उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज घेणार माळेगाव कारखान्याची चेअरमन पदाची जबाबदारी.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांची माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदाची रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार?
आज या संदर्भात माळेगाव कारखाना सभागृहात सदरची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद कंपनीत स्फोट १५ जखमींना नागपूरला हलविले. मोठ्या प्रमाणात स्फोट नंतर आग बचावकार्य सुरु.....
SBL कंपनीत सकाळी 7 वाजताच सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती...
भाजप सोबत सहलीवर गेलेले शिवसेनेचे दोन सदस्य घेऊन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटलांधी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
पालकमंत्री प्रताप सरनाईक,शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवींची ही भेटीवेळी उपस्थिती
तसेच बंडखोरी करत अपक्ष निवडून आलेले आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी दरम्यान उपस्थित
भेटीवेळी धाराशिव मधील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेही हजर
शिवसेनेतील तानाजी सावंत गटाकडून दोन जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या गोठात असल्याबद्दल नोंदवला होता आक्षेप,त्या दोन्ही सदस्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
धाराशिव मधील पंचायत समितीच्या सभापती निवड अगोदर होणार, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष बाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती
जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 6 मार्चला पंचायत समिती सभापती निवड, तर 13 मार्च जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी बैठक
सत्ता स्थापनेत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची भूमिका काय असणार याकडे लागले लक्ष
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.चंद्र ग्रहणाच्या पाश्र्वभूमीवर 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 6.44 ते 6.48 या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत वस्ञामध्ये सोवळ्यात ठेवण्यात येईल.ग्रहण कालावधीत सायंकाळ चा तुळजाभवानी मातेचा नित्योपचार धार्मिक पुजा विधिवत बदल करण्यात आला असुन तसेच ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी 6.55 वा नित्यपुजेची घाट होऊन सायंकाळ चे सिंहासन पुजा,अभिषेक पुजेला प्रारंभ होणार आहे.राञी 9 वाजता अभिषेक पुजेनंतर देवीस महावस्त्र अलंकार घालण्यात येऊन धुपारती होईल.
१५ मार्चपर्यंत पॅकेजवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला येत्या १५ दिवसांत गती मिळण्याची शक्यता
मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पॅकेजला अंतिम मंजुरी देऊन निधी वाटप सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे
सुमारे तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे
शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी सहा हजार कोटी रुपये कर्जस्वरूपात उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे
बाधितांना एरोसिटीमध्येच परताव्याची जागा देण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी भल्या पहाटेच कामाला सुरुवात करत होते हाच वारसा पुढे नेला आहे त्यांचे दोन्ही मुलं जय आणि पार्थ यांनी. आज पहाटे पार्थ पवार व जय पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना भेट देत कामांची प्रगती तपासली.
इराण-इजराइल अमेरिका युद्धामुळे पुण्यातून अबू धाबी दुबईला जाणारे चार विमाने रद्द
पुण्यातून स्पाइस जेट कंपनीचे मुंबई ते दुबई तसेच एअर इंडिया एक्सप्रेस चे पुणे ते आबा धाबी विमान रद्द
विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात
विमानतळावर येण्याआधी प्रवाशांनी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधून फ्लईट स्टेटस तपासण्याची विमानतळ प्रशासनाची विनंती
युद्धजन्य परिस्थिती संपल्यानंतर पुढील तारखेचे पर्यायी उड्डाण प्रवाशांना दिले जातील
जालन्यातील बदनापूर येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झालाय. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण जखमी झाले आहे.जालन्यातील बदनापूर येथून जालन्याकडे येणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण जखमी झाले आहेत. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बदनापूर शहरात काल रात्री हा अपघात झालाय. कपूरचंद गुसिंगे असं या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल रात्री अपघात झाल्यानंतर या महामार्गावर वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.
यवतमाळच्या पुसद तालुक्यात सध्या हळद काढणीच्या कामाला जोरदार वेग आल्याचे चित्र शेतशिवारात पाहायला मिळत असून मजुराद्वारे हळद काढणीची लगबग सुरू आहे.मोठा कोचा व शेंग अशी तीन प्रकारची प्रतवारी करून ढीग जमा केली जात आहे.
जल जीवन मिशनचा निधी तुकड्या तुकड्यात वितरित केली जाताहेत आज घडीच तब्बल 128 कोटीची देखके थकीत आहे पाणीपुरवठा विभागाने निधीची मागणी केली प्रलंबित देखकांभावी कंत्राटदारांनी संपूर्ण कामे ठप्प पाडली आहे सध्या स्थितीत यवतमाळ जिल्ह्यात 60 टक्क्याहून अधिक कामे पूर्णत्वास आली आहेत जलजीवन मिशनच्या कामांना मार्च 2024 पासून चांगलीच घरघर लागली आहे.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात शिपाई पदासाठीच्या 150 जागांसाठी 26 फेब्रुवारी पर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली ऑनलाईन द्वारे तेरा हजार 780 जणांनी अर्ज केले होते प्रत्यक्ष चाचणीसाठी दहा हजार त्रेचाळीस उमेदवार मैदानात उतरले सर्वप्रथम छाती व उंचीचे मोजमाप करण्यात आले यामध्ये 861 जण अपात्र ठरले त्यानंतरच्या मैदानी चाचणीत 5 हजार 253 जणांनी मैदान मारले आता कटऑफ लागल्यानंतर लेखी परीक्षेसाठ लेखी परीक्षेसाठी 1 हजार 500 जणांची निवड होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आंधळी येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यती पार पडल्या. राज्यात प्रथमच ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सरपंच दादासाहेब काळे यांनी हा उपक्रम राबवला.
आंधळी-टाकेवाडी रोडवरील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत बादल आणि बलमा या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत बैलगाडा मालकांसह 500 हून अधिक बैलजोड्या या बैलगाडा शर्यतीत सहभागी झाल्या.थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो शौकिनांनी गर्दी केली होती. यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि ढाल देऊन गौरवण्यात आले.
नवी मुंबई येथील खारघर परिसरात सुरू असलेल्या ‘हिंद की चादर’ कार्यक्रमादरम्यान मैदानाजवळ लावलेला एक पोस्टर अचानक कोसळला. या घटनेत तेथे उभी असलेली एक महिला बॅनरखाली अडकली.
घटनेनंतर कार्यक्रमस्थळी तैनात सुरक्षारक्षकांनी तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केले. त्यांनी बॅनर बाजूला करून महिलेला सुरक्षित बाहेर काढले. महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिला घटनास्थळीच प्राथमिक उपचार देण्यात आले.
काही वेळातच रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली; मात्र बॅनर हलका असल्याने गंभीर इजा झाली नाही आणि महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही.
मावळ तालुक्यातील आढले येथील गुरुकुल विद्यालय परिसरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा राज्यातील पहिला अर्धकृती पुतळा उभारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच अजितदादांचे विकासाभिमुख विचार, स्वच्छतेबाबतचा संदेश आणि समाजहिताची भूमिका कायम विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहावी या उद्देशाने गुरुकुल संस्थेचे विश्वस्त सचिन घोटकुले यांनी हा अर्धकृती पुतळा उभारण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांनी राज्यातील पायाभूत सुविधा विकास, जलसंधारण प्रकल्प, ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान तसेच शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवून जबाबदार नागरिक म्हणून घडावे आणि लोकसेवा, विकास व पारदर्शक प्रशासनाची प्रेरणा या पुतळ्याच्या माध्यमातून सातत्याने मिळत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.