन व रक्तपुरवठा न मिळाल्यामुळे दिवसभर तीव्र थकवा आणि मरगळ जाणवते.
काही लोकांच्या डोळ्यांच्या बाहुलीभोवती पांढरट किंवा राखाडी रंगाचे वर्तुळ तयार होते, जे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा संकेत असू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.